ज्योतिबाची नस
महात्मा जोतीराव गोविंदराव फुले या कर्म योगी, विचारवंत, समाजाची नस ओळखणाऱ्या वैद्याने आजच्या दिवशी सण १८९० साली निर्मिकाच्या दिशेने प्रस्थान केले .
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
कर्तृत्वाचा वटवृक्ष महात्मा फुले
हजारो वर्षांपासून आपल्या या अवस्थेला जवाबदार कोण?
या प्रश्नाचे उत्तर इथल्या बहुजनास ठाऊक नव्हते. त्याचा ठाव घेण्या इतपत त्यांचा बहुधिक विकास देखील होण्याचे कारण नाही; शिक्षण फक्त अभिजन पुरुषांची मक्तेदारी होते.
या शिक्षणात कार्यकारणभावाचा अभाव असल्यामुळे आपल्या माता भगिनी शिक्षणापासून वंचित आहेत याची खंत अभिजन पुरुषाला वाटणारच कशी.
उभ्या आयुष्यात जनतेच्या सेवेस अर्पण केलेल्या सेवकाची कर्म गाथा आपल्या मेंदूत सेवाभाव ऊतराव म्हणून आजचा प्रपंच.
एकदा हिटलरने एका कोंबडीचे पंख छाटले त्यापासून ती कोंबडी त्याचा माघे-माघे फिरत असे तो तिला दाना टाकायचा त्यावरच ती आपले पोट भरायची.
कितीतरी शतकांपूर्वी काही स्वार्थी पुरुषांनी आपले मनसुबे साधण्यासाठी भाकड कथा रचून भोळ्या जनतेच्या मनावर हे ग्रंथ ईशवर निर्मित असल्याचे बिंबवले.
देवाला प्रश्न विचारण्याची दानत या दानवांकडे कोठून येणार?
फुले पासून सुरु असणाऱ्या या प्रबोधन युगात खर्च आपण सुधारलो का?
महापुरुषांच्या विचारांना आचरणात उतरवण्यात यश आले का?
आज देखील स्त्रियांवर अत्याचार होतात, मुलांपेक्षा मुली हुशार असताना त्यांच्या शिक्षणाची आभाळ होते, शेतकरी आत्महत्या करतात, स्त्रियांचा शारिरीक भूक भागवण्यासाठी उपयोग केला जातो, जागतिक स्तरावर सर्वाधिक भूकबळी जाणाऱ्या देशाच्या यादीत आपला १३२ क्रमांक असताना देवासाठी मोठे-मोठे भंडारे केले जातात , शिकलेली मुले-मुली जात पाहून लग्न करतात,
जन्मदात्या आईवडिलांना घराबाहेर काढतात, नानाविध वेसने करतात, धर्मासाठी एकमेकांची डोकी फोडतात, राजकारण्यांच्या भूलथापांना बळी पडतात हे कशाचे देवतक आहे?
आपण महापुरुषांना जातीच्या चौकटीत फसवून घरात फोटोत आणि सार्वजनिक ठिकाणी पुतड्यात बंदिस्त केले तरी त्यातून बाहेर येऊ पाहणाऱ्या बंडखोरांना जाड ग्रंथात लपेटून ग्रंथालयाच्या कपाटात डांबले.
मग ते बाहेर कशे येणार? यासर्वांमधे केवळ एक गोष्ट मात्र सुखावणारी आहे किमान जयंती आणि स्मृती दिनी आपण त्यांना समाजमाध्यमवर वंदन करतो.
हे कष्ट घेण्याचे कारण फार चटकन लक्षात येईल फक्त थोडे डोके खाजवून विचार करा या महामानवांच्या नावाने शासनाने
लोक कल्याणकारी योजना राबवल्या नसत्या तर आपण महापुरुषांना विचारले असते का?
असे म्म्हन्तात कि देह रुपी माणसे निघून गेली तरी त्यांचे विचार अमर राहतात याला सत्याची किनार असली तरी स्पष्ट स्वरूपात सत्य दिसत नाही.
जर त्यांचे विचार खऱ्या अर्थाने जिवंत राहत असतील तर समाज एवढा अदोगतीस का लागला?
महात्म्याचे जीवन कायम संघर्षाने भरलेले दिसते सुरुवातीपासून प्रस्थापितांची चिकित्सा केली म्हणून त्यांचा विरोध सुरु झाला. तेव्हा काही काळासाठी कनवाळू सरकारने सहकार्य केले पण सत्याच्या वाटेवरच्या प्रवाशाने गोऱ्या सरकारला चुकीच्या धोरणावर वायफळ खर्चावर धारेवर धरल्यामुळे त्यांनीदेखील फणा बाहेर काढला; पण हा हरिश्चंद्र डगमगला नाही.
जेवढे शिकले तेवढे भ्रष्ट झाले अशी आम्हा शिक्षितांची अवस्था पाहून हे आपल्याच रक्ताचे आहेत का?
असा प्रश्न महात्म्यास नक्कीच पडला असता.
महात्मा फुले पुरुषांपेक्षा स्त्रीला तर्काच्या निकषावर श्रेष्ठ ठरवतात कारण ती सर्वांची काळजी घेते बाळाला जन्म देण्यासाठी सिंहाचा वाटा उचलते पण आज प्रत्येक तरुणाला तिचे फक्त शारिरीक सौंदर्यच दिसते तिच्या अंतःकरणातील आवाज त्याला ऐकायला येत नाही.
त्याकाळात जोतीरावांनी मुलींसाठी संमती वयाचा कायदा करावा असा आग्रह धरला होता. आता १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींचे कायद्याने लग्न करता येत नाही. वर निवडताना किती मुलींची संमती घेतली जाते? हा संशोधनाचा विषय आहे.
लग्न ठरवताना आता आर्थिक व्यवहार केला जातो हे जोतिबाला अपेक्षित नव्हते. हुंडा देणे-घेणे आजदेखील प्रतिष्ठेचे सम्जले जाते यापेक्षा दुर्दैव कोणते.
समाजातील सर्व स्तरातील मुलं-मुलींना शिक्षण मिळावे म्हणून ते आमरण झिजले आज त्यांच्याच महाराष्ट्रात शिक्षणाचा बोजवारा उडाला.
यासारखे शेकडो उदाहरणे देऊन वैचारिक दृष्ट्या आपण किती फारकत घेतली हे स्पष्ट करता येईल.
जेव्हा समाज महापुरुषांच्या वैचारिक अस्तित्वाचा खून करतो त्यावेळी त्यांचे स्मारके फक्त शोभेची वास्तू म्हणून उरतात.
आता आपण प्रत्येकाने ठरवायचे आहे कि या स्मारकांचा कृतीतून वैचारिक पाया भरणार आहोत का?
तो पाया भरायचा असेल तर सार्वजनिक सत्याचे पालन केले
पाहिजे.
फोटो - साभार गूगल
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा