शेतकऱ्याची खुर्ची
राजा तुझी दशा आहे केविलवाणी,
ह्ळ ह्ळ तेरे मन मन डोळ्यामध्ये येते पाणी..
विकासाच्या नावाने निसर्गाचा विनाश केला आणि या प्रगतीच्या चक्रात माझा शेतकरी बाप होरपडून मेला.
“जय जवान जय किसान” अशा घोषणा दिल्या जातात येथे;
पण या घोषणांच्या आक्रोशात बळी राजा उधवस्त झाला. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटे माझ्या पूर्वजांची परीक्षा घ्यायचे आता देखील तोच पेपर आम्ही सोडवतो; फक्त सुलतानशाही गेली असली तरी लोकशाहीतील सत्ताधीश परीक्षकाच्या खुर्चीत बसले.
पक्ष-प्रतिपक्ष राजकारणाचे डाव आमच्या बांदावर मांडतात पण त्यांच्या लढाईत किसान धारातीर्थ पडला.
स्वातंत्र्यापासून आजमितीस शेतकऱ्याने जे-जे म्हणून शासनाच्या जबल्यातून खेचले असेल त्यासाठी त्याला रक्त सांडावे लागले अनेकांना प्राण द्यावे लागले हा इतिहास दिवसागणिक त्यात भर घालतो आहे.
काल दीडवर्षापासून राजधानीच्या वेशीवर सुरु असणाऱ्या आंदोलकांना पंतप्रधानांनी सुखद धक्का दिला
त्यांची कडी हि भेट न घेता ३ कृषी कायदे माघे घेण्याचे आश्वासन दिले.
या कायद्यांविषयी आपणास माहिती असेलच म्हणून येथे नमूद करत नाही.
पण माननीय पंतप्रधांनाला शेतकऱ्यांच्या वेदनेची झड तेव्हा पोहचली जेव्हा ७०० पेक्षा जास्त शेतकरी बंधू-भगिनीला हे जग सोडून जावे लागले.
पण आमचे साहेब कामात एवढे व्यग्र असतात कि, बरोबर त्यांना निवडणूक तोंडावर असली कि जाग येते एरवी ते पूजा अर्चना करण्यात व्यस्त असतात.
त्यांनी वयक्तिक आयुष्यात काय करावे हे सांगण्याचा अधिकार आम्हास नाही फक्त देशाचे पंतप्रधान असताना नागरिकांच्या समस्येकडे डोळे उघडून पाहावे हीच मागणी आहे.
हि काही संघर्षाची पहिलीच वेळ नाही तर अगदी स्वातंत्र्यापासून किंबहुना त्यापूर्वीपासून आपल्याला शेतकऱ्याचा शिवारा बाहेरचा संघर्ष समजून घेता येईल.
जास्त इतिहासात न शिरता केवळ १०० वर्ष माघे जाऊन परत येऊ चंपारण सत्याग्रह बापूनी का केला?
खेड सत्याग्रह करण्याचे कारण काय?
या सर्व ठिकाणी सोशीत शेतकरी असला तरी शोषकाच्या भूमिकेत गोरे होते.
त्यानंतर साधारण १० वर्षांनी महाराष्ट्रातील कोकण विभागातील चेरी
गावाच्या परिसरात तब्ब्ल ६ वर्षे शेतकऱ्यांनी संप केला तेव्हा कुठं खोती प्रथा रद्द झाली. आणि स्वतंत्र भारतात कुल कायदा मंजूर करण्यात आला.
पण याने सर्व प्रश्न सुटले असे नाही तर यानंतर खऱ्या संघर्षाला तोंड फुटले. निसर्गाच्या मर्जीवर शेतकरी वावरात घाम गाळायचा लालफितीच्या कार्यशैलीनुसार चालणारे सरकार त्याच्याकडे लक्ष देण्याच्या मनस्थितीत नव्हते.
देशाला युद्धाला सामोरे जावे लागले तेव्हा किसानांनी लोकांच्या अन्नाची गरज भागवली तर शेतकरी पुत्र जवानांनी सीमेच्या रक्षणाची जवाबदारी नेटाने तळहातावर प्राण घेऊन पारपडली.
त्यानंतर सत्तरच्या दशकात हरित क्रांती झाली असे म्हणतात पण माझ्या बापाच्या जगण्याची भ्रांती दूर झाली नाही हे मला माहिती आहे. मग तुम्हीच सांगा अशा क्रांतीवर कसा विश्वास ठेऊ?
ब्र झाली असेल हि पण त्याने अल्पभूधारक शेतकऱ्याच्या जगण्यात फरक पडला नाही.
थोड्या फार शेतकऱ्यांचा फायदा झाला असेल तर आनंद आहे.
त्यानंतर आपल्या अर्थ व्यवस्थेने जागतिकीकरणाचा स्वीकार केला परिणामी शेतकरी भिकेला लागला.
‘S E Z’ स्पेशल इकॉनॉमिक झोन औद्योगिक विकासासाठी तारक असले तरी शेतकऱ्यांसाठी मार्क ठरले.
त्यामुळे नंतर उदरनिर्वाह भागवण्यासाठी छोटी कुटुंबे उदयास आली त्यातूनच शेताचे अनेक तुकडे पडले.
हे सर्व नकारात्मक वाटत असले तरी यातूनच सहकारी शेती उदयास आली आणि त्याचे परिणाम देखील सकारात्मक आहेत.
महिलांनी मिळवलेले हे यश नेत्रदीपक आहे.
काळानुसार शेतकऱ्यांचे जीवनमान पूर्णपणे बदलले गावाचे स्वावलंबन इतिहास जमा झाले.
त्याला आता बाजारात मिळणाऱ्या बीजवाईवर अवलंबून राहण्याची सवय जडली, कीटक नाशके, लोखंडी अवजारे, ट्रकटर सारखे शेती उपयोगी वाहने घेण्यासाठी कर्ज काढावे लागले तसेच बँकेबरोबरच सावकारी कर्जाच्या फासत तो अडकला. या शेतकऱ्याच्या शेतातील जीवनउपयोगी धान्याची जागा आता नगदी पिकांनी घेतली त्यात नापिकीचे प्रमाण वाढले पण त्याचबरोबर कर्जाचा डोंगर देखील वाढत गेला शेवटी त्याने ज्या झाडाच्या साक्षीने शेतात घाम गाळला त्याच झाडाला फास लावून स्वतःला सम्पवले.
आणि शेतकरी आत्महत्या हि एक सामाजिक समस्या निर्माण झाली.
त्यावर कर्जमाफीचा मुलामा लावण्याचे उपकार आमच्या राज्यकर्त्यांनी केले.
आकडेवारीकडे पाहिल्यास लक्षात येईल स्त्रियांपेक्षा पुरुष शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणात आत्महत्या केल्या.
आत्महत्या ग्रस्त पत्नी ते 29 एकराची मालकीण
या नि अशा कितीतरी संघर्ष गाथा / शेतकऱ्यांच्या व्यथा मांडता येतील
शेतकऱ्यांचे जीवन उधवस्त करण्याचे अनेक कुटिल्डाव शासन व्यवस्थेने रचले पण शेवटी शेतकऱ्यांच्या एकीने त्यांच्यावरच उलटवले.
२०१५ साली संसदेत मांडलेले भूमी अधिग्रहण विधयक याचेच उदाहरण आहे.
गेल्या वर्षी सरकारने जुलमी कायदे शेतकऱ्यांवर लादले आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी आंदोलकांवर अनन्वित अत्याचार पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून केले पण शेवटी सत्याचा विजय झाला.
काही महिन्यानी येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये बुडाखालची खुर्ची जाऊ नये म्हणून गुन्हा कबूल करण्याचे साहस चौकीदाराने केले.
त्यांना एवढीच विनंती आहे साहेब तुमच्या चुकीची शिक्षा भोगणाऱ्या लोकांकडे पाहायला तुम्हाला वेळ नसेल तर कृपया सत्तेच्या नशेतून बाहेर या.
प्रिय शेतकरी बापाच्या लेकरानो,
राजकारण्यांच्या भूल थापना बळी पडू नका आधुनिक शेती करा.
आपल्या एका ताईने अशीच शेती करून उदाहरण घालून दिले आहे.
मुलीने परभणीत पिकवली नेदरलँडची मिरची
फोटो - साभार गूगल
खुप छान,अभ्यासपूर्ण मांडणी केलीय आणि तेही अत्यंत ओघवत्या शैलीत आणि वास्तव मांडलय तेही अत्यंत परखड शब्दात
उत्तर द्याहटवा