प्रेमाचे दान

अलीकडच्या काळात शिक्षण घेणाऱ्या मुलींची केवळ संख्याच वाढत नाही तर अशा सुशिक्षित मुलींमध्ये निर्णय घेण्याचे धाडस देखील कमालीचे निर्माण झाले आहे; त्यामुळे खऱ्या अर्थानें महिला सक्षमीकरण होत असल्याचे दिसते. 

मुलींची देशातील पहिली  शाळा १८४८ साली फुले दाम्पत्याने सुरु केल्याची सर्वाना माहिती आहे त्याचबरोबर गेल्या कित्त्येक वर्षांपासून महिला सर्व क्षेत्रात आपली कर्तबगारी पारपडत असताना शेकडो वर्षांचा अज्ञानाचा धब्बा पुसण्यासाठी त्या झटत आहेत. 

 

याचे प्रमाण कमी असले तरी दिवसागणिक वाढत आहे त्यामुळे वर्तमानातील हि चळवळ उद्याच्या मुलींसाठी लैंगिक समानतेवर आधारलेला भारत देश घडवणार यात यत्किंचित हि शंका नाही. 

हे सर्व आशादायक चित्र असले तरी आज अनेक सुशिक्षित मुलींना आपला जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य नाकारले जाते त्यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा व्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे. 

आपल्या देशात लग्न ठरवताना कायम व्यक्तीपेक्षा त्याच्या हुद्द्याला प्राधान्य अधिक असते कारण आपल्यातील बाजारी मानसिकता दोघांची मिळकत लक्षात घेऊन विवाहासाठी मुलाची / मुलीची निवड करते. 

त्यातूनच विवाहासारख्या पवित्र संकल्पनेला बाजार पेठेचे स्वरूप प्राप्त होते; त्या बाजारपेठेतील दलाल मध्यस्ताच्या भूमिकेत राहून आपला नफा शोधतात. 

याच विकृतीतून आज देखील संपन्न घरात हुंडा बळी घेतले जातात त्याचेच एक उदाहरण, 

हुंडा बली 

 

या पुरुषी वर्चस्वाखाली आजवर जगणारी मुलगी आता हे गुलामीचे प्रतीक धुडकावून लावते आहे,  तिला स्वतंत्र रित्या अवकासात भरारी घ्यायची आहे,  आपल्या मनाला भावणार्या जुडीदाराशी विवाह गाठ बांधायची आहे,  पण त्यात अनेक बाधा येतात सुरुवातीला घरूनच तीव्र स्वरुपाचा विरोध होतो. 

तरी देखील अनेक मुली पालकांच्या सहमतीशिवाय प्रेम विवाह करतात.  पण आई-वडील मुलींसाठी तोडीसतोड स्थळ आणतात त्यावेळी जर एखाद्या मुलीचे दुसऱ्या मुलावर प्रेम असेल तर तिने काय करावे? 

तसेच आई-वडिलांनी किती हि चांगले स्थळ पाहिले असले तरी एखाद्या मुलाला दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करायचे असेल तर त्याने काय करावे? 

हि परिस्थिती निर्माण होण्यासाठी आपली सामाजिक व्यवस्था जवाबदार आहे जर समाजाने मुलं-मुलींना वैवाहिक जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य दिले तर असा गोंधळ निर्माण होणार नाही. 

पण वर्तमान समाज रचनेत मात्र पूर्णपणे प्रतिकूल स्थिती आहे. 

 

यातूनच काही तरुणाई मानवतेला काळिमा फासणारे कृत्य करते.  

एका आर्थिक दृष्ट्या श्रीमंत असणाऱ्या कुटुंबातील मुलीने तिच्या संपूर्ण कुटुंबाला संपवले कारण त्यांच्यापेक्षा आर्थिक दृष्ट्या मागास असणाऱ्या प्रियकराबरोबर तिला लग्न करू दिले नाही म्हणून. तिच्या या हत्याकांडामुळे तिला फासावर चढवले जाणार आहे. 

भारतातील फासावर जाणारी पहिली महिला तुम्हाला माहिती आहे का? 

तिच्या या वागण्याची तिला शिक्षा झालीच पाहिजे तसेच तिने असे पाऊल का उचलले आणि इतर पालकांनी कोणता धडा घ्यावा यासाठी नक्की वाचा-- 

फाशीच्या तक्तावर चडणार पहिली महिला 

 

आपण किती हि समानतेच्या गप्पा मारत असलो तरी मुलं-मुलींमध्ये विषमता आहे जर यावर कुणाचा आक्षेप असेल तर 

लग्न झाल्यावर जवळ-जवळ सर्वच बायका पतीच्या घरी नांदायला का जातात? 

हे पुरुष प्रधान संस्कृतीचे प्रतीक नाही का? 

हे वास्तव समजून ते बदलण्याचा प्रयत्न नक्की करावा लागेल 

हि विषमता सर्व प्रकाररे जाणवते जर मुलाचे लग्न ठरवायचे असेल तर मुलगी कमी कमावत असेल तरी चालते फक्त दिसायला सुंदर असली पाहिजे; 

पण मुलींच्याबाबतीत उलटे आहे मुलगा कसा हि दिसो पण त्याचे उत्पन्न मुलीपेक्षा जास्त असले पाहिजे. 

अनेक गृहिणी आहेत पण घर काम करणारे गृहस्थ शोधून अपवादाने सापडतील. 

 

या मानसिकतेतून  लग्न ठरवले जातात त्यासाठी बऱ्याचदा मुलींच्या इच्छा मारल्या जातात. 

जर मुलीला आपला नियोजित वर अमान्य असेल आणि तिला प्रियकराबरोबर संसार थाटायचा असेल तर तिने काय करावे? 

प्रत्येक गोष्ट क्षणात होत नाही त्याचा वास पहिलेच येतो. तुमच्या वागण्यातून कायम पुरुषी वर्चस्व धुडकावून लावा इतर मुलींपेक्षा आपण अधिक लाजाळू, कोमल, सुंदर दिसण्यापेक्षा बंडखोर, खंबीर, न्यायप्रिय, विनम्र, सात्विक पण कठोर, त्यापेक्षा एक माणूस म्हणून इतरांसमोर तुमची प्रतिमा निर्माण करा. 

 

यातूनच तुम्ही दुय्य्मत्वावर मात करू शकता जर तुम्ही या भूमिकेतून तुमच्यातील स्त्रीत्वासह जगाकडे पाहाल तर तुमच्या नजरेत एक वेगळेच तेज निर्माण होईल त्याने तुमची कोणती हि मनोकामना पूर्ण होणारच. 

आई-बाबा कायम आपले हित जोपासतात त्यांच्याकरिता आपल्यापेक्षा दुसरे कोणी महत्वाचे नसते म्हणून त्यांच्या भावनांचा आदर करत असताना तुमच्या स्वातंत्र्याचे रक्षण करा. 

एका सामान्य मुलीने दिव्यांग प्रियकराबरोबर लग्न केले. सुरुवातीला तिला घरातून विरोध होता तरी देखील तिने त्यांचे मन वळवले. 

जर ती करू शकते तर तुम्ही का नाही? 

तिने हे सहज कसे साध्य केले? 

जाणून घेण्यासाठी हे वाचलेच पाहिजे-- 

खुदाने त्याचे हात घेतले; ती त्याचे हात झाली.    

 

तुम्ही निवडलेला प्रियकर तोच कसा योग्य आहे हे पालकांना कसे समजावून सांगायचे? 

त्याच्यातील बळ स्थान सांगा,  त्याचा स्वभाव सांगा,  त्याची कष्ट करण्याची क्षमता आई-वडिलांना पटवून द्या,  इतरांपेक्षा तो कसा वेगळा आहे हे वेगळेपण लक्षात आणून द्या नक्कीच त्यांचे मन परिवर्तन होईल. 

मुलांच्या बाबतीत वेगळी अवस्था असते प्रत्येक होणाऱ्या सासू-सासर्यांना त्यांची सून कशी लक्ष्मी आहे हे जगाला सांगायची घाई झालेली असते; पण काही महिने उलटून गेले कि त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या सर्व काही,  न बोलताच सांगून जातात. 

मुलांना आवडत्या मुलीशी लग्न करणे फार अवघड नसते सर्व मुले मुली पाहायला जातात तसे जायचे सर्व स्थळ नाकारायचे शेवटी नातेवाईक कंटाळले कि ते हतबल होऊन एक दिवस म्हणतील “तुला जिच्याबरोबर लग्न करायचे कर पण एकाचे दोन हात कर” मग त्यांना तुमच्या मनातले गुपित सांगून मोकडे होऊन मनाला वाटेल तिच्याशी लग्न गाठ बांधू शकता. 

पण हे खरच एवढे सोपे आहे का? 

अनेक मुले आपले प्रेम प्रकरणे घरापर्यंत माहिती होऊ नये याची दक्षता घेतात त्यामुळे त्यांचे वागणे पारदर्शक नसते. 

त्यातून सावळा गोंधळ निर्माण होतो हे टाळण्यासाठी सुरुवातीपासून जाणीवपूर्वक प्रयत्न करा आपल्या या गुप्ततेच्या पालकांच्या प्रतिष्ठेवर नकारात्मक परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. 

तुमचे लग्न ठरवावे म्हणून ते अनेकांना मुलीचा शोध घ्यायला सांगतात आणि नंतर तुम्ही प्रेम विवाह करत आहात हे समजल्यावर ते तोंडावर पडतात हे टाळणे आपल्या हाती आहे. 

 

पण तुमच्या प्रियसीला आई-बाबा आनंदाने सून म्हणून स्वीकारतील का? 

ज्यावेळी मुलगी सासरी नांदायला येते तेव्हा तिच्या अनेक भूमिका असतात पत्नी, सून, भावजय, जाऊ, वहिनी,  गृहिणी इत्यादी  

म्हणून तिचा सर्वानी संबंधित भूमिकेत पूर्वग्रह न बाळगता स्वीकार करण्यासाठी वातावरण निर्मिती करणे तुमची सर्वांत मोठी जवाबदारी आहे. 

हे जवाबदारी यशस्वी रित्या पेलू शकलात तर तुमचे सर्व मार्ग स्वागतासाठी तयार आहेत. 

पालकांची कोणती भूमिका असावी? 

प्रत्येक पालकांना पाल्यापेक्षा जास्त अनुभव असतो त्यामुळे आपल्या पाल्यासमोरचे धोके हेरून ते सावधगिरी बाळगतात.  फक्त त्यांनी नवीन विचारांशी स्वतःला जोडून घ्यावे जनेकरून पालक आणि मुले हा संघर्ष होणार नाही. 

हि परिस्थिती केवळ तुमच्यावरच ओढवली नाही तर इंग्लंडच्या राजाला देखील अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला त्याच्या मुलीचा प्रियकर त्यांच्या दृष्टीने अगदी सामान्य होता. 

 मग त्या राजाने काय केले? 

जाणून घेण्यासाठी-- 

महाराणीच्या स्वप्नातील महाराजा 

 

फोटो - साभार गूगल


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नग्न मुलींची मिरवणूक

पुरुषांचा महिला दिन

बायकोचा जाच