बाल मित्रांसाठी खुले पत्र

 

कर्तृत्वाने अवकाश कवेत घेतले असताना त्याच स्फूर्तीने यशाचे शिखर सर करायचे असेल तर तुमच्यातील बालक जिवन्त असावाच लागतो. 

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू कदाचित लहानग्यांच्या प्रेमामुळेच सर्व शक्ती एकवटली असताना जमिनीवर होते त्यांच्यातील स्वार्थी माणूस डोके वर काढू शकला नाही. 

आयुष्याच्या एका टप्प्यावर सर्व सुख पायाशी लोळण घेत असले तरी बाल मनाची जिज्ञासा त्यांच्यातील यत्किंचित हि कमी झाली नाही हा स्वानुभव समोर ठेवून सर्वांच्या चाचानी त्यांचा जन्म दिवस बालदिन म्हणून साजरा करावा अशी इच्छा व्यक्त केली असावी. 

 

सर्व प्रथम सर्व बाळ मित्रांना हक्काच्या बालदिनाच्या अंतःकरणापासून शुभेच्छा 

तुमचे आयुष्य निरामय आणि मंगलमय असावे हि ईशवर चरणी प्रार्थना. 

आज काही मी उपदेश वैगेरे करणार नाही फक्त पोकडं स्वप्ने देखील दाखवणार नाही माझ्या मनातील सर्व काही या छोट्याशा पत्रातून सांगणार आहे. 

 

प्रिय मित्रानो, 

पत्र लिहिण्याचे प्रयोजन तुम्हास ठाऊकच आहे. 

आज मी शरीराने तरुण झालो,  समाजाच्या दृष्टिकोनातून जवाबदार नागरिक झालो, मनाने स्वार्थी, विचारांनी कपटी वैगेरे षड्विकारांनी ग्रसित झालो, 

एक दिवस पुन्हा २० वर्षांपूर्वीचे निरागस बालपण माझ्या वाट्याला यावे अशेच वाटते; पण ते येणार नाही हे मी जाणतो म्हणून मला तुमचा हेवा वाटतो. 

पण जाऊ द्या तुमचे कसे चालले? 

तुम्ही घरात बसून कंटाळले असालच पण धीर सोडू नका दादा ताई आता शाळेत जातात तुमच्या देखील शाळा सुरु होतीलच. 

दिवाळी संपली मामाच्या घरून कदाचित घरी परतला असाल चांगली धमाल तुम्ही    जर केली नाही तरच नवल; 

बर तुम्ही या दिवाळीच्या सुट्ट्यात काय-काय केले मला कळवा. 

 

मित्र हो तुम्हाला फटाक्याच्या धुराने होणारे हवा प्रदूषण किती धोकादायक आहे माहिती आहे का? 

तुम्ही म्हणाल दादा वर्षातून एकदाच तर फटाके फोडायची संधी असते त्यात देखील तू आडकाठी आणतोस
! माप करा त्यात तुमची चुकी नसताना आमच्या गुन्ह्याची शिक्षा तुम्ही भोगत आहात कारण आम्ही वेळीच भानावर आलो नाही म्हणून निसर्गाची हानी झाली. 

आता तुम्ही सावध झालं पाहिजे. तसं तुमच्या नंतर जन्माला येणाऱ्या पिढ्याना सुखाने जगता यावे यासाठी काळजी घ्या. 

कोरोनाने घरात डांबून ठेवल्यामुळे स्क्रीनटाईम वाढला असेलच आणि त्याचबरोबर चीड-चीड देखील वाढली असणार आई-बाबा नेहमी मोबाईल खेद नको, T V पाहू नको असे ओरडून-ओरडून सांगत असतील

पण मी काही तुम्हाला असा सल्ला देणार नाही. 

मी तर म्हणेन  भरपूर वेळ T V मोबाईल समोर घालवा; 

पण वेळी-अवेळी नको त्यासाठी  वेळेचे नियोजन करा. 

रोज ७ ते ८ तास मस्त झोप घ्या, सकाळी उठून  प्रातविधी आटपल्यावर सकाळच्या गार हवेत फिरायला जा, ‘एकटे जाऊ नका आई किव्हा बाबा कोणाला तरी सोबत न्या रोडवर चालण्यापेक्षा बागेत फिरा ” 

१ तास यासाठी राखून ठेवा 

जमलं तर यावेळेत व्यायाम करण्याचा प्रयत्न करा, त्यानंतर घरी आल्यावर मस्त नाश्ता करा, शाळेचा गृहपाठ पूर्ण झाला नसेल तर तो पूर्ण करा, तुमच्या घरी वर्तमानपत्र येत असेल तर त्यावर एकवार नजर टाका, कदाचित तुम्हाला अशे वर्तमानपत्र वाचायला आवदत्त नसेल पण सवय लावून घ्या 

नंतर शाळेत जा, पण जाताना चेहऱ्यावर १२ वाजायला नको 

शाळेतून आल्यावर दप्तर घरात फेकू नका व्यवस्थित ठेवा, नंतर हात-पाय धुतल्यावर जरा शांत बसून चिंतन करा, 

तुम्हाला नक्कीच भूक लागली  असणारच मग काही तरी खाऊन घ्या म्हणजे दुकानातून आणलेले चटकदार पदार्थ नाही;  तर आईने घरी शिजवलेले अन्न 

त्यानंतर तास-दीडतास खेळाला जा, 

आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत गप्पा मारा, इतर कामे करायला आई-बाबाला मदत करा 

थोडक्यात असे नियोजन करत असताना सुट्टीच्या दिवशी एखादे नवीन पुस्तक वाचायला घ्या ज्याचा शाळेच्या अभ्यासात समावेश नसेल ते पुस्तक आठवडा सम्पेपर्यंत वाचून पूर्ण करा. 

 

काय मग तुम्हाला टीव्ही मोबाईल साठी कोणती वेळेची मर्यादा नसणारे वेळा पत्रक आवडले ना? 

या वयात चांगले अनेक मित्र असायलाच हवे पण ज्यांचे वर्तन चांगले आहे त्यांच्याशी अगदी घट्ट मैत्री करा. 

तुम्ही विचारलं चांगले मित्र कशे असतात? 

याचे उत्तर आई-बाबाला विचारा 

मला वाटतं जी मुले घाणेरड्या शिव्या देत नाहीत, नेहमी अभ्यास करतात, इतरांना त्रास देत नाहीत, चोरी करत नाहीत, मूर्ख लोकांसारखे वेसने करत नाहीत, स्वच्छ राहतात, भरपूर खेळतात, परीक्षेत कॉपी करत नाहीत, सर्वांसोबत प्रेमाने वागतात अशी सर्व मुले/मुली आपल्या मित्र मंडळीत असायलाच पाहिजे. 

तुमचे मित्र कोण-कोण आहेत? 

तुम्हाला परीक्षेची भीती वाटते का? 

परीक्षा जवळ आली कि तुमची इच्छा नसताना सर्वजन अभ्यासाला बसवत असतील 

मी तुम्हाला असा सल्ला देतो ज्यामुळे परीक्षा आली कि अभ्यास करावाच लागणार नाही. 

 

तुम्ही फक्त रोज नचुकता २ तास अभ्यास करा सर्व अभ्यास  दडपण न घेता पूर्ण होईल; 

आणि वर्गात तुम्हाला सर्वजन हुशार विद्यारठी  समजतील परीक्षेत जास्त गुण मिळणारच. 

 तुमच्या वयाची काही मुले फार आजारी असतात कारण ते योग्य आहार घेत नाहीत पुरेसा व्यायाम करत नाहीत म्हणून तुम्ही जागरूक राहून स्वतःला तंदुरुस्त ठेवा. 

काय मग मित्रानो आज तुम्ही बाळ दिन कसा साजरा केला मला सांगणार कि नाही. 

तुमचाच प्रतीक  दादा, 

 या पत्रानंतर तुम्ही मला अभिप्राय नक्की पाठवा तुमच्या प्रतिसादाची वाट पाहतोय. 

पत्र पाठवण्यासाठी माझा पत्ता- 

rautpratikpr9622394@gmail.com   




 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

बायकोचा जाच

समर्पण