महिलांवर ठरवून अत्याचार केले जातात
एका ठिकाणी ठीगड लावलं तर दुसऱ्या ठिकाणी फाटतच हि अवस्था आजच्या महाराष्ट्राची झाली आहे.
महिला अत्याचाराची साखळी अद्याप तोडण्यात आपल्याला यश आलेलं दिसत नाही पुण्यातील सामोहिक अत्याचार त्या नंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईतील साकी नाका प्रकरण घडले ते शांत होत नाही तोच उल्लास नगर मध्ये घडलेली घटना या सर्व घटनांकडे पाहताना मनात एक शंका येते;
महिला अत्याचार ठरवून केले जातात का?
हि शंका वाटणे स्वाभाविक आहे कारण गेल्या काही दिवसांपासून अगदी नियोजित पद्धतीने महिलांवर / मुलींवर अत्याचार केले जातात.
त्यात देखील महाराष्ट्रातील २ मोठ्या शहराचा यात समावेश आहे म्हणजे या नराधमांनी आपल्या सुरक्षा व्यवस्थेला वेठीस धरण्यासाठी निष्पाप मुलींचा / महिलांचा घास घेण्याचा घृणास्पद मार्ग निवडला आहे.
त्यामुळे सर्व प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करत असताना या सर्व घटनांमध्ये काही एकमेकांना जोडणारे धागे-दोरे आहेत का?
याचा देखील पोलिसांनी विचार करावा त्याचबरोबर करविता धनी दुसरा कोणी आहेका?
याचा देखील तपास घेणे गरजेचं आहे.
उल्लास नगर मध्ये एका अल्पवयीन मुलीवर एका पडक्या घरात एका गुंडाने अत्याचार केला पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या हे सर्व आपण या आधी वाचले असेल म्हणून सविस्तर घटना क्रम मांडत नाही.
वारंवार अशा घटना घडतात काही दिवस यावर राजकीय इव्हेन्ट होतात नंतर हे सर्व प्रकरणे न्यायालयात धूळखात पडतात आणि आपण ते सर्व विसरतो; त्यानंतर अशी घटना पुन्हा घडली कि जखमेवरची खपली उडावी तश्या आठवणी जाग्या होतात फक्त ते प्रकरण मागे पदे पर्यंत.
अशा गंभीर घटनांचा आपल्याला विसर पडावा असे आपण एवढे कुठे व्यस्थ आहोत?
याचा विचार केल्यास आपल्या मनात स्त्रियांबद्दल प्रचंड अनादर आहे त्यामुळे स्वतःच्या कुटुंबातील स्त्रीला न्याय न दिणारे आपण जिच्याबरोबर रक्ताचे नाते नाही तिच्यासाठी का लढणार.
समाज माध्यमावर सर्वजन प्रतिक्रिया व्यक्त करतात त्यातीलच काही मजकूर कॉपी पेस्ट करण्यात आपण साहस दाखवतो ते केवळ आपल्या पोस्टला लाईक शेर मिळावे म्हणून त्याशिवाय आपला दुसरा हेतू असण्याचे कारणच नाही.
या आभासी जगातील स्वतःच्या फुगीर प्रतिमेत व्यस्त असणारा समाज आपली सामाजिक बांधिलकी विसरतो म्हणून अप्रत्येक्ष रित्या स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराला आपण सर्वच जवाबदार आहोत.
पावसाळ्यात शेतकऱ्याने आपल्या शेतात पेरणी केली नाही तर गवत उगवतच तसेच जर लहानपणापासून लैगिक समानतेचे संस्कार केले नाही तर या मुलां मध्ये स्त्रियांचा वस्तू म्हणून उपभोग घेण्याची विकृत मानसिकता आपले डोके वर काढते.
हि वृत्ती कित्त्येक शतकांपासून चालत आली आहे याला अनेक थोर महात्मे आधार देत आले आहेत पहिल्या महिला dr. रखमाबाई राऊत यांचे जीवन समजून घेतल्यावर अगदी लोकमान्य टिळक देखील कसे स्त्री अत्याचाराला कारणीभूत आहेत हे लक्षात येईल.
उपेक्षित महिला डॉक्टर
https://www.premsparsh.com/2021/04/blog-post_17.html
हे केवळ एक प्रातिनिधीक उदाहरण आहे.
स्त्रियांवर होणाऱ्या शारिरीक तसेच लैंगिक अत्याचाराविषयी काही प्रमाणात चर्चा होत असली तरी तिच्या अस्तित्वाला न स्वीकारणारा समाज तिच्यावर क्षणोक्षणी अत्याचार करीत असतो.
स्त्रीची खरी शत्रू स्त्रीच असते कारण ती तिच्या सारखे लिंग घेऊन जन्माला आलेल्या मानवी प्रजनातून निर्माण झालेल्या हाडा-मासाच्या सजीव गोळ्याला माणूस म्हणून वाढू देत नाही पंख फुटण्या आधी तिचे पंख छाटले जातात.
त्यातूनच घरातील मुलाला हवं ते दिले जाते आणि मुलीला घर कामाला जुंपले जाते तिच्या बालपणावर अतिक्रमण करणारे पहिला अत्याचार करतात.
दुसरा अत्याचार अदृश्य धर्म करतो कारण या धर्माच्या माध्यमातूनच तिला व्रतवैकल्य करण्यास भाग पाडले जाते त्यामाध्यमातून प्रत्येक स्त्रीने पतीव्रता असावे म्हणजे या जगात ती केवळ पतीच्या इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी जन्माला आली आहे; थोडक्यात त्याच्या अस्तित्वाला सुगंध यावा म्हणून तिने चंदनासारखे झिजावे तरी एवढे सर्व समर्पित केल्यावर त्याने हे चंदन पाया खाली तुडवले तरी तिने आपला धर्म सोडू नये कारण तोच खरा पत्नी धर्म आहे. नवरा पिणारा असला तरी एक निष्ठ पत्नी एकटीच्या अंगावर संसाराचे ओझे पेलते तेव्हा हा समाज तिच्या मदतीला धावून जात नाही.
विचार करा जर एखादी पत्नी दारू पीत असेल तर तिच्याबरोबर कोणी संसार करायला तयार होईल का?
एवढ्यावरच हा धर्म थांबत नाही तर या धर्माच्या नावाने पिसांडलेले भोंदू सोडतो ते देखील तिच्यावर आपले पुरुषी वर्चस्व गाजवतात; आणि त्याची आसाराम सारखे अनेक उदाहरणे आपणास माहिती आहेत.
या सर्व अत्याचाराला तोंड देण्यासाठी तिला नाही म्हणण्याचे सामर्थ्य शिक्षक हे शाळेच्या माध्यमातून देत असतात; पण त्यात शिक्षकांना किती यश आले हा संशोधनाचा विषय आहे.
शिक्षण हे आचरणात उतरत नाही हे वास्तव आहे कारण विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनी देखील काळ बाह्य रुढींचे पालन करतात त्यावेळी त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन लोप पावतो.
घरात मुलाचे शिक्षण आणि मुलीचे लग्न हि चर्चा सुरु असताना मुली मला देखील शिकायचे आहे हे ठणकावून का सांगत नाहीत?
कारण त्यांना प्रश्न विचारायला शिकवले जात नाही आई सांगते “मुलींनी ४ माणसात बोलू नये” त्यावेळेपासून एकदा ती अबला झाली कि मग माझ्यासोबत जे काही होत आहे ते सर्व माझ्या नशिबात आहे त्यामुळे नशीब कोणी बदलू शकत नाही म्हणून मुकाट सर्व सहन करायचे आणि कुठे हि तक्रार करायची नाही.
मग तिने कसे असावे, कसे हसावे, कसे लाजावे, कसे वागावे, कोना सोबत जगावे हे सर्व निर्णय पुरुषच घेतात फक्त ती एक कृत्रिम मानव असते लहानपणी वडील तारुण्यात पती वृद्धपकाळात मुलगा चेहरे बदलतात पण वृत्ती मात्र कायम असते.
यात तिने बंद केला, आपल्या अस्तित्वासाठी प्रवाहाविरुद्ध जायचे ठरवले तर संपूर्ण समाज तिचे लचके तोडायला आतुर असतो.
हि परिस्थिती आता बदलत असली तरी अपेक्षित बदल झालेला दिसत नाही. याला अनेक अपवाद आहेत त्या सर्वाना सलाम
सर्व कायदे महिलांच्या बाजूने असताना त्यांना समानतेचा अधिकार असताना आज देखील महिलांवर अत्याचार का होतात?
कारण महिला पेटून उठत नाहीत एकटीने प्रयत्न केला तर समाज तिला संपवेल पण एकीने लढा उभारला तर हि पुरुषी वर्चस्वाची मानसिकता संपेल.
शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे सावित्रिबाई, महासाहेब जिजाऊ, राणी लक्षीमीबाई, संत जनाबाई, ते आजच्या बंडखोर सर्व महिला तुम्हाला मार्ग दाखवत आहेत फक्त त्या वाटेने जाण्याची तयारी करा.
तुमचा मुलगा म्हणून मी तुमच्या सेवेस तत्पर आहे भाऊ म्हणून ढाल घेऊन येईल मित्राच्या भूमिकेतून सहकार्य करण्याची माझी तयारी आहे चला या वैचारिक युद्धाचा शंख फुंकू
फोटो - साभार गूगल
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा