एक होते गाडगे बाबा

अध्यात्म आणि  विज्ञान हाताथात घेऊन वाटचाल करतात तेव्हा आपल्या समाज मनावर संस्कार आणि वैज्ञानिक अविष्कार रुजवणे शक्य होते. विज्ञान भौतिक प्रगतीचा  तर वैज्ञानिक दृष्टिकोन मानवी आयुष्याचा आलेख उंचावतो; आणि हा आलेख अधिकाधिक  उंचावत जावा;  त्यातूनच   व्यक्ती केंद्रित असणारे जीवन व्यापक सामाजिक हित जोपासण्यासाठी खर्ची पडावे म्हणून ४ भिंतींच्या शाळेपासून दूर राहून पुस्तकातील प्रश्नांची परीक्षेत उत्तरे न देता आयुष्याच्या विद्यापीठात ‘phd’ करणाऱ्या   कर्मयोगी संत गाडगे बाबा याना जयंती दिनी विनम्र अभिवादनजन्मलो . 

 माणूस म्हणून जन्मलो म्हणून माणूस होऊनच मरणार    आहे, 

श्रम  करत-करत एक दिवस झिजणार  आहे, 

स्वर्ग मी पाहिला नाही असेल असा विश्वास नाही देवा   शोधलय तुला अनेक देवळात पण तू   कुठेच  घावला नाही शेवटी भोळया माणसातच तुझे अस्तित्व मानणार आहे, 

म्हणून माझ्या देवाला गंडवणार्यांना मी नागला करणार  आहे, 

नको मला तुझे पुष्पक विमान अन   हिमालयात मठ देखील नको, 

गाडगे आणि खराटा घेऊन मी माझा संसार थाटलआय, 

हातात  चिपळ्या घेऊन देवकी नंदन गोपाळाने जगण्याचा मार्ग दाखवलाय, 

 विद्येचा भक्त मी ज्ञानाचा भुकेला ठेवलंय शीर्ष स्थानी नामया आणि  तुक्याला, अभंगाच्या साथीनं खेडोपाडी  झाडणार आहे, 

आज बीज  पेरलं उद्या याच भूमीत क्रांती घडणार आहे. 

कर्म योगी गाडगे बाबा यांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याकडे पाहिले तर एकाच व्यक्तीत संसारी पुरुष, बलोपासक,   विचारवंत, फकीर, समाज सुधारक  प्रारंभी आणि शेवटी माणूस मला 

दिसतो. कारण या विभूतीने एकाच आयुष्यात सहज   सर्व साध्य करून कुठला हि वाद अथवा अनुयायांचा 

घोळका आपल्या पश्चात ठेवला नाही शिवाय स्वतःला  

 संपूर्ण हयातीत मंदिरात किव्हा पुतळ्यात कोंबले नाही. परिणामी जाती/धर्माच्या अस्मिता नावाच्या विष कन्नेला जवळपास  फिरकण्याची  संधीच गाडगे बाबानी   दिली नाही. 

त्यांच्या आयुष्यावर एक परामर्श टाकला तर त्यांची आणि आपली पात्रता   सहज  तपासता येईल बाबांचा जन्म  त्याकाळचा विचार करता  एका सामान्य  कुटुंबात झाला त्यांच्या  परिवाराचे आणि अक्षरांचे पिढ्यानपिढ्या शत्रुत्व होते परिणामी   देबूला देखील अक्षरांशी मैत्री  करता आली नाही. 

दारूच्या प्रेमात  पडलेले वडील आपल्या सर्व प्रियजनाला लवकरच सोडून गेले. अगदी आज देखील अनेकांचे मातृ/  पितृ  छत्र हरवलेल्या मुलांची  जी अवस्था होते तशीच त्यांची  झाली होती. नंतर ते मामाच्या घरी गेले दरम्यान त्यांचे लग्न झाले हे सर्व अनेकांना माहिती  आहे म्हणून येथे लिहीत नाही. 

त्यांचे आणि आपले जीवन सारखेच दिसते पण त्यांच्यातील निरक्षर तरुण जेव्हा अन्यायी सावकाराला त्याच्याच भाषेत 

उत्तर  देतो तेव्हा विना तक्रार जाणीव असताना  अन्याय सहन करणारा तथाकथित सुशिक्षित पराजित होतो. 

आपण स्वतःला विज्ञानाचे पाईक म्हणवतो आणि समाजाच्या   दबावाला बळी पडून अनिष्ठ रुडी-परंपरेत अडकतो;  

येथेच गाडगे बाबा सरस ठरतात पुस्तकात न शिकलेले विज्ञान अनुभवाच्या नजरेतून  आत्मसात   करून जनतेला वाटतात. 

आजवर     उपदेश करणारे अनेक स्वघोषित संत झाले,  त्यांनी   कोट्यवधी रुपयांचे गबाळ जमवले, शिष्यांकरवी आपले मनसुभे पूर्ण करून घेतले; गाडगे बाबानि  मात्र या विकृतीला  कायम लाथ मारून   आदर्श ठेवला मुखात राम आणि हातात काम हा यशाचा  मार्ग दाखवला, कीर्तनातून प्रबोधन केले, गाव झाडून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले, अंधश्रद्धेवर प्रहार करून डोळे असणाऱ्यांचे    डोळे उघडले, आपल्या हयातीत कायम कर्तव्य पूर्ण करत असताना स्वतःची कर्म भूमी अवघ्या महाराष्ट्रात निर्माण केली. 

  अमरावती विद्यापीठाला संत गाडगे बाबांचे नाव देण्यात आले  असले तरी ते चालतेफिरते विद्यापीठ होते. ते कायम लोकांना प्रत्येक गोष्ट तर्काच्या निकषावर तपासून  सांगायचे त्याकरिता लोकांना सरळ भाषेत प्रश्न विचारायचे, 

तुम्ही देव पायलाय का? 

देव कसा   दिसते तुमाले माहित हाय का? 

देवळात गेल्यावर दिवा लावल्यावर देव दिसते मंग देव मोठा कि दिवा मोठा? 

देव निवड खाते का? 

यासारखे असंख्य प्रश्न आपल्या बोली भाषेतून विचारून जनतेला जागृत करण्याचा त्यांनी आमरण प्रयत्न केला. 

शिक्षणाचे महत्व सांगत असताना स्वच्छतेची गरज पटवून दिली आणि सामाजिक एकोपा जपण्याचा तसेच सर्वत्र पसरलेले जाती-धर्म भेद सम्पवण्याचा वसा हाती घेतला. 

शाळा, रुग्णालय, धर्म शाळा सुरु करून त्यांनी माणसातल्या देवाची भक्ती केली. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांसारख्या समाज सुधारकांचे विचार लोकांनी आत्मसात करावे म्हणून आपल्या कीर्तनातून त्यांच्यात देव शोधा असे लोकांना सांगायचे. 

आज गाडगे बाबांचे केवळ एकच कीर्तन ध्वनी मुद्रित स्वरूपात उपलब्ध आहे म्हणून मला असं वाटते आपण मराठी साहित्यातील अनमोल साठा हरवून बसलो. 

वर्तमानात गाडगे बाबा जगताना पुस्तकातील आदर्श जगण्यात उतरवता आले पाहिजे आणि प्रत्येकात ईशवर शोधता यायला हवा. या जगात अनेकांना आई-बाबा नाहीत, राहायला घर नाही, खायला अन्न नाही, अक्षरांची ओळख नाही, दिव्यांग व्यक्तीला जर काही कारणांमुळे स्वतःचा विकास करवून घेता आला नसेल, रुग्णालयात मदतीची अपेक्षा कोणी बाळगून असेल, रस्त्यावर अपघात झाल्यावर जर कोणी मृत्तिवशी झुंज देत असेल तर अशा वेळी त्या व्यक्तीत स्वतःला शोधून मार्ग काढायला हवा. 

संतांचे मंदिरे आणि महापुरुषांचे पुतडे उभारण्यापेक्षा त्यांचे विचार आचरणात उतरवायला पाहिजे. गाडगे बाबाला आपल्याकडून हीच अपेक्षा असेल. 

गाडगे बाबाचे जीवन समजून घेत असताना त्यांच्या विचारांची नाळ महात्मा फुलींशी जुडलेली असावी असे वाटते 

ज्योतिबाची नस  https://www.premsparsh.com/2021/11/blog-post_28.html 




 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान