सांग तुला कसं विसरू

अनेक अव्यक्त प्रेमाच्या कविता आपण ऐकल्या तसेच वाचल्या असतील किती आपण या कवितांचा आस्वाद घेताना भावुक होतो. पण तुमच्या बाबतीत तसे झाले तर समजा तुमचे एका व्यक्तीवर खूप प्रेम आहे आणि त्याच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. तर तुम्हाला कसे वाटणार? 

  • या अव्यक्त प्रेमातूनच अनेकांचे जीवन अस्थिर झाले फक्त त्यांच्याकडे व्यक्त करण्याचे धाडस नव्हते म्हणून. 

    बंटी आणि बबली   तसे शाळेतले टॉपर त्यामुळे सर्व शिक्षकांना वाटायचे त्यांनी चांगल्या महाविद्यालयात शिकावे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनात या हरहुन्नर विद्यार्थ्यांनी त्या प्रतिष्ठित महाविद्यालयात प्रवेश मिळवला. 

    बंटी हा ग्रामीण भागातील रांगडा गडी तर बबली शहरातील नाजूक मुलगी त्यांच्यात वरवर काही साम्य असण्याचे कारणच नाही; पण एक गोष्ट मात्र दोघांना देखील पहिल्याच भेटीत  समजली त्यांचे मन एकमेकांवर जडले.

 

  • नजरानजर झाली कि दोघांना स्वर्गीय आनंद होत असे जर त्यांच्यातील भेट टळली कि दोघांना दुसऱ्या दिवसापर्यंत नरक यातना सहन कराव्या लागायच्या विरह त्यांना सहन होत नसे तसे कोणाकडे व्यक्त करणे देखील शक्य नव्हते थोडक्यात काय तोंड दाबून बुक्क्यांचा मारा. 

    दोघे हि वर्गात हुशार त्यामुळे त्यांचा सर्वत्र बोलबाला पण त्यांचे वागणे आपल्या जडण-घडणीस अनुकूल असेच होते. 

    बबली मोकळ्या मनाची सर्वत्र वावरणारी आणि बंटी मुलींपासून हातभर अंतर ठेवणारा थोडा लाजाळू 

    तसे बंटीचे मित्र फार थोडे होते त्याला त्याच्या ग्राम्य वागणुकीमुळे शहरी मित्र जवळ करत नसत त्याचा बंटीवर काही परिणाम होत नसे तो सर्व वेळ ग्रंथालयात घालवायचा; हे मात्र बबलीला आतून प्रभावित करणार होत पण तो हाच वेळ माझ्या सोबत का घालवत नाही? त्यामुळे चीड देखील होती. 

    पहिले सत्र संपले निकालात बंटीच्या स्वभाव प्रमाणे तो वर्गात प्रथम आला. निमित्य मिळालं  आणि बबलीने त्याला गाठले आणि कडकडून मिठी मारून त्याचे मनापासून अभिनंदन केले आतून बंटी खुश झाला त्याला देखील हीच अपेक्षा होती. मग त्यांनी अधून-मधून संधी मिळाली कि भेटणे सुरु केले इकडच्या-तिकडच्या गप्पा सुरू झाल्या आणि तेवढ्याच त्या  राहिल्या एकानेही मनातील गुपित बाहेर काढले नाही. 

    शेवटी बबलीच्या मैत्रिणीने चोरी पकडली आणि तिच्याकडे खुलासा मागितला बबली थोडी रडवेल्या स्वरात म्हणाली “ माझे त्याच्यावर खूप प्रेम आहे पण तो माझ्यावर प्रेम करतो का? हे मात्र मला माहित नाही. “ मैत्रिणिनेने तिला प्रति प्रश्न केला  अग जाऊ दे तोच एकटा हॅण्डसम आहे का? असे तर किती तुझ्या माघे फिरतील बबली “ ज्याच्यावर मनापासून प्रेम करते ते कसे विसरू?” मैत्रीण-  मग मांजर कुठे आडवी आली त्याला तू विचार आणि एकदा सोक्ष-मोक्ष होऊ दे. बबली “अ ग तो माझ्याशी गप्पा मारतो; त्यामुळे फक्त इतरांसारखा केवळ एक मैत्रीण समजतो कि मी त्याच्या प्रेमात पडली खरं सांगायचे तर तो मला समजू शकत नाही. म्हणून मी गोधळले आहे मला काही कळत नाही. तूच सांग काय करू?” 

     ?

थोड्या फार फरकाने अव्यक्त प्रेमाची हि कायम नैराश्यात ढकलणारी परिस्थिती सर्वत्र असते. त्यांच्यासमोर काळजाला भिडणारे २ अनुत्तरित प्रश्न असतात 

  • १ ज्याच्यावर मनापासून प्रेम आहे त्याला कसे विसरायचे? 

    २ तो मला समजून घेत नाही काय करू? 

    या प्रश्नाचे उत्तर शोधताना तिसरा प्रश्न निर्माण होतो; मला कळत नाही मी माझ्या प्रियकराच्या प्रेमात आहे कि संलग्न आहे? 

    वरील सर्व प्रश्न निर्माण होण्याचे कारण पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही म्हणून दुसरा प्रश्न निर्माण होतो. दुसऱ्याचे उत्तर शोधताना तिसरा मानगुटीवर उभा  राहतो. 

    त्यामुळे पहिल्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणे नेहमी सोईचे ठरेल. 

    ज्याच्यावर एवढे प्रेम आहे ते कसे विसरायचे? 

    प्रेम विसरण्यापूर्वी आपण प्रेमात का पडलो? स्वतःला विचारा आणि आपल्याला ते का मिळत नाही यावर चिंतन करा. 

    कदाचित त्याच्या आयुष्यात दुसरी कोणी असेल तर तुम्ही त्याला त्रास देणे बंद करा कारण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला त्रास देण्यात अर्थ नाही. 

    तरी देखील तुम्हाला त्याचा सहवास हवा-हवासा वाटत असेल तर त्याच्याशी मैत्री करा पण त्याच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करू नका. 

 

  • कारण तुमच्या हस्तक्षेपाचा दूरगामी परिणाम होण्याची शक्यता असते. 

    प्रेमाचा बळी https://www.premsparsh.com/2021/01/blog-post_15.html 

    दोघे हि एकमेकांच्या  प्रेमात पडले असतील  आणि ते अव्यक्त प्रेम असेल तर काय करावे?   

    व्यक्त प्रेम प्रेमात पडल्याचा आनंद देत असले तरी त्यापासून समाधान मिळत नाही कारण व्यवहारिक जगण्याचा आनंद लुटता येत  नाही. त्याचबरोबर स्वतःबरोबर आपल्या जोडीदार देखील तुम्ही व्दिडावस्थेत ढकलता म्हणून एकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यासाठी समोरून प्रस्ताव येण्याची वाट पाहण्यात अर्थ नाही तुम्ही तुमच्याकडून हात पुढे केला तर कदाचित हि कोंडी फोडणे सोपे जाईल. तसे आपल्याला अप्रत्येक्ष सिग्नल मिळत असतोच त्यावर विश्वास ठेवून संवाद साधायला हवा. 

    कारण अनेकांना योग्य वेळी प्रेमभावना व्यक्त न करता  आल्यामुळे आयुष्यात त्यांना स्वप्नातील जोडीदाराच्या सहवासात जगता आले नाही म्हणून अशा उदाहरणांपासून धडा शिकून सावधगिरी बाळगा आणि तुम्ही त्यांच्याबद्दल काय विचार करता ते त्यांना स्पष्ट सांगा नक्कीच तुमचे नाते घट्ट होईल. 

    तो / ती मला समजून घेत नाही काय करावे? 

    आपण त्यालासमजून घेतले आहे का? स्वतःला विचारा आणि मग जोडीदाराला दोष द्या म्हणजे त्याच्याकडून काही चुकते का ते शोधा. 

 

  • हि वेळ का येते? तुमच्यातील विसंवाद याला जवाबदार आहे. सुरुवातीला तुम्ही कृत्रिमता जोपासता त्यानंतर हे असे नाटके तुम्हाला जमत नाहीत म्हणून कदाचित तुमच्यात दुरी निर्माण होत असेल अशावेळी एकत्र बसून चर्चा करा. तुमच्या जोडीदाराला जर काही महत्वाचे काम करायचे असेल आणि त्यामुळे तो तुम्हाला वेळ देऊ शकत नसेल तर तुम्ही त्याला त्याच्या कामात मदत करू शकता का? 

    जर शक्य असेल तर तसे करा आणि जास्तीतजास्त वेळ सोबत घालवा त्याचबरोबर मानसिक स्थिती फार म्हत्वाचीं असते. त्याकडे दुर्लक्ष करू नका त्यामुळे कदाचित एक जण रागात नको-नको ते बोलला असेल तर शक्य तेवढ्या लवकर लवकर विसरून जा.दुर्दैवाने त्याचे दुसऱ्या मुलीशी नाते असेल आणि त्याने तुम्हाला फसवले असल्यास त्वरित सावध होणे हिताचे ठरेल मग परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घ्या.  

    तुम्ही जर आपल्या प्रेमी मित्रावर अपेक्षांचे ओझे लादले नाही तर तुमचे नाते आयुष्भर टिकू शकते त्यासाठी सर्वाना शुभेच्छा.

फोटो - साभार गूगल

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा