पोस्ट्स

सांग तुला कसं विसरू

इमेज
अनेक अव्यक्त प्रेमाच्या कविता आपण ऐकल्या तसेच वाचल्या असतील किती आपण या कवितांचा आस्वाद घेताना भावुक होतो. पण तुमच्या बाबतीत तसे झाले तर समजा तुमचे एका व्यक्तीवर खूप प्रेम आहे आणि त्याच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. तर तुम्हाला कसे वाटणार?  या अव्यक्त प्रेमातूनच अनेकांचे जीवन अस्थिर झाले फक्त त्यांच्याकडे व्यक्त करण्याचे धाडस नव्हते म्हणून.  बंटी आणि बबली   तसे शाळेतले टॉपर त्यामुळे सर्व शिक्षकांना वाटायचे त्यांनी चांगल्या महाविद्यालयात शिकावे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनात या हरहुन्नर विद्यार्थ्यांनी त्या प्रतिष्ठित महाविद्यालयात प्रवेश मिळवला.  बंटी हा ग्रामीण भागातील रांगडा गडी तर बबली शहरातील नाजूक मुलगी त्यांच्यात वरवर काही साम्य असण्याचे कारणच नाही; पण एक गोष्ट मात्र दोघांना देखील पहिल्याच भेटीत  समजली त्यांचे मन एकमेकांवर जडले.   नजरानजर झाली कि दोघांना स्वर्गीय आनंद होत असे जर त्यांच्यातील भेट टळली कि दोघांना दुसऱ्या दिवसापर्यंत नरक यातना सहन कराव्या लागायच्या विरह त्यांना सहन होत नसे तसे कोणाकडे व्यक्त करणे देखील शक्य नव्हते थोडक्य...

बायकोचा जाच

इमेज
तिचं एकदाच लग्न झालं आणि त्यादिवसापासून ती दागिन्यात हरवत गेली; तिला त्या स्वर्णलनकाराची बुरड पडली नाही; तर तिच्या कपाळावर परम्परेने कुंकवाचा आणि आता सुधारित समाजाने टिकलीचा शिक्का मारून पतिव्रता या आजाराचे लक्षण दिसत असल्यामुळे कायमची कोरनटाईन झाली.  मूलतः शोषणावर आधारित मालकी सिद्ध करू पाहणारी विवाह व्यवस्था आज जगभरात समाज मान्य झाली आहे तिच्या असण्याचा जाच अनेकांना जाणवत असला तरी त्याविरोधात ब्र उच्चारण्याची हिम्मत कोणी करत नाही हे विदारक वास्तव झाकून ठेवून आपण तथाकथित आदर्श जोडीदाराचे उदाहरणे देत फिरतो. राम-सीता, रावण-मंदोदरी, कृष्ण-रुख्मिणी,   आजच्या पडद्यावरच्या अभेनेते-अभिनेत्री सर्वच आम्हाला आदर्श वाटायला लागतात; त्यात गैर काही नाही कारण आपण शोषण करायचे आणि तिने/त्याने मुक्तपणे ते सहन करायचे हाच नित्यक्रम सुरु आहे जर चुकून जाणीव झालीच तर गप्प बसण्यात सर्वजण धन्यता मानतात.  पुराण काळापासून येथल्या स्त्रियांनी हाच नवरा ७ जन्म मिळावा म्हणून वट पौर्णिमा करायचे ठरवले; पण त्या पुरुषाला हीच बायको पुढचे ७ जन्म हवी आहे का? कोणीच विचारले नाही. मग त्याच्या हक्काचे काय? ...

शेवटि तिचे ही लग्न झालेच

इमेज
हे जीवन सुंदर आहे असे आपण कायम म्हणत असतो पण सौंदर्याचा शोध कोठे घ्यायचा हे मात्र ज्याने-त्याने ठरवायचं असते. कुणाला ते गोऱ्यागोमट्या चेहऱ्यात सापडते तर कुणाला संघर्षाच्या वाटेवरून प्रवास करणाऱ्या वाटसरूच्या कर्तृत्वात घावते काही मात्र व्यक्तीचा गुण     स्वभावात / वर्तवणुकीत सौंदर्य शोधतात त्यामुळेच कदाचित असे प्रेमी जगावेगळे ठरतात.  स्त्री-पुरुषांमध्ये विवाह होणे सामान्य बाब आहे. एखाद्या सर्वसामान्य मुलाने / मुलीने दिव्यांग व्यक्तीबरोबर रेशीमगाठ बांधली तर समाजाचे तिकडे लक्ष वेधले जाते. पण धडधाकट असणाऱ्या व्यक्तीने तृतीयपंथी जोडीदार निवडला तर मात्र समाज परिवर्तनाची मशाल पेटवली जाते. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड शहरात किन्नर सपना आणि बाळू या प्रेमी जोडप्याने अनेक प्रतिष्ठित व्यक्तीच्या साक्षीने पुढील कित्त्येक पिढयांना प्रकाश देणारी मशाल पेटवली.  या विवाहाची तेव्हापासून राज्यभर जोरदार चर्चा सुरु आहे या आधी गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यात असाच एक ऐतिहासिक विवाह संपन्न झाला होता त्याबद्दल वाचण्यासाठी– ऐतिहासिक...

पुरुषांचा महिला दिन

इमेज
सृष्टीची जननी तू मायेचा सागर आहेस,  रत्नांची खान तू संघर्षाची तलवार आहेस,  सोशीत वृत्ती असली जरी तुझी तरी तू प्रतिकाराची प्रेरणा आहेस.  स्त्री मनाच्या, स्त्री जीवनाच्या, स्त्रीवादी दृष्टिकोनाच्या अंगातून तुझ्याकडे अनेकांनी पाहिले आहे तसेच तू पुरुष प्रधान व्यवस्थेला आपल्या समृद्ध जाणिवेतून प्रश्न विचारून तुझे हक्क नाकारणाऱ्या विकृतीचा अंत करण्याचा निर्धार केला आहेस. तुला मी नवीन विचार देण्या एवढा प्रिपकव नाही तसेच वैचारिक दृष्ट्या स्वतःच्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव झाल्यामुळे तशी तुला प्रबोधनाची तातडीची गरज नसावी असे मला वाटते. कदाचित त्यामुळेच मला आज तुझ्या वेदनेवर बोलायचे नाही आणि तुझ्या उपजत असणाऱ्या सामर्थ्याचे गुणगान देखील करायचे नाही तर फक्त पुरुषाच्या आयुष्यात तुझे असणारे स्थान मांडायचे आहे.  आज महिला दिन म्हणून सर्वप्रथम सर्वाना या दिवसाच्या शुभेच्छा अगदी पुरुषांना देखील कारण माझ्यामते महिला दिन पुरुषांनी पुढाकार घेऊन साजरा करायला हवा.  कुटुंब व्यवस्थेच्या आरंभापासून तू कायम स्वतः चंदनासारखी झिजून नात्यांचे बंधने गुंफत आलीस त्याची कधी हि तक्रार तू क...

एक होते गाडगे बाबा

अध्यात्म आणि  विज्ञान हाताथात घेऊन वाटचाल करतात तेव्हा आपल्या समाज मनावर संस्कार आणि वैज्ञानिक अविष्कार रुजवणे शक्य होते. विज्ञान भौतिक प्रगतीचा  तर वैज्ञानिक दृष्टिकोन मानवी आयुष्याचा आलेख उंचावतो; आणि हा आलेख अधिकाधिक  उंचावत जावा;  त्यातूनच   व्यक्ती केंद्रित असणारे जीवन व्यापक सामाजिक हित जोपासण्यासाठी खर्ची पडावे म्हणून ४ भिंतींच्या शाळेपासून दूर राहून पुस्तकातील प्रश्नांची परीक्षेत उत्तरे न देता आयुष्याच्या विद्यापीठात ‘phd’ करणाऱ्या   कर्मयोगी संत गाडगे बाबा याना जयंती दिनी विनम्र अभिवादनजन्मलो .   माणूस म्हणून जन्मलो म्हणून माणूस होऊनच मरणार    आहे,  श्रम  करत-करत एक दिवस झिजणार  आहे,  स्वर्ग मी पाहिला नाही असेल असा विश्वास नाही देवा   शोधलय तुला अनेक देवळात पण तू   कुठेच  घावला नाही शेवटी भोळया माणसातच तुझे अस्तित्व मानणार आहे,  म्हणून माझ्या देवाला गंडवणार्यांना मी नागला करणार  आहे,  नको मला तुझे पुष्पक विमान अन   हिमालयात मठ देखील नको,  गाडगे आणि खराटा घेऊन मी माझा सं...

संत व्हॅलेंटाईन यास पत्र

इमेज
प्रिय संत व्हॅलेंटाईन,  प्रेम स्पर्शचा साष्टांग नमस्कार.  आपण प्रेमासाठी शहीद झालात म्हणून तुमच्या स्मृत्यर्थ सुमारे १७०० वर्षांपासून सुरु झालेला प्रेम दिवस आज सम्पूर्ण जगात आनंदाने साजरा केला जातोय. हे पत्र तुमच्यासाठी लिहीत  असलो तरी गोपनीय नाही म्हणून इतर वाचकांना तुमची थोडक्यात ओळख करून देणे आवश्यक वाटते.  सर्व  प्रेमात न्हाऊन जाणाऱ्या मानवांसाठी आपल्या आदर्शाचा परिचय- रोमन राज्यातील एक राजा फार निर्दयी होता; त्याच्यामते भौतिक सुख मिळवणे एक मात्र आयुष्याचे उदात्त ध्येय असावे प्रेम वैगेरे त्याच्या मते शुल्लक गोष्टी आहेत. म्हणून त्याने आपल्या सैनिकांना प्रेम तसेच विवाह करायला मनाई केली. त्या विरोधात आपण राजाला आव्हान देण्यासाठी एकटे उभे ठाकला कारण तुम्ही अनेक सैनिकांचे विवाह लावून दिले होते. परिणामी तुम्हाला फाशीची शिक्षा ठोठवण्यात आली; तुरुंगात असताना  राजकुमारी तुमच्या प्रेमात पडली आपल्या फाशीच्या एक दिवस आधी प्रेयसीला पत्र लिहिताना शेवटचे वाक्य सर्वानाच भावुक करणारे होते ‘तुझाच व्हॅलेंटाईन’  आजच्याच दिवशी आपण फासावर चदलात  जगाला प्रेमाचे महत्...

चौकटीतील शिवराय

इमेज
मानवतेचे प्रतीक छत्रपती शिवाजीमहाराज,  जाणता राजा छत्रपती शिवाजीमहाराज,  स्वाभिमानाचा कणा छत्रपती शिवाजीमहाराज,  मॅनेजमेंट गुरु छत्रपती शिवाजीमहाराज,  स्त्री, शेतकरी यांचे रक्षक शिवाजीमहाराज,   हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीमहाराज,  रयतेचा राजा छत्रपती शिवाजीमहाराज,  मध्य युगात आधुनिक लोकशाहीचे बीज पेरणारा द्रष्टा राजा छत्रपती शिवाजीमहाराज,  चिरकाल कोट्यवधी   लोकांच्या मनावर राज्य करणारा सम्राट  छत्रपती शिवाजीमहाराज,  अशा असंख्य बिरुदांमधून बाहेर पडून माणूस म्हणून आपली प्रतिमा जपणारा मानव शिवाजीमहाराजांमध्ये मला कायम दिसतो.  कर्नाटक  राज्याच्या राजधानीत महाराजांच्या पुतल्याची विटंबना झाली म्हणून सर्वत्र समाज कंटकांवर कारवाही करा अशी मागणी केली जात आहे. बेळगावातील शिव प्रेमींनी कानडी दुकानदारांना दुकाने बंद करायला भाग पाडले. कारण शिवाजी हे नाव नाही तर जगण्याची आदर्श जीवन पद्धती आहे.  पण महाराजांच्या पुतललाय नेमकं असं काय केलं कि त्याची विटंबना करण्यात समाज कन्टकांना आनंद मिळाला असेल?  तर माझ्यामते...