तो माझा प्रियकर नाही तर मित्र आहे हे आईला कसे सांगाल

महामारीमुळे सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम झाला; त्यांच्या आयुष्यातील हा उमेदीचा वेळ व्यर्थ गेला. 

एकूण सर्व क्षेत्राचा विचार केल्यास झालेले नुकसान भरून काढणे शक्य आहे पण विद्यार्थ्यांचे वाया गेलेले  वर्ष परत कसे आणणार? 

त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या जिवाभावाच्या मित्रांपासून त्यांना फार दूर राहावे लागते आहे त्यामुळे त्यांचा मानसिक आधार दुरावतो या दुरीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. 

त्यांना घराबाहेर पडण्याच्या फार थोड्या संधी मिळतात याचा हे विद्यार्थी पुरेपूर उपयोग घेण्याचा प्रयत्न करतात पण क्काही गैर समजुतीमुळे त्यांच्या या भेटीला वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जातो. 

मुलींच्या बाबतीत तर फारच कठीण आहे त्यांना मैत्रिणीला भेटता येत असले तरी मित्रांना मात्र  भेटणे खूप अवघडल्यासारखे असते. 

 

१ मुलगा व १ मुलगी जर भेटत असतील तर सर्व त्यांच्यात प्रेम सम्बन्ध आहेत असे जाहीर करतात आणि मग त्यांना कुटुंबाचे तसेच समाजाचे टोनमें ऐकावे लागतात. 

अशीच एक दिवस प्रतीक्षा नाव बदललेलं आहे. एका छोट्याशा कामानिमित्य दुकानात गेली रस्त्यात तिला महाविद्यालयातीळ मित्र भेटला एवढ्या दिवसानंतर भेटल्यानंतर त्यांच्यात चांगल्याच गप्पा रंगल्या; तिकडे आई घरी तिची वाट पाहत होती. 

बराच वेळ झाला तरी प्रतीक्षा घरी परतली नाही म्हणून तिची आई बाहेर आली तोच तिला प्रतीक्षा तिच्या मित्राबरोबर गप्पा मारत असल्याचे दिसले आणि तिचा पारा चदला तडक तिने प्रतिक्षाला घरी बोलावले आईच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून ती गांगरली आईने काही विचारायच्या आधी प्रतीक्षा म्हणाली, “ अ ग तो माझा कॉलेजमधला मित्र आहे बऱ्याच दिवसांनी भेट झाली म्हणून बोलले “ 

या खुलाश्याने आईचे समाधान होणे शक्य नव्हते हे लक्षात आल्यावर प्रतीक्षा घाबरली. 

तिच्या मनात एकच प्रश्न होता आईला कसं सांगू? 

कदाचित अनेक मुलींसमोर असाच प्रश्न उभा राहत असेल 

मित्रांसोबत आईने पाहिल्यावर तिला तो माझा फक्त मित्र आहे आमच्यात प्रेम सम्बन्ध नाहीत हे कसे सांगायचे? 

फक्त तिला असे सांगून विश्वास सम्पादन करता येत नाही कारण प्रचलित धारणेनुसार मूळ-मुली तेव्हाच भेटतात जेव्हा त्यांच्यात प्रेम सम्बन्ध असतात. 

बहुतांशी आई-वडील आपल्या मुलं-मुलीचे खूप मित्र-मैत्रिणी असावे पण त्यांनी प्रेमात पडू नये अशी इच्छा बाळगतात मग यात नेमका फरक तो काय? 

मैत्री आणि प्रेमात काय फरक आहे?  

 

अचानक तुम्ही बाहेर पडल्यावर एखादा मित्र भेटल्यावर त्याच्याशी गप्पा करताना आईने पाहिले असेल तर तुम्ही तिला त्या मित्राबाबत काय सांगितले? 

अनेक मुली या परिस्थितीची कल्पना करूनच मुलांशी बोलणे टाळतात पण हे खरे उत्तर नाही. 

जर तुमचा मित्र तुम्हाला भेटला असेल आणि आई / वडिलांनी तुम्हाला पाहिले असेल तर घाबरून न जाता त्याची ओळख करून द्या जनेकरून त्यांच्या मनातील शंका निघून जाईल. 

पण एखाद्या  विश्वासू त्रयस्थ व्यक्तीने त्यांना सांगितले तर काय करावे? 

२ व्यक्तीमध्ये सम्वाद साधण्यासाठी विश्वासाचा पूल आवश्यक असतो म्हणून आई-वडिलांचा विश्वास सम्पादित करा त्यांच्यापासून कोणती गोष्ट लपवून ठेवत आहात असे जाणवू देऊ नका; त्यामुळे तुम्ही पारदर्शक आहात अशी त्यांची धारणा होण्यास मदत होईल. 

शालेय जीवनापासून जर घरी तुमच्या मैत्रिणींसोबत मित्रांना देखील बोलवत असाल तर तुमच्या स्वभावाची ओळख कुटुंबियांना होईल हीच सवय महाविद्यालयीन आयुष्यात देखील कायम ठेवल्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. 

कदाचित आता तुम्हाला याची गरज भासत असेल तर आईला मैत्रिणींसह मित्रांचा परिचय द्या जनेकरून तुमच्या नात्यातील स्पष्टता येईल आणि भविष्यातील धोके टाळता येतील. 

तुम्ही जर प्रेमात पडला असाल तर आई-बाबांच्या स्वभावाचा अंदाज घेऊन त्यांना विश्वासात घेऊन त्याची कल्पना द्या त्याचा सुरुवातीला काही दिवस तुमच्या नात्यात त्रास होईल पण दीर्घकालीन फायद्यासाठी ते आवश्यक आहे. 

तुमचा प्रियकर कोण आहे; तसेच इतर मित्र कोणते आहेत हे त्यांना कळेल. 

 

आज अनेक मुलींना सहलीला जाताना अथवा ग्रामीण भागातील मुलींना शहरात शिकायला जाताना त्यांच्यासोबत परिचयाच्या मैत्रिणी नाहीत म्हणून घरून अनुमती दिली जात नाही; जर तुम्ही मित्रांची माहिती त्यांच्यासोबतचे तुमचे मैत्रीचे नाते याबद्दल घरी स्पष्ट सांगितले तर त्यांचा तुमच्या चारित्र्यावर विश्वास बसेल त्यातूनच त्याचा फायदा तुमच्या सर्वांगीण विकासासाठी होणार. 

अनेक मुलींमध्ये संकोचाची भावना असते यावर विजय मिळवण्यासाठी मैत्रिणी एवढेच मित्र असणे देखील महत्वाचे आहे. 

 

आजच्या स्पर्धेच्या युगात तुम्हाला आपल्या कक्षा रुंदावणे अस्तित्वासाठी बंधनकारक असल्यामुळे फक्त मुलींपुरता तुमचा परिवार मर्यादित असून चालत नाही; तर मुलांच्या अनेक मैत्रिणी असाव्या तसेच मुलींचे अनेक मित्र असावे. हे सर्व नाते सम्भाळत असताना प्रेमी जोडीदार आणि इतर मित्र / मैत्रिणी यात विशिष्ट अंतर ठेवलेच पाहिजे. 

शेवटी बदलत्या युगात नवीन विचार धारण करून जगा सोबत चालायला  शिका परिस्थिती बदलते आहे त्यामुळे सावध राहून पुढचे पाऊल टाका रस्त्यात खड्डे आहेत म्हणून प्रगतीचा मार्ग टाळण्यापेक्षा खड्डे चुकवण्याचे कौशल्य अंगभूत करा. 

जसे मुलगा-मुलगी एक समान आहेत असे आपण म्हणतो तसाच समानतेचा व्यवहार केला तरच हि घोषणा सत्यात उतरेल; 

आणि हा कृत्रिम भेद नष्ट होईल. यासाठी आपण सर्वजन प्रयत्न करू  

फोटो - साभार गूगल





 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा