ज्याचा त्याचा बाप

"बाप करे झोळी लेकरच्या ओडि आपुळि करवंडी झाकुणी" 

संत तुकाराम

आई आपल्या लेकरावर जीव ओवाळून टाकते.  पण वडिलांचे अदृश प्रेम ते जीवंत आशे पर्यन्त दिसत नाही; ते नसताना त्यांची किंमत कळते.  अशाच एका कर्तबगार मुलाने वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मंदिर बांधले.  अधिक माहितीसाठी https://www.youtube.com/watch?v=pdgobe-k298 भे देवून खात्री पटवून घ्यावी.  स्पर्धेच्या युगात व्यक्तीवाडी लोकांनी कुटुंबांची व्याख्या बदलून टाकली;  बायको मुले आणि आज बाप म्हणून मिरवणारा कमावता पुरुष त्या कुटुंबात जन्म देणाऱ्या आई वडिलांना स्थान नसते.  त्यांचे मुक्काम वृद्धाश्रमात कायमचे असते.  जर दूसरा भाऊ गावात राहत असेल तर त्याच्याकडे अशा काळात मूल्य जपणारी बरीच उदाहरणे आढळतात त्यातील एक वरील दिलेल्या पत्त्यावर आहे. 

आयुषात आनंद असते त्यावेळी आई सोबत असते;  यशस्वी झाल्यावर आई मिठी मारते; आपण संकटात असलो दुखी असलो तर आई रडते;  डोळ्यात अश्रु जमा होतात ती फार भावुक असते पण वडील मात्र रडू शकत नाहीत ते खंबीर पाठिंबा देतात.  लहान मुलांना आई खाऊ देते पण बाबा आणून घरी ठेवतात याची माहिती त्या बाळाला असण्याचे काही कारण नाही.  आई शाळेत सोडते;  पण पैसीयांची  तरतूद बाबा कषे करतात राम जाणे.  हे असच नाते असते मुलांचे आणि वडिलांचे त्यातही बाबा ताईचा अधिक लाड करतात अशी देखील काहींची तक्रार असते.  वडील असेच शांतपणे मुलाच्या मागे सदोदित असतात पण ते कधी याची जाणीव होऊ देत नाहीत.  याचा अर्थ त्यांचे आपल्या आयुषात स्थान कमी असण्याचे काहीही कारण नाही केवळ आपल्या नाव पुढे त्यांचे नाव लावणे हाच त्यांचा सन्मान करणे ह्ओट नाही;  तर जातांना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असावा.  त्यांच्या संपत्ति नसण्याचे दुख नसावे तर संततिच्यायशाचे समाधान असावे  राज्य दसरताच्या अडनेवरून त्यांचा पुत्र राम 14 वर्षे वनवासात गेला.  वासुदेवणे कृष्णाला रातरितून यमुनेच्या पुरातून सुरकशीत ठिकाणी पोहचवले.  बाबासाहेबांचे वडील रात्री 2 वाजे पर्यन्त जागे राहून त्यांच्या मुलाला अभ्यासाला उठवत असत.  शहाजी राज्यांनी बघितलेले स्वराज्याचे स्वप्न शिवाजीमहाराजांनी सत्यात उतरवले.  बाबा आमटे यांनी आपला सेवा धर्माचे संस्कार त्यांच्या विकास आणि प्रकाश या मुलांमध्ये उतरवले.   आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणाऱ्या बापाने स्वतःच्या मंत्रिमंडळात मुलाला मंत्री केले.  अनेक राजकीय उमेदवार आपला राजकीय वारसा मुलाला सोपवतात.  काही बाप या सगळ्या पेक्षा वेगळे असतात;  ते फिरोज सारख्या मुलाला दत्तक घेऊन वडीलकीचा आदर्श घालून देतात.  या सर्व वडिलांकडे पाहत असताना आपल्या वडिलांची जगाने दखल का घेतली नाही?  हा प्रश्न स्वतःला विचार त्यावेळी कळेल आपल्यासाठी बाबांनी असहेच कष्ट उपसले;  पण आपण त्याचे योग्य ते फळ त्यांना देवू शकलो नाही. 

वडिलांचे उपकार खरोखर फेडणे शक्य नाही;  पण एक मुलगा म्हणून आपण त्यांची मान नेहमी ताट राहील असे नक्की वागू शकतो.  त्यासाठी सर्वांनी मंदिर बांधणे गरजेचे नाही.  कोणी बांधत असेल तर तो त्या व्यक्तीच्या श्रद्धेचा प्रश्न आहे.  आपण त्यांच्या स्मरणार्थ समाज सेवा करून खरी श्रद्धांजलि अर्पण         करायला पाहिजे.  पण जे लोक वृद्धापकलात त्यांची हेटाळणी करतात;  त्यांनी डोक्याचे दार उघडून बाहेरची हवा आत येउद्यावी कारण आपण देखील बाप होणार हे विसरू नये. 
फोटो - साभार गूगल

  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा