चौकटीतील शिवराय

चौकटीतील शिवराय

मानवतेचे प्रतीक छत्रपती शिवाजीमहाराज, 

जाणता राजा छत्रपती शिवाजीमहाराज, 

स्वाभिमानाचा कणा छत्रपती शिवाजीमहाराज, 

मॅनेजमेंट गुरु छत्रपती शिवाजीमहाराज, 

स्त्री, शेतकरी यांचे रक्षक शिवाजीमहाराज,  

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीमहाराज, 

रयतेचा राजा छत्रपती शिवाजीमहाराज, 

मध्य युगात आधुनिक लोकशाहीचे बीज पेरणारा द्रष्टा राजा छत्रपती शिवाजीमहाराज, 

चिरकाल कोट्यवधी   लोकांच्या मनावर राज्य करणारा सम्राट  छत्रपती शिवाजीमहाराज, 

अशा असंख्य बिरुदांमधून बाहेर पडून माणूस म्हणून आपली प्रतिमा जपणारा मानव शिवाजीमहाराजांमध्ये मला कायम दिसतो. 

कर्नाटक  राज्याच्या राजधानीत महाराजांच्या पुतल्याची विटंबना झाली म्हणून सर्वत्र समाज कंटकांवर कारवाही करा अशी मागणी केली जात आहे. बेळगावातील शिव प्रेमींनी कानडी दुकानदारांना दुकाने बंद करायला भाग पाडले. कारण शिवाजी हे नाव नाही तर जगण्याची आदर्श जीवन पद्धती आहे. 


पण महाराजांच्या पुतललाय नेमकं असं काय केलं कि त्याची विटंबना करण्यात समाज कन्टकांना आनंद मिळाला असेल? 

तर माझ्यामते केवळ काही विकृत मानसिकतेच्या लोकांचे मतलब साधण्यासाठी म्हणून बिचार्या निर्जीव पुतळ्याला उगाच त्रास देण्यात आला असावा. 

जेव्हा पुस्तकात आणि मस्तकात वेगवेगळे शिवाजीमहाराज असतात तेव्हाच त्यांच्या अस्तित्वाच्या भौतिक प्रतीकांचा अवमान केल्या जातो. 

महाराजांच्या चारित्र्यावर याने काही हि फरक पडत नसला तरी एक दिवस हीच प्रवृत्ती त्यांच्या अस्तित्वाच्या सर्व खुणा पुसून टाकण्याची शक्यता निर्माण होते म्हणून हे सर्व थांबवणे गरजेचे आहे. 

या लेखात महाराजांची थोरवी मांडायची नसून त्यांच्या नावाने केले जाणारे पातक उधल करायचे आहे. 

राजे व्यक्तिगत आयुष्यात आस्तिक होते पण राजा म्हणून धर्म निरपेक्ष होते. 

त्यांनी शत्रू मुसलमान आहे कि स्वधर्मीय हे पाहून युद्ध केले नाही. 

शिवाजीमहाराजांचे अनेक अंग रक्षक मुस्लिम होते अर्थात त्यांच्या ठायी व्यक्तीच्या शौर्याला, निष्ठेला महत्व होते. 

शिवराय हे जग सोडून गेल्यानंतर काही वर्षातच स्वराज्याची सूत्रे पेशवाईच्या हाती गेली त्यांनी महाराजांचा मुखवटा कायम ठेऊन दात मात्र ब्राम्हण्य प्रवृत्तीचे बसवले. 


त्यातूनच सत्ताधीशांची रयतेशी बांधिलकी संपली. 

धर्मासाठी मरण पत्करणाऱ्या समाजाला शिवाजीमहाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते एवढाच इतिहास शिकवला जातो.

तसेच अफजल खानाचा कोठडा बाहेर काढला आणि शाइस्ते खानाची बोटे छाटली हीच माहिती दिली जाते मग सामान्यांना वाटू लागते कि महाराज फक्त हिंदूंचे त्यामुळे मुस्लिम द्वेष वाढू लागतो. 

देशाची फाळणी झाल्यावर दोन धर्मात प्रचंड तणाव वाढला  परिणामी मुसलमान महाराजांपासून दुरावले. 

छत्रपतींच्या दैदिप्य्मन इतिहासाने संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात लढण्याची स्फूर्ती दिली त्याचा आपल्या राज्याला फायदाच झाला. 

याच चळवळीत प्र. के.  अत्रे यांचे एक वाक्य अनेकांच्या काळजात घर करून बसलं “इतरांना फक्त भूगोल आहे पण महाराष्ट्राला इतिहास आहे” मग शिवराय फक्त मराठी माणसांपुरतेच मर्यादित राहिले. 

त्यानंतर दलितांच्या झोपड्यांवर हल्ले करताना सुवर्ण लोकांनी “जय भवानी जय शिवाजी” अशा घोषणा देऊन महाराजांचा विचार जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिवराय फक्त सवर्ण लोकांचेच राहिले. 

गेल्या काही वर्षांपूर्वी मराठ्यांचे विराट मोर्चे निघाले त्यात “एक मराठा लाख मराठा” या घोषणेसोबतच  “तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय” यांनी सर्व परिसर दुमदुमून जात असे मग महाराज केवळ मराठ्यांचेच उरले. 

हे समाज मनात दडून बसलेलं वास्तव असलं तरी सर्वच राजकीय पक्ष महाराजांना व्यासपीठांवर थोडीफार जागा देतात. 


महाराजांची जयंती मोठ्या थाटात साजरी केली जाते अशा कार्यक्रमात आयोजक शक्ती प्रदर्शन करण्याची संधी दवडू देत नाहीत. 

बाकी मिरवणुकीत चित्रपटांच्या गाण्यावर ठेका धरणाऱ्या तोंडात घुटखा आणि पोटात मदिरा असणाऱ्या भगव्या रक्ताच्या सैनिकांची जयंती विचारूच नका. 

राजकारणी महाराजांचे पुतळे उभारून भावनांचे डोंगर उभारतात आणि मग निवडणुकीच्या वेळी थोडे पोखरून मताची झोळी भरून घेतात. 

पण महाराजांच्या विचारांचे काय? 

ते ग्रंथालयातील कपाटात जाड ग्रंथांच्या लिफाप्यात सुरक्षित आहेत. 


पण आता काही मावळ्यांनी ते ग्रंथ उघडून प्रत्येक पानाला प्रश्न विचारून बेजार केलय आणि त्यांची उत्तरे लोकांना सांगण्यासाठी हे मावळे धडपड करतायत कारण “शिवाजी” या नावातच सामर्थ्य आणि वैभव दडलेल आहे. 

बंगरुळु येथे घडलेल्या घटनेने सुखावलेलेल्या अथवा दुखावलेल्या सर्वांना भानावर आणायचे असेल तर त्यांना वैचारिक वारसा सांगा ...


चला वैचारिक वारसदार होऊ 


Photo Credit - Pexel

 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा