पुरुषांचा महिला दिन


सृष्टीची जननी तू मायेचा सागर आहेस, 

रत्नांची खान तू संघर्षाची तलवार आहेस, 

सोशीत वृत्ती असली जरी तुझी तरी तू प्रतिकाराची प्रेरणा आहेस. 

स्त्री मनाच्या, स्त्री जीवनाच्या, स्त्रीवादी दृष्टिकोनाच्या अंगातून तुझ्याकडे अनेकांनी पाहिले आहे तसेच तू पुरुष प्रधान व्यवस्थेला आपल्या समृद्ध जाणिवेतून प्रश्न विचारून तुझे हक्क नाकारणाऱ्या विकृतीचा अंत करण्याचा निर्धार केला आहेस. तुला मी नवीन विचार देण्या एवढा प्रिपकव नाही तसेच वैचारिक दृष्ट्या स्वतःच्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव झाल्यामुळे तशी तुला प्रबोधनाची तातडीची गरज नसावी असे मला वाटते. कदाचित त्यामुळेच मला आज तुझ्या वेदनेवर बोलायचे नाही आणि तुझ्या उपजत असणाऱ्या सामर्थ्याचे गुणगान देखील करायचे नाही तर फक्त पुरुषाच्या आयुष्यात तुझे असणारे स्थान मांडायचे आहे. 


आज महिला दिन म्हणून सर्वप्रथम सर्वाना या दिवसाच्या शुभेच्छा अगदी पुरुषांना देखील कारण माझ्यामते महिला दिन पुरुषांनी पुढाकार घेऊन साजरा करायला हवा. 

कुटुंब व्यवस्थेच्या आरंभापासून तू कायम स्वतः चंदनासारखी झिजून नात्यांचे बंधने गुंफत आलीस त्याची कधी हि तक्रार तू केली नाही तुझ्या घामाच्या गंधानेच संसाराच्या उदासीनतेत समाधानाचा गंध पसरवला म्हणून आज तू रडत असलीस तरी तो हसतो आहे. कारण तू त्याला कधी रडायला शिकवलेच नाही वेदना त्याला झाली तरी अश्रू तुझ्या डोळ्यातूनच ओघळतात तू कायम त्याला सुखात ठेवले पण दुःखाचे अस्तित्व कधी समजूच दिले नाही. तू यशाचा मार्ग दाखवला पण प्रगती मात्र त्याचीच झाली खरं सांगायचे तू फक्त देत राहिली आणि तो फक्त घेत राहिला.  म्हणून मला विचारायचे आहे अ ग तुला दातृत्वात कोणता आनंद मिळतो? 

हा आनंद तेवढा पुरेसा आहे का? 

हे सर्व औदार्य तू नाती वैगेरे पाहून करत नाहीस जेवढा रक्ताच्या नात्यांबद्दल जीवाडा आहे तेवढाच इतरांबद्दल आहे. 

तुझ्या विशाल स्त्री मनाच्या पात्रात माझ्यातल्या दिवसागणिक आकुंचित पावणाऱ्या पुरुषी मनाला शिरणे शक्य नाही. तरी देखील मर्यादांची जाणीव असताना हा एक प्रयत्न तुझ्या विविध भूमिका समजून घेण्यासाठी.  वाचकांनी प्रतिक्रेयेच्या स्वरूपात आपले मत लिहून चर्चेला सुरुवात करावी या अपेक्षेसह लिहीत आहे. 


तुझ्या सर्व भूमिकांमध्ये सर्वाधिक आईच्या भूमिकेची चर्चा नेहमीच होत असते त्याला तसे कारण देखील आहे तू आई झाल्याशिवाय या जगात कोणी जन्मालाच येऊ शकत नाही. मग तू फक्त जन्माला घातलेल्या अपत्यांचीच 

माता आहेस असे देखील म्हणणे योग्य होणार नाही कारण जैविक दृष्ट्या तुला एका जन्मात सर्वांचीच आई होणे शक्य नसले तरी मायेचा पदर पसरून कोट्यवधी लेकरांना कवटाळण्याचे बळ तुझ्याकडे आहे. म्हणूनच तुला सिंधुताई साऱ्या देशाची माई होता आले. तुझ्या अस्तित्वाचे स्थान किती अबाधित आहे हे सांगण्यासाठी ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ हे वचन पुरेसे आहे. 

देवाला पराभूत करण्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे याचा मला प्रत्त्येय आलाय. 

ताई ‘ताटी उघडा ज्ञानेश्व्रा’ म्हणणारी छोटी मुक्ताबाई असो किव्हा दादाला खाऊ दणारी लाडकी बहीण नाही तर प्रेमाने रागावणारी मोठी बहीण सर्व एकच आहेत कारण ताई तुझ्यात मी मला जन्म न देता आईचे प्रेम देणारी माता पाहतो. तुझ्यात आणखी काही विशेष आहेत आई आणि मुलांचे २ पिढ्यांचे अंतर असते त्यामुळे एक मेकांना समजून घेण्यात काही प्रसंगी अडचणी येतात;  वैचारिक दरी निर्माण झालेली असते पण तू आणि मी एकाच पिढीतले असल्यामुळे आपल्यात असा कोणता हि दुरावा येत नाही. मग एकमेकांचे हट्ट पुरवण्यापासून एकमेकांसोबत भांडण्या पर्यंत आपल्यातले प्रेम ओसंडून वाहते. त्यात हि माझ्यामते तू मात्र ष्रेष्ठ आहेस कारण वाट चुकलेल्या भावाला मोठ्या धीराने योग्य वाट दाखवण्याचे अफाट कार्य करत असताना त्याचा अहंकार मात्र तुझ्या वागण्यात कधीच दिसत नाही. 


प्रियसी-पत्नी  तुझ्या या भूमिकांबद्दल लिहिताना माझ्या काही मर्यादा आहेत त्या सुरुवातीला स्पष्ट करून लिहितो. अद्याप मी अविवाहित आहे तसेच आजवर कोणत्याही टप्प्यावर मी त्या प्रकारच्या प्रेमात पडलो नाही म्हणून पत्नी-प्रियसीच्या सहवासाच्या अनुभवाची शिदोरी माझ्याकडे नाही. मी जे काही लिहिणार आहे ते सर्व निरीक्षणावर आधारित तयार झालेल्या मतांवर 

अगदी किशोर वयात स्त्री-पुरुषी देहात काही नैसर्गिक संप्रेरके निर्माण होतात त्यातूनच उभयतांमध्ये लैंगिक आकर्षण निर्माण होते. यालाच काही किशोरवयीन मुले प्रेम म्हणतात पण हे खरे प्रेम नव्हे त्यामुळे अशांच्या आयुष्यातील अनुभवाला मी प्रियसीच्या सहवासात येणारे अनुभव म्हणणार नाही. 

साधारण पदवी पूर्ण झाल्यावर थोडीफार वास्तवाची जाणीव होऊ लागते या दरम्यान साधारणतः किमान १ वर्षाच्या सहवासांती तुमच्यात एकप्रकारचा जीवाडा निर्माण झाला असेल वैचारिक धागे जुडून २ हृदय विणले असतील परस्परांच्या सुख-दुःखाचे वाटेकरी होता येत असेल तर त्याला आपण प्रेम म्हणावे असे मला वाटते निश्चित या संकल्पनेला मर्यादा आहेत. तसेच व्यक्तिपरत्वे त्याचे निकष वेगवेगळे असू शकतात. 

प्रेमाने जग जिंकता येतं त्याच निकषावर प्रत्येक पुरुषाच्या आयुष्याचे सूत्र त्याच्या प्रियसीच्या हाती जात असावी जर तिने ठरवले तर त्याला कोणत्या हि स्थितीतून बाहेर काढून समाजात त्याचे स्थान उंचावू शकते. माझ्या काही मित्रांकडे पाहताना असे लक्षात आले कि ते तिच्यासाठी काही हि करू शकतात मग तिने जर त्यांना चांगल्या वर्तवणुकीची, समाजाप्रती सहानुभूती बाळगण्याची, शारिरीक-बहुधिक श्रम करण्याची, वडीलधर्य माणसांचा आदर करण्याची, निरवेसनी राहण्याची सवय लावली तर निश्चितपणे बिघडलेल्या प्रियकराला घडवण्याची शक्ती तिच्याकडे आहे असे म्हणता येईल. 

प्रत्येक संसारी पुरुषाच्या आयुष्याची घडी त्याची पत्नी बसवत असते. ती कायम क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते. अनेक घरात तिला डावलले जाते, निर्णय प्रक्रियेतून वगळले जाते, प्रसंगी तिला शारिरीक-मानसिक त्रास दिला जातो, अर्वाच्च भाषेत तिलाच बोलणे ऐकावी लागतात तरी हि ती त्या कुटुंबातील सर्वाना मोठ्या मनाने माफ करून त्यांची मर्जी सांभाळून सेवा करते. संकटकाळी जेव्हा हेच करते पुरुष हतबल होऊन हातावरहाट ठेवून बसतात त्यावेळी ती घराचा डोलारा आपल्या हातावर पेलते . सर्वांची दुखणी-खुपणी  असो नाही तर मुलांचं शिक्षण ती स्वाभिमानाने कष्ट करून पूर्ण करते. तिचा लाचार होऊन जगण्यापेक्षा झिजून मरण्यावर विश्वास असतो; कारण तिचा प्रत्येक श्वास इतर जिवन्त राहावे म्हणून सुरु असतो. ज्या पुरुषाच्या चेहऱ्यावर दुःखात हि हसू असतं त्या समाधानाची स्वाक्षरी पत्नीने केलेली असते. बहुदा आई नंतर हृदयाशी कवटाळून डोक्यावर आश्वासक स्फूर्ती देणारा हात पत्नीचा राहत असावा. 


मैत्रीण- पुरुषी मन टणक तर त्याचे पाषाणी हृदय असते; हा सर्वांचा समज झालेला असला तरी तो अर्धसत्य आहे. त्याच्या मनावर राज्य करणारी, त्याच्या अश्रुना   वाट मोकडी करून देणारी, प्राप्त परिस्थितीत धीर देणारी, त्याला आहे त्या परिस्थितीत स्वीकारणारी, त्याच्या चुका पदरात घेऊन सुधारणारी, मनापासून कौतुक करणारी आणि प्रसंगी कान उघडणारी शारिरीक आकर्षण वगळून प्रेमाचा वर्षाव करणारी मैत्रीण असते. प्रियसी आणि मैत्रीण यांच्या सूक्ष्म पण उघड्या डोळ्याने स्पष्ट दिसणारी रेषा असते ज्यांना ती दिसली त्यांचे आयुष्य बदलून जाते. हे नातं जपणे एवढं सोपं नसतं कारण तुमचा हेतू तिला / त्याला समजेलच असे नाही अनेकांच्या बाबतीत गैरसमजातून सम्वादाच्या अभावी दुरावा निर्माण होतो याचा अनेकदा पुरुषांवर नकारात्मक परिणाम होतो. तरी हि पुरुषांना एकतरी जिवाभावाची मैत्रीण हवी असते रडण्यासाठी, मनातले सर्व काही सांगण्यासाठी, संकटांचा सामना करताना संघर्षाच्या काटेरी वाटेवर  सहप्रवासी म्हणून हातातहात घेऊन चालण्यासाठी. 

गेल्या वर्षी ज्यांनी या जगाचा निरोप घेतला त्या स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्त्या कमला भसीम म्हणतात “पुरुष आत्महत्या करतात कारण त्यांना रडता येत नाही” ज्यांच्या आयुष्यात अश्रू पुसणारी मैत्रीण आहे असे पुरुष केव्हाच आत्महत्या करणार नाहीत. या मैत्रीतून दोघांचा हि विकास होतो एक दिवस काही सुचत नाही म्हणून विचार करत बसलेल्या स्त्री लेखिकेला तिचा मित्र भेटला आणि त्याच्या सल्ल्याने स्त्रीवादी चळवळीचे संविधान समजले जाणारा ‘the second sex’ द  सेकण्ड सेक्स हा सीमांड बुवा यांचा ग्रंथ १९४९ साली प्रकाशित झाला. 

पुरुषाला वयाच्या प्रत्येक टप्प्यावर जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला तोंड देताना तुझा म्हणजेच स्त्रीचा आई, बहीण, मावशी, आत्या , मैत्रीण, प्रियसी, पत्नी  कोणत्यानाकोणत्या स्वरूपात सहवास हवाहवासा असतो. 

या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न केला वाचण्यासाठी

मला कायम प्रश्न पडतो ती नसती तर माझे काय झाले असते? 




 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा