ज्योतिबाची नस
महात्मा जोतीराव गोविंदराव फुले या कर्म योगी, विचारवंत, समाजाची नस ओळखणाऱ्या वैद्याने आजच्या दिवशी सण १८९० साली निर्मिकाच्या दिशेने प्रस्थान केले . त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन कर्तृत्वाचा वटवृक्ष महात्मा फुले हजारो वर्षांपासून आपल्या या अवस्थेला जवाबदार कोण? या प्रश्नाचे उत्तर इथल्या बहुजनास ठाऊक नव्हते. त्याचा ठाव घेण्या इतपत त्यांचा बहुधिक विकास देखील होण्याचे कारण नाही; शिक्षण फक्त अभिजन पुरुषांची मक्तेदारी होते. या शिक्षणात कार्यकारणभावाचा अभाव असल्यामुळे आपल्या माता भगिनी शिक्षणापासून वंचित आहेत याची खंत अभिजन पुरुषाला वाटणारच कशी. उभ्या आयुष्यात जनतेच्या सेवेस अर्पण केलेल्या सेवकाची कर्म गाथा आपल्या मेंदूत सेवाभाव ऊतराव म्हणून आजचा प्रपंच. एकदा हिटलरने एका कोंबडीचे पंख छाटले त्यापासून ती कोंबडी त्याचा माघे-माघे फिरत असे तो तिला दाना टाकायचा त्यावरच ती आपले पोट भरायची. कितीतरी शतकांपूर्वी काही...