विवाहाचं खरं वय


सृष्टीवरचा प्रत्येक सजीव आपल्या वंशजांना जन्म देतो; निसर्गाने तशी तरतूद केली आहे. 

 मानव सर्वाधिक बुद्धिमान प्राणी आहे असे त्याने स्वतः जाहीर केले. 

पण  इतर प्राण्यांना वाचा नसल्यामुळे तसेच स्वार्थी माणसाने त्यांच्याकरिता अब्रू नुकसानीचा कायदा केला नाही म्हणून ते माणसाच्या श्रेष्ठतेला आव्हान देऊ शकत नाहीत. 

टोळीतील माणसाच्या पुढे अनेक टोळ्या झाल्या; परिणामी त्याच्या गरजा विस्तारल्या सत्तेच्या महत्वकांक्षा वाढल्या म्हणून त्याने कुटुंब या संस्थेची स्वतःच्या रक्षणासाठी आणि समाज नावाच्या संस्थेची समूहाच्या रक्षणासाठी स्थापना केली. 

यात सुसूत्रता आणण्यासाठी सर्वांचे हित जोपासण्याच्या हेतूने आपल्या मुलांवर अनेक संस्कार करायला माणूस नावाच्या जातीच्या प्राण्याने सुरुवात केली. 

नामकरण संस्कारापासून अंत्य संस्कारापर्यंत वयाच्या सर्व टप्प्यावरचे सुसंस्कार निश्चित केले. त्यातीलच सार्वकालीन आणि सर्वत्र अतिमहत्वाच्या संस्कार ठरण्याचे भाग्य विवाह संस्काराला लाभले. 

विवाहाच्या पद्धती काळ सापेक्ष त्याचबरोबर व्यक्तिसापेक्ष असतात पण मुख्य हेतू मात्र जगात सर्वत्र कुटुंब प्रस्थापित करणे अर्थात आयुष्भर ज्याच्या अथवा जिच्या साथीने जगायचे अशा जोडीदाराबरोबर गाठ बांधणे हाच असतो. 


मानवाने काळाबरोबर केवळ भौतिक प्रगती केली नाही तर त्याची वैचारिक उंची देखील वाढली; परिणामी त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक झाला. म्हणून आजमितीस एकासएक हि आदर्श विवाह पद्धती काही अपवाद वगळता सर्वत्र मान्य झाली आहे. 

परिवर्तनाच्या वाटेवर अनेक काटेरी झुडपे असले तरी सत्याच्या आणि न्यायाच्या वाहनातून प्रवास करणारे प्रवाशी आपली वाट मोकळी करतात त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची या प्रवाश्यांची तयारी असते. 

लैंगिक भेदावर स्वार होऊन पुरुषांनी स्त्रियांचे अतोनात शोषण केले त्यांच्या प्रत्येक पावलावर यम दूत उभा असे तरी देखील त्या स्त्रीने अनेक बंधने असताना पुरुषाच्या  वर्चस्वाला आव्हान दिले; तरी देखील कायदा त्यांच्यावर अन्याय करत होता पुरुषांचे लग्नाचे किमान वय २१ होते तर स्त्रियांचे १८ होते आता भारत सरकारने यात समानता आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या आणि मुलींचे देखील विवाहाचे किमान वय २१ असावे याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. 

लवकरच हा कायद्यातील बदल अस्तित्वात येईल अशी अपेक्षा. 

व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती या उक्तीप्रमाणे याच्या दोनी बाजूनी लोकांनी तर्क दिले त्या-त्या व्यक्तीच्या विचारांचे त्यांनी समर्थन करण्यासाठी काही दाखले देखील दिले. 


मुलींचे विवाहाचे किमान वय १८ असावे या मताच्या लोकांनी समर्थनार्थ मांडलेले काही मुद्दे- 

१८ वर्षे पूर्ण झाल्यावर जर मत दानाचा अधिकार मिळतो, लग्नाशिवाय एकत्र राहण्याचा “leave in relationship”  अधिकार मिळतो तर मग लग्नाचा अधिकार का मिळू नये? 

यात समानता आणायची असेल तर मुलांचे देखील लग्नाचे किमान वय १८ करावे अशी त्यांची मागणी आहे. 

त्याचबरोबर समाज भावनेचे देखील दाखले दिले जातात जिथे १८ वर्ष किमान वय आहे तरी देकील बाळ विवाह होतात मग २१ केल्यावर उलट बाल विवाहाचे प्रमाण वाढणारच. 

आज मुलींचे विवाहाचे वय वाढलें त्याला कायद्याची दहशद  जवाबदार नाही तर सुधारलेले जीवनमान कारणीभूत आहे म्हणून शासनाने विवाहाचे वय वाढवण्यापेक्षा मुलींची आर्थिक स्थिती कशी बळकट होईल, त्यांच्यासाठी शिक्षणाची संधी कशी निर्माण करता येईल यावर लक्ष द्यायला हवे. तसेच वय वाढवल्याने समाजात वेभिचार वाढण्याची देखील शक्यता निर्माण होते याकडे देखील हे लोक लक्ष वेधतात. 

२१ वर्ष मुलींचे विवाहाचे किमान वय असावे या मताचे समर्थन करणारे लोक आपल्या बाजूचे स्पष्टीकरण देताना काही महत्वाच्या मुद्द्यांवर भर देतात- 

मुलींना स्वतःचे करियर  घडवण्यासाठी संधी मिळते, कायद्याचे  कवच असल्यामुले त्या २१ वर्षांपूर्वी विवाहाला ठामपणे विरोध करू शकतात, आई होण्यासाठी त्यांचे शरीर आणि मन तयार होते, पत्नी कायम पतीपेक्षा वयाने लहानच असावी हा समाज मनावरचा गैरसमज पुसून टाकण्यास मदत होते इत्यादी. 

यावर चर्चा करण्यास भरपूर वाव आहे म्हणून चर्चा देखील व्हायला हवी. 

लिव इन रिलेशनशिपची नेमकी चौकट कोणती?    


म्हणून याकडे समाजात पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेम स्पर्श ब्लॉग द्वारे ऑनलाईन संशोधन करण्यात आले होते; याला अत्यल्प  प्रतिसाद मिळाला ६ पुरुष आणि ९ महिला एकूण १५ व्यक्तींनी प्रश्नावली भरून दिली. आम्ही काही प्रश्न विचारले त्याला कसा प्रतिसाद मिळाला ते पाहू- 

तुमच्या मते मुलींचे लग्नाचे किमान वय किती असावे? 

१५, १८, २१, २५ असे ४ पर्याय होते. ९ व्यक्तींनी 

२१ असा पर्याय निवडला तर ६ व्यक्तींनी २५ हा पर्याय निवडला. 

या परिवर्तनाने महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारणार का? हो ७, काही प्रमाणात ६, नाही १, आता सांगता येणार नाही १;  पर्याय निवडणाऱ्यांचे प्रमाण होते. 

मुलींच्या उच्च शिक्षणात वाढ होईल का? 

हो १०, सध्या सांगणे कठीण आहे ४, नाही १;  यास्वरुपात प्रतिसाद होता. 


नवं विवाहितेवर होणारे अत्याचार कमी होतील का? हो ७, या विरुद्ध महिला आवाज उठवतील ७, नाही १; या प्रमाणात प्रतिसाद होता. 

मुलींना वर म्हणजे जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य मिळणार का? कदाचित ७, हो ७, नाही १; असे मत व्यक्त केले. 

प्रेम विवाह वाढतील का? आता सांगता येणार नाही ७ हो ६, नाही २; याप्रकारे मत व्यक्त केले. 

समाज या बदलांचे स्वागत करणार का? हो ७, काही प्रमाणात ६ नाही १; या 

प्रमाणात  पर्यायानं पसंती दिली. 

एकंदरीत सर्वांचा दृष्टिकोन सकारात्मक होता; सहभागी व्यक्तींची संख्या अत्यल्प असल्यामुळे यावरून आपण समाज मनाचा ठोस निष्कर्ष काढू शकत नाही. तरी पण तरुणांनी दिलेला हा कौल बदलत्या विचारांचे स्वागत करणारा आहे. 

या प्रश्नावलीला प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचा मी ऋणी आहे. 

शेवटी कायद्याने  समाज मन बदलत नसले तरी कायद्यानेच सामाजिक क्रांतीला सुरक्षा मिळते या ढालीवर विश्वास ठेऊन परिवर्तनाच्या समशेरीला वैचारिक धार लावून प्रतिगामी विचार कापले जातात. सती प्रथा पहिले कायद्याने बंद केली मग समाजाने कालांतराने स्वीकारली, महिला पूणर विवाहाला कायद्याने मान्यता दिली मग समाजात महिला पूणर विवाह घडून येऊ लागले, हुंडाबंदि कायद्याने केली म्हणून आज हुंड्याचे प्रमाण काही प्रमाणात घेतले. 

कायद्यातील हा बदल समाज असा स्वीकारेल अशी अशा आहे. 

मुलींना शिक्षणाची संधी मिळावी, त्यांच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग खुला व्हावा, महिलांवरचे अत्याचार थांबावे, लिंगाधारित विषमता नष्ट व्हावी, सर्वत्र महिलांसाठी स्वतंत्र सौचालय बांधावे, त्याचबरोबर त्यांना प्रेम विवाहाची अनुमती समाजाने द्यावी, आई होण्यासाठी शारिरीक आणि मानसिक  तयारी होई पर्यंत वेळ द्यावा, लग्नाचा कुटुंबातून होणारा आग्रह थांबवा मला असे वाटते या वातावरणात भावनेच्या नव्हे तर तर्काच्या आधारे मुलगी लग्नासाठी तयार होईल तेव्हा तिने विवाह बंधनात पडावे प्रत्येकीच्या दृष्टीने वय वेगवेगळे असेल; पण यासाठी वयाची किमान २१ वर्ष वेळ घ्यावा. 

१८ वर्षाचे वय असताना निवडणुकीत दिलेले मत आणि १८ वर्षाचे असताना स्वतःच्या आयुष्याला कलाटणी देणारा घेतलेला निर्णय यात बरेच अंतर आहे. 

हे समजू नये एवढे आपण अज्ञानी नसू अशी अशा आहे.  


Photo Credit - Pexel




 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा