प्रेमाचे दान
अलीकडच्या काळात शिक्षण घेणाऱ्या मुलींची केवळ संख्याच वाढत नाही तर अशा सुशिक्षित मुलींमध्ये निर्णय घेण्याचे धाडस देखील कमालीचे निर्माण झाले आहे; त्यामुळे खऱ्या अर्थानें महिला सक्षमीकरण होत असल्याचे दिसते. मुलींची देशातील पहिली शाळा १८४८ साली फुले दाम्पत्याने सुरु केल्याची सर्वाना माहिती आहे त्याचबरोबर गेल्या कित्त्येक वर्षांपासून महिला सर्व क्षेत्रात आपली कर्तबगारी पारपडत असताना शेकडो वर्षांचा अज्ञानाचा धब्बा पुसण्यासाठी त्या झटत आहेत. याचे प्रमाण कमी असले तरी दिवसागणिक वाढत आहे त्यामुळे वर्तमानातील हि चळवळ उद्याच्या मुलींसाठी लैंगिक समानतेवर आधारलेला भारत देश घडवणार यात यत्किंचित हि शंका नाही. हे सर्व आशादायक चित्र असले तरी आज अनेक सुशिक्षित मुलींना आपला जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य नाकारले जाते त्यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा व्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे. आपल्या देशात लग्न ठरवताना कायम व्यक्तीपेक्षा त्याच्या हुद्द्याला प्राधान्य अधिक असते कारण आपल्यातील बाजारी मानसिकता दोघांची मिळकत लक्षात घेऊन विवाहासाठी मुलाची / मुलीची निवड करते....