खरच अंतर जातीय विवाहामुळे आई-वडिलांच्या भावनांना ठेच पोहचते का?

महाविद्यालयात गेल्यापासून अभय आणि अविनाश एकमेकांशिवाय राहत नसत त्यांची मैत्री एवढी घट्ट होती कि, दोघे एकमेकांपासून जरा लांब असले तर त्यांच्यात  काही भिन्स्ले असावे अशी शंका घेण्यास जागा होती; कारण त्यांनी मैत्री जीवापाड जपली. 

पदवीचे पहिले २ वर्षे त्यांनी आपल्या मैत्रीने महाविद्यालयात वेगळी ओळख  निर्माण केली पण फक्त त्यांची घट्ट मैत्री एवढीच मर्यादित ओळख नव्हती तर अभय सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर होता त्याने स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. 

त्याला नाटकात अधिक रस असल्यामुळे तो रंग मंचावर जास्त वेळ रमत असायचा त्याच रंग मंचावर त्याच ताकदीची नटी होती तिचे नाव राणी. 

 अभय आणि राणी दोघे आपल्या भूमिकेत शिरले कि त्या भूमिकेशी एकरूप होऊन काम करायचे आणि त्यांची हि पात्राच्या भूमिकेशी तादात्म्य पावण्याची वृत्ती सर्व सहयोगी कलाकारांना प्रेरणा देत असे. 

रंग मंचावर नाटकातून ३ तास प्रेक्षकांचे मन जिंकणाऱ्या या युगुलाने कधीच एकमेकांची मने जिंकली होती; त्यांच्या वागण्यातील बदल अविनाशने अचूक हेरला आणि औपचारिकता त्याने पूर्ण केली. 

ते जेवढे जीव ओतून कामात मग्न व्हायचे त्यापेक्षा जास्त एकमेकांच्या प्रेमात चुम्ब भिजायचे मग सोबत बक्षिसे स्वीकारण्यापासून ते रंगीत तालीम करे पर्यंत त्यांच्यात दुरी निर्माण होण्याचे कारणच नाही. 

सांस्कृतिक मंडळातील या प्रेमी जोडप्यांनि आपल्या संस्कृतीला अजिबात धक्का लावला नाही म्हणजे इतर जोडपे वॅलेंटाईम डेच्या निमित्याने वेगळ्याच ढंगात वावरतात पण यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत अनाथालयात जाऊन त्या मुलांबरोबर हा प्रेमाचा उत्सव साजरा केला. 

 

एक दिवस अविनाश आणि अभय गप्पा मारत असताना अभयच्या लग्नाचा विषय निघाला आणि राणी त्याच्या डोळ्या समोर उभी राहिली. अभयच्या मनातीळ एक प्रश्न कायम त्रास देत असे “माझे बाबा प्रेम विवाहाला मान्यता देतील का?” 

या विचारात गुरफटलेला आपला मित्र अविनाशला जगातील सर्वाधिक दुःखी मनुष्य वाटत असे म्हणून त्याने अभयला धीर दिला. 

पण अभय त्याच्या या शाब्दिक आधाराने समाधानी झाला नाही त्याने विचारले, “ आई-वडील अथवा प्रियसी यांच्यात कोणाची निवड करायची?” 

आई-वडील कि गर्ल फ्रेंड निवड कोणत्या वेळी कशाप्रकारे करावी? 

 

काही काळापुरते वातावरण हलकं झालं नंतर दोघे हि निघून गेले. 

वर्ष संपत आले परीक्षा अगदी तोंडावर येऊन ठेपली आणि तिचा सामना करण्यासाठी त्यांनी पुस्तकांना जवळ केले. 

तोच कोरोना विषाणूने महाराष्ट्रात प्रवेश केला आणि अनपेक्षित रित्या सर्वच थांबले परीक्षा रद्द झाली म्हणून पुढच्या वर्गात प्रवेश मिळाला. 

शेवटचे वर्ष सर्वांसाठी आव्हानात्मक होते आभासी वर्गात शिक्षणाची औपचारिकता पूर्ण केली जात असे तरी देखील न भेटता राणी आणि अभय संपर्कात राहून एकमेकांना मदत  करत होते. 

दिव्सामाघून दिवस गेले शेवटी महाविद्यालयाची पायरी न चढता वर्ष संपले पदवी मिळाली आणि या प्रेमी युगुलांच्या आयुष्यातील नवीन पर्व  सुरु झाले. 

 

राणीला घरून लग्न करण्यासाठी तगादा सुरु झाला तिने हे अभयला सांगितले त्याने शेवटी मनमारून एवढ्या लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला पण त्यांच्यातील संकटे संपण्याचे नाव घेत नव्हते त्यांची जात वेगळी असल्यामुळे दोघांच्या घरून या लग्नाला विरोध सुरु झाला. 

अशा कठीण समई अभयला अविनाशची  आठवण झाली म्हणून त्याला भेटून त्याच्या खांद्यावर डोके ठेवून रडला आणि काळीज चिरवतून टाकणारा एक प्रश्न विचारला, 

खरच अंतर जातीय विवाहामुळे आई-वडिलांच्या भावनांना ठेच पोहचते का? 

तुमच्या आजू-बाजूला असंख्य अभय आणि राणीच्या जातीने त्यांना अशा कात्रीत अडकवले असेल. 

 

जाती सोबत लोक माती खायला तयार असतात त्यांच्यासाठी स्वतःच्या जिवापेक्षा जात प्रिय असते तिच्या रक्षणासाठी ते कोणत्या हि थराला जाऊ शकतात अगदी प्रतिष्ठेसाठी आपल्या पोटच्या गोळ्याची हत्या करायला असे आई-वडील माघे-पुढे पाहत नाहीत. 

त्यामुळे अंतर जातीय विवाह त्यांच्या काळजाला चिरडून टाकतो. 

पण दुसरीकडे मानवता हा सर्वोच्च  धर्म आहे हि शिकवण सर्व महापुरुषांनी दिली असताना त्यांच्या वाटेवर मार्गक्रमण  करण्यात काय गैर आहे? 

लोकांनी जाती अनंताच्या युध्याना जातीच्या चौकटीत बंदिस्त केले त्यांच्यासमोर आपल्या सामान्यांचा काय टिकाव लागणार. 

हे वास्तव असताना अनेकांनी अंतर जातीय प्रेम विवाह केळ्याचे उदाहरणे दाखवता येतील त्यापैकी अनेकांना ओनर किलिंगला सामोरे जावे लागले. 

त्याचे एक प्रातिनिधिक उदाहरण- 

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान  

 

अंतर जातीय विवाह केल्याने आई-वडिलांच्या भावनांना ठेच नक्की पोहचते पण कालांतराने त्यांची हि जखम भरून काढणे शक्य आहे. 

पण फक्त जातीची आडकाठी आल्यामुळे जर तुम्ही प्रेम विवाह करू शकला नाहीत तर ती प्रेमाची हत्या ठरेल. 

म्हणून शक्य त्या पद्धतीने प्रेम विवाह करा त्यासाठी येणाऱ्या संकटाना भिडण्याचे साहस तुमच्यात असले पाहिजे; परंतु त्यापूर्वी एका संसाराचे गाडे व्यवस्थित हाकण्यासाठी आवश्यक आर्थिकबळ तुमच्याकडे असायला पाहिजे. 

यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर काही सामाजिक संस्थांची मदत देखील मिळवू शकता. 

जाती-जातीत विभागलेल्या समाजाला जाती विरहित स्वरूप प्राप्त करून द्यायचे असेल तर तुम्ही हा जोखीम पत्करलाच पाहिजे. 




 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा