आझादी के रत्न सुभाषचंद्र बोस
भारतीय स्वांतत्र्य आंदोलनात लक्षावधी लोकांनी स्वतःला झोकून दिले प्रत्येकाने आपल्या विचारधारेला मान्य असणारे मार्ग निवडले काही सशस्त्र लढाईचे पुरस्कर्ते होते तर काही अहिंसेचे पुजारी होते; नेताजींचा मार्ग यापेक्षा वेगळा आणि सर्वानुमते वेवहार्य होता.
त्यांचा संपूर्ण जीवनपट विलक्षण आणि गुंतागुंतीचा आहे.
२३/०१/१८९७ ते १८/०८/१९४५ या अल्प आयुष्यात त्यांनी ज्यांच्या साम्राज्याचा सूर्य कडी हि मावळत नसे त्यांना सदो कि पडो करून सोडले.
या बंगालच्या सुपुत्राने अगदी किशोर वयातच राष्ट्रासाठी समर्पित केले याची प्रचिती देणारा कलकत्याच्या प्रसिन्दिन्सी महाविद्यालयातील प्रसंग बोलका आहे; तिथे एक गोरे प्राध्यापक भारतीय मुलांना विना कारण शिक्षा करायचे त्यांचा हा दिन कर्म होता याला कंटाळून सुभाष बाबूंनी आंदोलन केले त्यांची बातमी सर्व वर्तमानपत्रात प्रकाशित झाली त्यामुळे प्रशासन जागे झाले आणि त्यांनी प्रकरण गांभीर्याने हाताळले त्या प्राध्यापकाला शेवटी माफी मागावी लागली.
पण त्यांच्या वर्तनात काही फरक पडला नाही थोड्या दिवसातच त्यांचा पूर्वीप्रमाणे नित्यक्रम सुरु झाला मग या अहिंसेच्या वाटसरूने शक्तीचा परिचय दिला आणि त्या प्राध्यापकाला चोपून काढले मग पिसदलेला समस्त गोरा कर्मचारी वर्ग संतापाने लालबुंद झाला आणि सुभाष बाबुला त्यांनी धडा शिकवण्याचा चँग बांधला या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली त्यांनी या विद्यार्थ्यांना एक संधी देण्यात यावी अशी विनंती केली पण त्यासाठी सर्वानी त्या प्राध्यापकाची माफी मागावी अशी अट घातली सुभाष बाबूंनी माफी मागायला साफ नकार दिला म्हणून त्यांना महाविद्यालयातून काढून टाकले.
आव्हाने त्यांचाच पाठलाग करतात ज्यांच्यात उत्तर देण्याचे सामर्थ्य असते.
नंतर त्यांचे जीवन अधिक त्यागी झाले त्यांनी तत्कालीन I C S अर्थात आजच्या I A S परीक्षेची तयारी सुरु केली हि परीक्षा देण्यासाठी विलायतेला जाणे गरजेचे होते त्यासाठी किमान ४ वर्षे अभ्यास करणे आवश्यक होते पण या भारतीय विद्यार्थ्याने केवळ ७ महिन्यात चौथ्या क्रमांकाने परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्या पेक्षा मोठी बाब म्हणजे लगेच या गोर्यांच्या प्रतिष्ठेच्या नोकरीला लाथ मारली.
त्यांच्या या अनपेक्षित यशाची आणि त्याचबरोबर सर्वोच्च त्यागाची बातमी माय देशात वाऱ्यासारखी पसरली म्हणून त्यांच्या स्वागतासाठी बंदरावर जणलोट उसळला त्यातूनच सुभाष बाबूंनी आपल्या पुढील कार्यक्रमाची दिशा ठरवली.
बापू त्यांचे आदर्श होते त्यांच्यात टोकाचे मत भेद असले तरी मन भेद नव्हते.
त्यांचा भारतीय राष्ट्रीय सभेच्या राजकारणात प्रवेश झाला आणि देशातील स्वांतत्र्य आंदोलनात नवचेतना फुंकली.
सुरुवातीला गांधीजी संस्थात्मक स्वातंत्र्याची मागणी करत होते नंतर सुभाष बाबू आणि त्यांचे मित्र पंडित नेहरू यांनी संपूर्ण स्वातंत्र्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला.
याला वास्तवात उतरवण्यासाठी २६/०१/१९३० रोजी तिरंगा फडकवून नवीन स्वरूपात आंदोलन सुरु केले.
१९३८ साली बोस पहिल्यांदा काँग्रेसचे अध्यक्ष झाले;
त्यानंतर सण १९३९ साली त्यांची बहुमताने अध्यक्ष म्हणून फेर निवड झाली त्यांनी गांधीजीं पुरस्कृत पट्टा बी सितारमैया यांचा पराभव केला म्हणून बापू म्हणाले, “पट्टा बी सितारमैया यांचा पराभव हा माझा पराभव आहे”
तुम्हाला कदाचित हे माहिती असेल याच प्रसंगी बापूनि सुभाष बाबुला नेताजी म्हणून सम्बोधले आणि सुभाष चंद्र बोस यांनी गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून गौरवले.
कालांतराने सुभाष बाबूंची काँग्रेस मध्ये घुसमट होऊ लागली म्हणून त्यांनी पक्ष सोडला आणि नवीन वाट शोधली.
दुसरे महायुद्ध सुरु झाल्यावर त्यांनी शेतरुला खिंडीत पकडण्याचे ठरवले त्याचबरोबर बाहेरच्या देशाची मदत घेण्याचा निर्णय घेतला.
पण हे सर्व जमिनीवर उतरण्यापूर्वी गोर्यांनी त्यांना अटक केली.
या विरुद्ध सुभाष बाबूंनी आमरण उपोषण सुरु केले त्यांची तब्यत खालावत होती म्हणून त्यांना सोडण्यात आले. आणि घरातच नजर कैद केले एक दिवस त्यांनी मुस्लिम व्यक्तीचा वेष धारण करून घराबाहेर पडायचे ठरवले. भावाच्या आणि पुतण्याच्या मदतीने मोठी कसरत करून ते यात यशस्वी झाले.
त्यांनी जर्मनीला जाऊन हिटलरची मदत माघितली पण त्यासाठी तो असमर्थ होता पण त्याने सुभाष चंद्र बोस याना जपानकडून मदत मिळवून देण्याचा शब्द दिला आणि तो पूर्ण देखील केला याच बरोबर भारतीय युद्ध बंदींना मुक्त केले.
नेताजी जपानला गेले आणि त्यांच्या पंतप्रधानला आपली बाजू सुभाष बाबूंनी पटवून सांगितली आणि ते मदतीसाठी तयार झाले.
राज बिहारी बोस यांच्या आजाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारून पुढची वाटचाल सुरु केली.
गोर्यांना भारतातून पळवून लावण्यासाठी त्यांची हि फौज फक्त पुरुषांचीच नव्हती तर त्यात महिलांच्या देखील तुकड्या होत्या दुर्दैवानं जपानवर अमेरिकेने अणुवस्त्र डागली आणि जपान उद्वस्त झाला आणि त्यांच्याकडून मिळणारी रसद थांबली त्यामुळे आजाद हिंद सेनेचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही पण त्याद्वारे लागलेल्या चिंगारीने वणव्याचे रूप धारण केले आणि अवघ्या काही महिन्यातच स्वातंत्र्याचा मार्ग मोकडा झाला.
जपानवर आलेल्या संकटामुळे मदत थांबली असली तरी सुभाष बाबू गप्प बसले नाहीत त्यांची धडपड सुरूच होती पण नशिबाने घाट केला आणि विमान दुर्घटनेत त्यांचे निधन झाले.
त्यांच्या निधनाचे गुड उकलण्याचा अनेक वेळा अनेक राष्ट्रांनी प्रयत्न केला पण कोणीच ठोस निष्कर्षापर्यंत पोहचले नाही म्हणून तोवर आपल्याला विमान दुर्घटना झाली हेच मान्य करावे लागेल.
तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल सुभाष बाबुला भारत रत्न पुरस्कार का मिळाला नाही?
त्यांना सण १९९१ साली भारत रत्न देण्याचे जाहीर झाले पण त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूचे ठोस कारण शोधे पर्यंत पुरस्कार न स्वीकारण्याची भूमिका घेतली.
इतिहास केव्हाच जर तर अशा अनुमानावर लिहिल्या जात नाही पण सुभाष चंद्र बोस हे एक असे व्यक्तिमत्व होते कि ज्यांच्या असण्याने देशाची फाळणी टाळणे शक्य होते कारण जीनांचे मन वळवण्याची आणि नेहरूंच्या महत्वकांक्षाना नियंत्रित ठेवण्याची
क्षमता त्यांच्याकडे होती.
कारण जो हिटलर जगात कोणालाच भेटत नसे तो सुभाष बाबुला भेटला कारण त्याचे रूप धारण केलेल्या बहुरूप्यांचा भांडाफोड करण्याचे चातुर्य त्यांच्याकडे होते.
अशा मानवी रत्नांवर किती हि भारत रत्न ओवाळले तरी त्यांचा उचित सन्मान होऊ शकत नाही.
चला आता नवीन जगात टिकून राहण्यासाठी आजच्या गरजा लक्षात घेऊन सुभाष बाबू आचरणात उतरवण्याचा प्रयत्न करू
फोटो - साभार गूगल
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा