धोक्याची घंटा

सुरुवातीला मानव हा इतर प्राण्यांसारखे लैंगिक सम्बन्ध ठेवत असे त्याच्यावर कुणाचे नियंत्रण नव्हते. 

या अनियंत्रित मानवी समाजात सर्व काही अनिश्चित होते जसे आजच्या प्राणी  मात्रांमध्ये आहे. 

त्यानंतर मानवी जीवन बदलत गेले त्यात आमूलाग्र बदल आज झालेले दिसत असले तरी ते सर्व एकाचवेळी झाले नसून टप्प्या-टप्प्याने झाले आहेत ते थेट आजच्या स्थितीपर्यंत येऊन पोहचले असून त्यात प्रत्येक दिवशी सूक्ष्म बदल घडून येत आहेत. 

 

भटका माणूस टोळी करून राहायला सुरुवात झाल्यावर त्याच्यातील जवाबदार्यांची वाटणी झाली त्यापैकी काही पुरुषांकडे तर बहुतांशी स्त्रियांच्या खांद्यावर आल्या. 

परिणामस्वरूपी एवढे जवाबदार्यांचे ओझे पेलत असताना तिच्या स्वातंत्र्याचा श्वास गुदमरला आणि तिने स्वतःला ४ भिंतींच्या आत बंदिस्त करून घेतले; या अवस्थेपर्यंत तिला नेऊन ठेवण्याचा कट पुरुषांनी रचला हे उघड सत्य आहे. 

आज कुटुंब नियोजनाचे साधने विकसित झाली असली तरी त्याबाबतीत लोकांमध्ये जागरूकता नाही. 

जसे ५० वर्षांपूर्वी सर्व धर्मीय अनेक मुलांना जन्माला घालायचे ती वेळ आज पुन्हा येऊ शकते. 

 

कारण धर्माचे प्राबल्य अद्याप देखील कमी झाले नाही याविज्ञान युगात धार्मिक अज्ञानाने लोक ग्रासले आहेत. म्हणून काही धर्मांध लोक आपल्या धर्मियांना जास्त मुलांना जन्माला घाला असे आवाहन करताना दिसतात. 

त्याकाळातील स्थिती असो अथवा वर्तमानातील वास्तव भविष्यातील धोका सर्व लोक संख्या वाढी बरोबर अनेक विद्वंसक विकृतीला खत पाणी घालणार हे निश्चित. 

पूर्वी जातीचे प्रचंड वर्चस्व असल्यामुळे या जातीय व्यवस्थेला उघडे पाडण्याची हिम्मत कोणी करत नसे; पण शिक्षणामुळे लोकांमध्ये जातीला ठेंगा दाखवण्याचे धाडस निर्माण झाले हे आपल्या सर्वांगीण प्रगतीला अनुकूल असले तरी अद्याप अस्तित्वात असणारी जातीयतेची उतरंड हा विवेकी मार्ग उखडून टाकण्यासाठी सर्वशक्ती एकवटून झटते आहे. 

त्यामुळेच अंतर जातीय विवाह ठरवून घडवून आणले जात नाहीत तसेच अशा प्रेम विवाहाला प्रचंड विरोध होतो. विचार करा जाती व्यवस्था एवढी कट्टर आहे तर २ धर्मीयांमध्ये जर विवाह झाला तर काय होईल? 

या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला हा लेख मदत करू शकते--  

धर्माच्या भिंती मोडतात तेव्हा

 

आज तरुण पिढीच्या मनात जात प्रवेश करेलच असे नाही कारण या पिढीच्या जाणीव समृद्ध होत आहेत त्यामुळेच त्यांना जाती पेक्षा माणसांवर जास्त प्रेम करायला आवडते. 

आपण अनुभवले असेल एखाद्या मुलीने दुसऱ्या जातीतील मुलाबरोबर लग्न केले तर तिच्या कुटुंबातील लोक त्यांचे जगणे दुरापास्त करून सोडतात. 

अशा वेळी अनेकींच्या मनात एक यक्ष प्रश्न निर्माण होतो 

जातीय व्यवस्थेतील उच्च समजल्या जाणाऱ्या जातीतील मुलीने या उतरंडीत खालच्या जातीच्या मुलाबरोबर लग्न आई-वडिलांची संमती नसेल तर कसे करावे? 

हि तुमच्या खऱ्या प्रेमाची परीक्षा आहे. जसे परीक्षार्थी उत्तीर्ण होण्यासाठी आपल्या बुद्धीला कष्टाच्या खरपावर घासून ज्ञान प्राप्त करतो तसेच माणसाला माणसापासून दूर करणाऱ्या जातीच्या आवरणाला तोडण्यासाठी तुमची समशेर तयार ठेवा. 

 

मग लाटा येऊ दे नाही तर सुनामी निर्णयावर ठाम राहा  कारण सोन्याला चमकण्यासाठी घाव सहन करावेच लागतात त्याशिवाय त्याला किंमत मिळत नाही. 

आयुष्य हे एकदाच मिळते म्हणून ते स्वतःच्या मर्जीने जगा त्यात अनावश्यक इतरांचा हस्तक्षेप होऊ देऊ नका. 

तुमच्या समोर अंधार असला तरी त्याच्याशी एकरूप व्हायला शिका नंतर त्यात तुम्हाला समोरचे स्पष्ट दिसायला लागेल म्हणजेच 

समस्या कोणती हि असो त्यावर सखोल विचार केल्यास मार्ग नक्की सापडतो. 

तुम्ही जर अंतर जाती विवाह करायचे ठरवले असेल तर त्याची घाई करू  नका जनेकरून या मिळालेल्या वेळेत उद्या येणाऱ्या संकटाना भिडण्याची शक्ती एकवटू शकता. 

सर्व प्रथम आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहा त्यानंतर कदाचित तुमच्यावर हल्ला झाला तर आत्मरक्षण करण्याचे प्रशिक्षण घ्या आणि त्यापेक्षा महत्वाचे तुमचा संसार थाटण्यासाठी स्वतःचे घर असले पाहिजे. 

कदाचित  नोकरी लागून ३-४ वर्षात ते शक्य नसेल तरी देखील तुम्ही ज्या भाड्याच्या घरात राहता ते तुमच्यासाठी सुरक्षित आहे का?

हे तपासून पहा. त्यानंतर देखील तुमच्या जीवाला धोका आहे असे वाटत असेल तर याची माहिती पोलिसांना द्या जनेकरून तुमचा जीव सुरक्षित राहू शकेल. 

 

नंतर विवाह करा त्याची घरून सहमती मिळाली नाही तरी त्यांच्याविषयी द्वेष मनात ठेवू नका कारण त्यांच्यावर झालेले संस्कार आणि तुमच्यावर झालेले संस्कार वेगवेगळे आहेत म्हणून मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करा. 

अशे वाटेतील काटे ज्यांना उचलून दूर करता येतात ते आयुष्यात कायम यशाच्या शिखरावर पाय ठेवतात याचे मूर्तिमंत उदाहरण माझी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे आहे. त्यांची प्रेमकथा तुम्हाला माहीती आहे का? 

तर मग नक्की वाचा-- 

नकारत दडलेला होकार 

 

इंदिरा गांधी यांचे जीवन समजून घेतल्यावर आपल्याला स्वतःसमोरचे प्रश्न फार छोटे वाटतात.  

या युगात प्रेम विवाहाला विरोध होण्याचे आणखी काही महत्वाचे कारणे आहेत- 

प्रेम आणि भिन्न लिंगी व्यक्तीविषयी  वाटणारे आकर्षण यातील फरक नसमजणाऱ्या व्यक्तींच्या हातून होणाऱ्या चुकांमुळे समाज व्यवस्थेला अनेक हादरे बसतात त्यामुळे एकसंध असणाऱ्या समाजाला भेगा पडल्या आहेत. 

नैतिकतेच्या चौकटीत राहून नाते जोपासने हे आदर्श समाजाचे लक्षण आहे. 

आपल्या आधीच्या पिढींमध्ये कुटुंब नियोजन वैगेरे सर्व थोटांग समजले जात असे त्यामुळे त्यांचा लहान मुलगा आणि मोठ्या मुलीचा मुलगा एकाच वर्गात शिकतात त्यामुळे त्यांच्यातील नाते रक्तापेक्षा मित्रत्वाचे अधिक घट्ट असणे स्वाभाविक आहे. 

पण कल्पना करा यातील एक मुलगी आणि दुसरा मुलगा असेल आणि त्यांनी लग्न करायची इच्छा व्यक्त केली तर? 

आपण सर्व उत्तरे गुगलद्वारे शोधण्याचा प्रयत्न करतो या गुगल बाबाला अनेकांनी असे विचित्र प्रश्न विचारले, 

१ माझे काकांवर खूप प्रेम आहे पण आमच्या लग्नाला घरून तीव्र विरोध होतो काय करावे? 

२ मामा भाचीला एकमेकांशी लग्न करायचे आहे पण काय करावे? 

३ माझ्या वडिलांच्या मावशीचा मुलगा माझ्याच वयाचा आहे त्याच्याबरोबर लग्न करावे का? 

हे लोक गुगलद्वारे तपासून पाहतात कारण त्यांच्या मनात अशी इच्छा आहे यातूनच खरा भूकंप होण्याची शक्यता निर्माण होते. 

जर या प्रकारे विवाह सुरु झाले तर हा मानवी समाज उद्वस्त होऊन फक्त एक वन्य प्राण्यांचा कळप उरेल त्यामुळे नैतिकता ढासळेल असे वागू नका.  

तुमचे जर या जिवलगांवर एवढेच प्रेम असेल तर त्यातील लैंगिक आकर्षण वजा करून एकमेकांवर प्रेमाचा मुसळधार पाऊस पाडा आणि चुम्ब-चुम्ब भिजा. 

या नात्याला जपायचे आहे आणि समाज हित साधायचे आहे. 

हे सर्व तुम्हाला काल्पनिक जग वाटत असेल तर हा लेख वाचलाच पाहिजे कारण चक्क जावई आणि सासू घरातून पळून गेले आणि त्यांनी लग्न केले सविस्तर वाचण्यासाठी-- 

सासूच्या प्रेमात जावाई  


फोटो - pixabhay aap



 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नग्न मुलींची मिरवणूक

पुरुषांचा महिला दिन

बायकोचा जाच