संविधानाचे भक्षक
आम्ही भारताचे लोक आज सुरक्षित, अनुकूल, पोषक वातावरणात जगत आहोत कारण आमच्या घटनेने कायद्याचे राज्य निर्माण केले आहे.
त्यापासून या मातृभूचा सर्वांगीण विकास झपाट्याने होत आहे.
पहिले राजा राणीच्या पोटातून जन्माला यायचा आता मताच्या पेटीतून येतो.
म्हणूनच अगदी सामान्य कुटुंबात जन्माला आलेले राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री, आमदार, खासदार इत्यादी लोकप्रतिनिधी राज्यकारभार हाकताना दिसतात. हि आजची लोक शाही व्यवस्था आपली वाढ करण्यासाठी पोषक जमीन तयार करत असली तरी तिला अद्याप यश आले नाही; कारण हजारो वर्षांच्या बहुधिक दिवाळखोरीचे अंश अजून जिवन्त आहेत.
काही हजार वर्षांपूर्वी या देशात एक पुरुष जन्माला आला होता कदाचित त्याच्याकडे गर्भाशय असावे असा माझा समज आहे.
या पुरुषाची प्रसूती अनैसर्गिक झाली तुम्ही म्हणाल पुरुष कडी प्रसूत होतो का?
हे मला खात्रीलायक पटवून देता येणार नाही पण आमच्या धर्म ग्रंथांनी पुरवलेल्या माहितीनुसार नाविलाजास्तव मान्य करावेच लागेल कारण यासाठी देवानेच इतिहास संशोधन केले होते. मग त्याच्या संशोधनावर शंका कशी घेणार?
शेवटी काहीही असो हा पुरुष प्रसूत झाला हे एका क्षणासाठी मान्य करा. स्त्री प्रसूत होताना तिच्या एकाच अवयवाच्या माध्यमातून बाळ जन्माला येते हा नियम पुरुषांना लागू पडत नाही.
याच्या तोंडातून काही लेकरे जन्माला आली काहींना त्यांनी बाहुतून जन्म दिला ज्यांना इथे जागा मिळाली नाही ते मांड्यातून जन्माला आले
उर्वरित सर्वजन पायातून जन्माला आले तरी देखील या सृष्टी निर्मात्या पुरुषाला सर्व भूतलावरच्या लेकरांना जन्म देता आला नाही; हा प्रश्न आमच्या गुरूला विचारल्यावर त्यांचे उत्तर होते ते लोक एवढे तुच्छ आहेत कि देवाने त्यांना जन्मच दिला नाही.
मग ते आकाशातून थेट जमिनीवर उतरले का? असा अतार्किक प्रश्न विचारू नका कारण आमच्या आचार्यांकडे याचे उत्तर नाही.
एवढं झाल्यावर तुम्हाला या सृष्टी निर्मात्या पुरुषाचे नाव माहिती असावे म्हणून सांगतो ‘ब्रह्म’ हे त्याचे नाव आता विसरू नका.
हे सगळं कालबाह्य धार्मिक ग्रंथात इतरांचे शोषण करण्याच्या हेतूने काही आपमतलबी लोकांनी लिहून ठेवले असले तरी आता मात्र सर्वाना आईच्या उदरातूनच जन्माला यावे लागते म्हणून सर्वांचा सामाजिक दर्जा समान आहे.
ठीक आहे आता सर्व समान आहेत पण शतकानुशतके ज्यांनी अत्याचार सोशले त्यांचे काय?
त्यांच्या समाजिकरणासाठी घटनेत तरतुदी केल्या आहेत. ‘मुलगी शिकवा देश वाचवासामाजिक-परिवर्तन ’ असे आम्ही मोठ्या आत्मविश्वासाने म्हणत असतो कारण जगाच्या पाठीवर पहिल्या दिवसापासून केवळ भारतीय संविधानाने महिलांना समानतेचा दर्जा दिला. आपल्या घटना समितीत अनेक महिलांचा सहभाग होता. त्याचबरोबर सर्वाना समान मताचा अधिकार देत असताना कायद्यासमोर सर्व समान हे तत्व अंगिकारले.
कालानुरूप बदल करण्यासाठी घटना दुरुस्तीची तरतूद करताना अगदी सहज वाटेल तशी दुरुस्ती करून सत्ताधारी गाभा नष्ट करणार नाही याचे भान राखले. सकारात्मक भेदभाव करून सर्वांमध्ये समानता आणण्यासाठी समानांमध्ये समानता निर्माण केली यासाठी आरक्षणाची आवश्यक तरतूद केली.
सर्वाना आपल्या हक्काचे सर्व काही मिळावे; कुणावर अन्याय झाल्यास त्याला न्याय देण्यासाठी न्याय मंडळ स्थापन केले.
हक्कासाठी लढणाऱ्या समाजाला कर्तव्याचे भान असावे म्हणून घटना दुरुस्ती करून नागरिकांना मूलभूत कर्तव्ये सांगितली.
कायदे करण्यासाठी कायदे मंडळ आणि केलेल्या कायद्याची अमलबजावणी करण्यासाठी कार्यकारी मंडळ स्थापन करत असताना न्याय मंडळ, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ एकमेकांपासून वेगले असले तरी परस्पराना पूरक असावे अशी रचना केली.
आता सर्वाना एक सांगायचे आहे. आतापर्यंत सर्व धर्म गुरूंनी तुम्हाला सांगितले आपला धर्म ग्रंथ प्रत्येक्ष ईशवरानेच निर्माण केला; पण मी तुमचा असा बुद्धिभेद करणार नाही तर स्पष्ट सांगतो राष्ट्र धर्माचा हा संविधान नावाचा ग्रंथ आपल्यासारख्या मानवानेच निर्माण केला म्हणून तो मानव जातीस आचरणीय आहे.
भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर एका भाषणात म्हणाले होते, [संविधान किती हि चांगले असले तरी राबवणाऱ्यांचा हेतू जर वाईट असेल तर त्याचा नागरिकांच्या भल्यासाठी उपयोग होत नाही; उलट राबवणाऱ्यांचा हेतू चांगला असेल तर कोणते हि संविधान नागरिकांचे भले करू शकते]
या वरून आपण लोक प्रतिनिधी निवडताना किती गांभीर्याने विचार करायला हवा हे लक्षात येते.
आज पंतप्रधान कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर संविधानाची प्रत जाळली जाते केवळ याने काही कागदे जळत नाहीत तर अखंड राष्ट्र उभारणीसाठी मेहनत करणाऱ्या राष्ट्र निर्मात्यांच्या श्रमाला आग लावली जाते नागरिकांच्या स्वातंत्र्याला नाकारले जाते आणि शेवटी या देशाच्या सार्वभौमत्वाची आणि स्वातंत्र्याची राख होते तरी देखील या गुन्हेगारांना कोणती हि शिक्षा होत नसेल तर आता आत्मपरीक्षण करावे लागेल आणि मताच्या पेटीतून जन्माला येणारा राजा जातीच्या/धर्माच्या लिफाप्यात बंद होऊन येणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
आजच्या दिवशी १९४९ साली आपल्या देशाने जगातील सर्वांत मोठे लिखित महान संविधान स्वतःप्रत अर्पण केले होते आता आपण त्याचे रक्षण करण्याची शपथ घेऊ
फोटो - साभार गूगल
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा