दिव्यांग मुलांचे संगोपन कसे करावे?

 

 

भयंकराच्या वाटेवरून प्रवास करत असताना आपल्या मनात भीती दाटून येणे स्वाभाविक आहे पण ज्यांना निसर्गाने शारिरीक दृष्ट्या इतरांपेक्षा वेगळे घडवले अर्थात समाजातील अपंग [दिव्यांग] लोकांचं काय? 

आज अनेक कुटुंबांची दुर्दशा झाली आहे बहुतेकांना २ वेळच्या जेवणासाठी कामाच्या शोधात वणवण भटकावे लागते पण दिव्यांगांच्या रोजगाराची हमी कोण देणार? 

हे सर्व प्रश्न समाज म्हणून सर्वाना अंतर्मनात डोकावण्यास भाग पाडतात. 

आपल्या समाजात  अगदी बोटावर मोजण्या एवढे दिव्यांग बंधू-भगिनी स्वतःच्या पायावर उभे राहून सन्मान पूर्वक जीवन जगत आहेत; मात्र अनेकांना इतरांवर अवलंबून राहावे लागते. 

 

याचा अर्थ दिव्यांगांना जर संधी मिळाली तर ते देखील स्वतःला सिद्ध करू शकतात कारण ज्यांना कुटुंबातून समाजातून पाठिंबा मिळाला त्यांनी यशोशिखर  गाठले मात्र जे या सह्कार्यापासून वंचित राहिले त्यांच्या जगण्याची आपण कल्पनाच करू शकतो. 

जशी सामान्य व्यक्तीच्या जडण-घडणीत आई-वडिलांची भूमिका महत्वाची असते त्या तुलनेत एका अपंग पाल्याचे संगोपन करण्यात त्यांना अधिक दक्ष राहावे लागते. 

आजच्या धकाधकीच्या जीवनात स्पर्धेच्या ओझ्या खाली दबून सामान्यांचे बालपण हरवले आहे मग दिव्यांग बालकाच्या वाट्याला खरच ते समृद्ध बालपण येत असेल का? 

हरवलेल्या बालपणाला जवाबदार कोण?  

 

आपल्या घरात जर दिव्यांग बाळ जन्माला आले असेल तर काय करावे? 

हे समजून घेण्या पूर्वी बहुतांशी लोक दिव्यांग पाल्याचे पालनपोषण कसे करतात? 

याचा थोडक्यात विचार करू-- 

प्रत्येक कुटुंबाच्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीनुसार त्यात फरक पडतो. 

मी जन्मतः दृष्टिबाधित असल्यामुळे माझ्या अनुभवातून निघणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे मत व्यक्त करत आहे. 

सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी विशेष निवासी शाळा असतात त्यामुळे प्राथमिक  शिक्षण अनेकांना घेण्यास अडचणी येत नाहीत पण याला काही अपवाद आहेत अनेक पालक अशा निवासी शाळेत मुलांना दाखल करण्यास टाळाटाळ करतात. 

परिणामी त्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते नंतर ते समाजाच्या चेष्टेचा विषय बनतात. नाही तर त्यांच्या वाट्याला ते जीवन येते जे आपण सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या दयेवर जगणाऱ्या म्हणजेच भिक्षेकरू व्यक्तींच्या जीवनात पाहतो. 

 

तर दुसरीकडे घरची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर त्यांना एकट्याने फिरू देत नाहीत त्यामुळे त्यांचे जीवन परावलंबी होत असून त्यांना जगण्याचा आनंद लुटता येत नाही. 

वरील नमूद प्रकरणांचा विचार केल्यास पालकांच्या मनात आपल्या दिव्यांग पाल्याबद्दल अपार प्रेम दिसते पण त्यांचे हे प्रेम या मुलांच्या आयुष्याची नासाडी करते. 

तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच निर्माण झाला असे मग मी कसं घडलो? 

माझ्या आयुष्याचा आजवरचा प्रवास थोडक्यात समजून घेण्यासाठी २ लेख नक्की वाचा-- 

प्रिय गुरुजी, एका विद्यार्थ्यांचे पत्र 

 

ती नसती तर 

 

आज माझ्याकडे जे काही इतरांना देण्यासारखे आहे ते या सर्वांच्या ऋणात राहून मी समाजाला देत आहे. 

अपंग / दिव्यांग मुलांचे संगोपन कसे करावे? 

जन्माला आलेलं प्रत्येक मूळ एका कोऱ्या पण मजबूत पाटीसारखे असते त्यावर तुम्ही जे लिहिणार ते स्पष्ट उमटणारच याची खात्री सर्वजन देतील त्याला विशेष बालके अपवाद नाहीत. 

मुलं-मुलींमध्ये भेद केल्यामुळे मुली आज पर्यंत मुलांच्या तुलनेत माघे राहिल्या पण समाजाचा दृष्टिकोन  बदलल्यावर त्यांनी हि पोकडी भरून काढली;  याची देही याची डोळा आपण सर्व साक्षीदार आहोत. 

त्याचप्रमाणे दिव्यांग मुलं-मुलींच्या बाबतीत हे शक्य आहे फक्त समाजाने दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. 

या मुलांचे संगोपन करताना त्यांच्या शारिरीक अक्षमतेचा भाऊ  करण्यापेक्षा त्यांच्यातील जमेच्या बाजू हेरूंन त्यांच्या वाट्याचे त्यांना द्या. 

 

घरात विशेष मुलांची जास्त काळजी घेतली जाते त्यांना त्याची गरज देखील असते. 

हे करत असताना तुमच्या काळजी पोटी त्यांचे नुकसान होणार नाही तसेच तुमच्या नकारात्मक दृष्टिकोनातून त्यांचे खच्चीकरण होणार नाही याची दक्षता घ्यावी. 

सर्व पालकांनी आपले पूर्वग्रह टाकून देऊन पाल्यांचे पालनपोषण करावे दिव्यांग व्यक्ती अनेक खेळात प्राविण्य मिळवू शकतात त्यामुळे त्यांना खेळण्यापासून थांबवू नका. नुकत्याच संपलेल्या 

ऑलम्पिक पेक्षा परऑलम्पिक मध्ये भारत देशाला जास्त पदके पटकावता आली. 

दिव्यांग व्यक्ती फक्त नोकरीच करू शकतात हि सर्वांत  मोठी अंध श्रद्धा आहे कारण अनेक दिव्यांग तरुण-तरुणींनी स्वतःचा व्यवसाय यशस्वी करून दाखवला आहे. 

आपल्या घरातील / परिचयातील दिव्यांग व्यक्तीला यशाच्या शिखरावर चढलेलं तुम्हाला पाहिचे असेल तर फक्त एवढं करा? 

 

आई-वडिलांनी त्यांना कायम पाठिंबा द्यावा तू हे करू नको, एकटा फिरू नको, शेवटी तू आमच्यावर अवलंबून आहेस जास्त शहाणपणा शिकवू नको असे टोमणे मारल्यापेक्षा त्यांच्या भूमिकेतून समजून घेण्याचा प्रयत्न करा. 

रस्त्याने चालताना प्रत्येक दिव्यांग व्यक्ती हा भिकारी असतो अशा अविर्भावात अनेक लोक वावरतात आणि त्याला/तिला काही पैसे देऊन निघून जातात कदाचित तुमचा हेतू वाईट नसेल पण त्यांना याचा फार त्रास होतो म्हणून वागणे बरे नव्हे. 

शाळा / महाविद्यालयात जर दिव्यांग विद्यार्थी तुमच्या बरोबर  असतील तर त्यांच्याबरोबर मैत्री करा. 

[मी गेल्या कित्त्येक दिवसांपासून ब्लॉग लिहितो त्यासाठी माझ्या मित्रांचे मला नेहमीच सहकार्य मिळते] 

पण या मैत्रीत स्वार्थ नसावा अथवा उपकाराला स्थान नसावे. 

एवढंच नव्हे जसे सर्व सामान्य तरुण तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडतात त्याच भावनेने सामान्य तरुणाने दिव्यांग तरुणीवर प्रेम करावे तसेच सामान्य तरुणीने दिव्यांग तरुणावर प्रेम करावे. 

या टोका पर्यंत जर आपला प्रवास झाला तर दिव्यांगांचे जगणे सोपे होईलच पण त्यासोबत समाज देखील प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करेल. 

असे म्हणतात ‘जसा आपण विचार करतो तसे आपण घडतो’ चला विचार बदलू समाज बदलेल 

 

फोटो - pixabay aap





 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

बायकोचा जाच

समर्पण