ज्याच्यावर प्रेम नाही त्याच्यासोबत लग्न कसे करायचे?

सृष्टीच्या उगमापासऊन नर आणि मादी यांच्या मिलनातून आपल्यासारखा दुसरा जीव तयार होतो त्यालाच आपण प्रजनन म्हणतो. सुरुवातीला मानवी जीवन भटक्या स्वरूपाचे असले तरी त्याच्यातील काम भाव जागृत होते त्याच्या आधारावरच हे मानवी चक्र सतत फिरत राहिले कदाचित तत्कालीन पुरुषांना स्त्री एका बाळाला जन्म कसा देऊ शकते याचे ज्ञान नसल्यामुळे त्याला हे सर्व अदभूत वाटत असावे त्यातूनच मग स्त्रियांना देवतेचे स्वरूप प्राप्त झाले असावे. 

त्यानंतर त्याच्या विचारात परिवर्तन झाले आणि कोणती हि स्त्री पुरुषाच्या सहभागाशिवाय मुलं जन्माला घालू शकत नाही याची जाणीव झाली असावी. त्याकाळात या भटक्या माणसाचे जीवनमान थोडेसे बदलले तो स्थिर झाला एका जागी राहून जमीन कसायला त्याने सुरुवात केली त्यातूनच स्त्री-पुरुषांमध्ये एक वेगळे नाते निर्माण झाले ते एकमेकांच्या लैंगिक गरजा भागवणारे २ भिन्न लिंगी व्यक्ती राहिले नाहीत तर त्यापलीकडे एकमेकांना भावनिक आधार देणारे,  मानसिक समाधान देणारे,  आनंदात हसणारे,  दुःखात रडणारे,  एकमेकांसाठी झटणारे सहचारी बनले. 

 

त्यामुळेच त्यांच्यातील लैंगिक सम्बन्ध स्थिर झाले असतील मग एका स्त्रीने अनेक पती करणे एका पुरुषाने अनेक पत्नी करणे या विविध बदलांसह एकास एक हि विचारधारा रुजू लागली आणि त्यातूनच या विचारधारेला मान्यता मिळवून देण्यासाठी विवाह संस्थेचा उदय झाला. 

ती संस्था आज जगातील सर्व समाज रचनेत आढळते तिचा हा प्रवास अद्याप देखील थांबला नसून तो अविरत सुरु आहे. 

त्या प्रवासात आज आपली पिढी सहभागी होत असताना डोक्यात अनेक प्रश्न तसेच मनात अग्निक शंका घेऊन या अविरत मानवी सृष्टीची भ्रमंती करणाऱ्या विवाह संस्थेची पालकी खांद्यावर घेऊन चालते आहे. 

आज आमच्या समोर अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत 

प्रेम विवाह कि ठरवून केलेला विवाह, अंतर जाती विवाह कि जाती अंतर्गत विवाह, विवाह हा करार आहे कि संस्कार आहे. 

या सर्व प्रश्नाचा काला करण्याचे कारण आज २ पिढ्यांमधील अंतर प्रचंड वाढले असल्यामुळे आई-बाबा आणि मुले यांच्यात प्रचंड वैचारिक मत भेद आहेत हि कुना एकाची वयक्तिक समस्या नसून ती एक सामाजिक समस्या आहे. 

 

आज अनेक जण महाविद्यालयात प्रेमात पडतात त्यानंतर त्याचे लग्नात रूपांतर होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत त्यांना हतबल होऊन वडीलधाऱ्या माणसांपुढे मान झुकवावीच लागते. त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होतो त्यांना ज्याव्यक्तीवर प्रेम नाही तिच्याशी अथवा त्याच्याशी  विवाह गाठ बांधावी लागते. अशा अपयशी प्रेमी तरुण-तरुणींच्या मनात एक प्रश्न येतो ज्याच्यावर प्रेम नाही त्या व्यक्तीबरोबर संसार कसा करायचा? 

आपल्या तथाकथित प्रतिष्ठेसाठी मुलांच्या मनाविरुद्ध त्यांचे लग्न लावून देणे नैतिकतेला धरून आहे का? 

अनेकांच्या बाबतीत असे झाले असण्याची दात शक्यता आहे कदाचित नवऱ्याचे बायकोवर किव्हा बायकोचे नवऱ्यावर अजिबात प्रेम नसताना केवळ त्यांचे लग्न झाले म्हणून सोबत राहावे लागते. 

हि वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून काय करावे? 

आयुष्यात निर्णय घेण्यास घाबरू नका पण कोणता हि निर्णय घेण्यापूर्वी सर्वांगाने विचार करा. 

प्रेम हि जगातील सर्वाधिक शक्तिशाली ऊर्जा आहे जर तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करणारे कोणी असेल तर या त्रिभुवनांत तुम्हीं अजिंक्य आहात हा विश्वास बाळगा पण केवळ आकर्षणाला प्रेम समजून तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर कदाचित एक दिवस तुम्ही वेगळ्या दुनियेत असाल जिथे तुम्हाला व्यक्ती म्हणून ओळख नसेल समाजात राहत असताना आपण हिंस्त्र पशूंच्या सानिध्यात राहत असल्याची तुमची भावना होईल. 

हे टाळणे शक्य आहे त्यासाठी जर तुम्ही प्रेम विवाह  करत असाल तर त्याची कल्पना आपल्या आई वडिलांना लवकर द्या तरी देखील त्यांचे सहकार्य मिळत नसेल तर प्रेमाचा धागा अखंड ठेवण्यासाठी त्याच धाग्याने तुमची ७ जन्माची गाठ बांधा पण आई-वडिलांकडे दुर्लक्ष करू नका. 

तुम्हाला वाटत असेल आई-बाबा कि गर्ल फ्रेंड यांच्यात निवड कशी व केव्हा करावी? यावर माझे विचार वाचण्यासाठी-- 

आई-वडील कि गर्ल फ्रेंड निवड कोणत्या वेळी कशाप्रकारे करावी? 

 

वरील लेख वाचल्यावर प्रेम विवाह करणाऱ्यांच्या मनातील अनेक शंकांचे निराकरण होऊ शकते. 

पण ठरवून ज्यांचे विवाह होतात त्यांनी काय करावे? 

हि  पद्धत आपल्या देशातही सर्व धर्मीयांमध्ये आदर्श समजली जाते. 

त्यात बहुतांशी वेळा  केवळ मुलाच्या पसंतीला प्राधान्य देत असताना मुलीच्या वडिलांची सहमती हीच मुलीची पसंती समजून असे विवाह सम्पन्न होतात त्यानंतर सासू सुनेचे शीत युद्ध सुरु होते त्यात बाह्य इजा न पोहचवणारे अनेक वार कात्रीत सापडलेल्या मुलाला / नवऱ्याला सहन करावे लागतात केवळ समाजात मान खाली झुकू नये म्हणून कसं तरी हे जगणे आल्या दिवसाला ढकलण्यासाठी सुरु असते. 

म्हणून लग्न ठरण्यापूर्वी आपल्या स्वप्नातील जोडीदाराचे निकष ठरवून घ्यावे आणि त्या चौकटीत बसणाऱ्या जोडीदारासोबतच विवाह करायचा. 

 

तुमच्या विचारांचा घरात सन्मान केला जात नसेल तर 

शांतपणे पण ठाम राहून नाही म्हणण्याचे धाडस करा. 

विवाह हा संस्कार आहे कि करार? 

संस्कार म्हणून स्वीकारला तर त्या चौकटीतून बाहेर पडण्यास संधी नसते. 

आणि करार म्हणून मान्य केल्यास त्यात आत्मिक जिव्हाळ्याचा भाव नसतो. 

म्हणून हा एक जीवनअनुभवाचा प्रगतीच्या दिशेने जाणारा मार्ग आहे प्रसंगी या मार्गात काही अड्थडे येत असतील तर नवीन मार्ग शोध आणि चालत राहा शेवटचा श्वास घेईपर्यंत. 

जात / धर्म कडी हि प्रेमाचे निकष नसतात कारण या सर्व शक्तिमान ऊर्जेत त्यांचा टिकाव लागणे अशक्य आहे. 

पण आपल्या भारतीय समाजात तुमच्या जाती धर्माशिवाय स्वतःची ओळख अपूर्ण ठरते मग या अदृश्य जातीच्या दार खिडक्या नसलेल्या घरात दुसऱ्या घरातील मुलगी सून म्हणून कशी आणायची? 

किव्हा जावई म्हणून कसे जायचे? 

थोडक्यात अंतर जातीय प्रेम  विवाहात येणाऱ्या अड्थड्यांचा सामना कसा करायचा? 

एकदा जातीची हत्या केली कि सर्व काही सुरळीत होईल असे नाही कारण जातीने रक्ताच्या नात्याची हत्या केली आहे. 

म्हणून तिच्याशी शस्त्राने न लढता शास्त्राने लढावे लागणार त्यासाठी समाज शास्त्र समजून जाती बाहेर लग्न करणाऱ्या यशस्वी व्यक्तींबद्दल आपल्या आई-वडिलांना सांगा कदाचित याने काही फरक पडणार नाही. पण या बदलाचे वारे त्यांच्या  मनाला स्पर्श करून जातील. 

त्यानंतर त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करा त्यात यश आले नाही तर दुर्दैवाने त्यांची असहमती असताना अंतर जातीय विवाह करा. 

 

पण त्यानंतर तुमच्यातीळ  खऱ्या मुलाची परीक्षा असते काही दिवस तुम्हाला समाजासह तुमचे आई-बाबा वाळीत टाकतील पण तुम्ही जर त्यांच्या विषयी मनात द्वेष बाळगला नाही तर एक दिवस ते घरात तुमचे स्वागत करतील फक्त नैतिकतेची कास सोडू नका आणि आपल्या जन्मदात्यांना कायद्याच्या फासत अडकवू नका. 

कारण आज तुम्ही ज्या ठिकाणी पोहचला आहात फक्त त्यांच्यामुळे. 

अंतर जातीय विवाहाचा एक नमुना-- oजातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

 

  

फोटो - साभार गूगल


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नग्न मुलींची मिरवणूक

पुरुषांचा महिला दिन

बायकोचा जाच