गांधीजींचा पाचवा पुत्र माहिती आहे का?

शस्त्र हाती न घेता सशस्त्र शत्रूंचा युद्धात पराभव करणे सहज शक्य आहे हे आपण आज सांगू शकतो; कारण ७५ वर्षांपूर्वी एका सेनापतीने याच भूमीत हा पराक्रम  घडवला. 

त्यांच्या या युद्धनीतीला आज समस्त जग सलाम करत आहे म्हणून ‘राष्ट्रपिता महात्मा गांधीजी ‘ यांचा जन्म दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 

[आज हिंसाचार टोकाला पोहचला असताना जागतिक अहिंसा दिन याला विराम लावेल हि भाबली अपेक्षा] 

बापुना राजकीय संत म्हणतात,  कोणी अहिंसेचे दूत म्हणून गौरवतात,  तर अनेक लोक त्यांच्या तत्वज्ञानावर तोंडसुख घेतात काही हि असो या सर्वाना गान्धी पुरून उरतात. 

जातीवादी समाजाने सर्व महापुरुषांना जातीच्या चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न केला असला तरी राष्ट्रपित्याने या संकुचित मानसिकतेला आपल्या जवळपास फिरकण्याची संधीच दिली नाही. 

 


त्यामुळे गांधी हा एक व्यापक विचार सिंधू आहे यात सर्वाना प्रवेशास मुभा असली तरी त्याच्या खोलीचा अंदाज मात्र कुणालाच घेणे जमले नाही. 

जगात ज्यांना आदर्श ठेवून युगप्रवर्तक क्रांतिकारकांनी प्रेरणा घेतली; त्या गांधींच्या  माय भूमीत मात्र आज देखील त्यांची चिकित्सा करताना बाधा येत नाही गांधीजींवर टीका केली म्हणून तुमच्यावर टीकेचा अथवा हिंसेचा सामना करण्याची वेळ येत नाही हे फक्त बापू सोबतच होऊ शकते. 

त्यांचे समग्र जीवन मांडणे माझ्यासारख्याला शक्य नाही त्यामुळे त्यांच्या जयंती दिनी मी तो मोठा घास घेणार देखील नाही. 

 

आज त्यांच्या आयुष्यातील समृद्ध पण दुर्लक्षित पैलू समजून घेण्याचा प्रयत्न करू. 

मोहनदास आणि कस्तुरबा याना मणिलाल, हिरालाल, देविदास, रामदास हि मुले असल्याचे सर्वाना माहिती आहे पण 

जमनालाल बजाज हे त्यांचे पाचवे पुत्र होते तुम्हाला माहिती आहे का? 

त्यांच्या या पुत्र सहवासावर आपण प्रकाश टाकण्यापूर्वी कस्तुरबा आणि मोहनदास या जोडप्याचे सांसारिक आयुष्य समजून घेऊ त्यासाठी-- 

राष्ट्र पित्याची संसार गाथा    

 

जमनालाल बजाज यांचा आज नाव लौकिक मिळवलेल्या बजाज कंपनीशी काही सम्बन्ध आहे का? 

असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर तो योग्यच आहे कारण हि कंपनी त्यांचीच आहे. 

गांधीजी आणि त्यांचा उद्योजक मुलगा हे वरकरणी पाहता विरोधाभासी दिसत असले तरी जमनालाल हे त्यांच्या दत्तक वडिलांच्या शब्दात “वैरागी उद्योजक” होते. 

जमनालाल यांचा ०४/११/१८८९ साली राजस्थानातील एका गावात जन्म झाला. 

त्यांचे जन्म दाते आई-बाबा आर्थिक दृष्ट्या गरीब होते;  म्हणून वर्ध्याच्या एका श्रीमंत उद्योगपतीने मुलगा नसल्यामुळे त्यांना दत्तक घेतले. 

 

काही कारणास्तव त्यांना जास्त शिक्षण घेता आले नाही ते केवळ व्यवहारिक दृष्ट्या चौथी शिकले; पण त्यांच्या वैचारिक कृतीला याची बाधा आली नाही. 

ते एका श्रीमंत घरात लहानाचे मोठे झाले पण त्यांच्या आचरणात श्रीमंतीचा कधी हि अहंकार नव्हता त्यांचा उद्योग हा वयक्तिक नफा मिळावा म्हणून सुरु नसे तर व्यपक जनहित साधने हा त्यांचा हेतू होता. 

वयाच्या १७ वर्षाचे असताना त्यांनी वडिलांना एक पत्र लिहून सम्पत्तीवरच्या सर्व हक्कांवर पाणी सोडले आणि ते घर सोडून निघून गेले. 

नंतर मोठ्या कष्टाने त्यांचे मन वळवण्यात त्यांच्या वडिलांना यश आले पण त्यांनी सर्व संपत्तीचा मालक न होता विश्वस्त होऊन सार्वजनिक हिताचे कामे केली. 

भौतिक अर्थाने ते गडगंज संपत्तीचे मालक असले तरी मनापासून ते खरेखुरे वैरागी होते. 

 

रोजच्या खर्चासाठी त्यांना घरून १ रुपया मिळत असे त्यांनी हे सर्व पैसे साठवले एक दिवस लोकमान्य टिळकांनी केसरीची हिंदी आवृत्ती सुरु करण्यासाठी मदत मिळावी म्हणून जाहिरात दिली त्या वेळी आपल्या खिशातले जमवलेले १०० रुपय टिळकांना दिले. 

यापासून सुरु झालेले समाज कार्याचे यद्न्य आज देखील सुरु आहे त्यांचे वारसदार सामाजिक कार्याच्या स्वरूपात यथाशक्ती  समिधा टाकतात. 

जमनालाल कायम एका तत्व निष्ठ मार्गदर्शकाच्या शोधात होते त्यांचे अनेक नेत्यांशी चांगले सम्बन्ध होते पंडित मदन मोहन मालवीय, लो. टिळक इत्यादी

त्यांच्यात अपेक्षित गुरु त्यांना मिळाला नाही.  मात्र आफ्रिकेत गांधीजी करत असलेल्या कार्याची त्यांना माहिती वाचायला मिळाली आणि ते त्यांना न भेटताच प्रभावित झाले. 

गांधी पूर्ण वेळ भारतात परतल्यावर त्यांनी स्वतंत्र आंदोलनात स्वतःला गुंतवून घेतले; त्यासोबतच सामाजिक कार्य देखील सुरु होते. 

 

जमनालाल  आपल्या कुटुंबासह गांधी आश्रमात राहायला गेले त्यांनी बापुना वर्ध्याला आश्रम सुरु करून राहायला येण्याची विनंती केली; त्यांच्या या विनंतीला मान देऊन गांधीजींनी विनोबाला वर्ध्याला पाठवले. 

विनोबांच्या रूपात जमनालाल याना गुरु मिळाला. 

साबरमती आश्रमातून मिठाच्या सत्याग्रहाला सुरुवात झाली आणि देशाला स्वातंत्र्य मिळे पर्यंत या आश्रमात न परतण्याची शपथ घेऊन बापू बाहेर पडले. 

नंतर त्यांनी वर्धा शहर जवळच्या शेगाव ज्याला आता “सेवा ग्राम” नावाने ओळखले जाते तिथे मुक्काम हलवला. 

[सेवा ग्राम हे नाव गांधीजींनी दिले] 

गांधी विनोबांच्या कार्यात जमनालाल यांनी तण-मन-धन  अर्पण केले. 

गांधींच्या सर्व आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता त्यांनी तुरुंगवास देखील भोगला; तुरुंगात ते सामान्य कैद्यांच्या श्रेणीत राहत असायचे. 

 

ब्रिटिशांनी पहिल्या महायुद्धात सहकार्य केल्याबद्दल जमनालाल याना ‘राय बहादूर’ हि उपाधी बहाल केली. 

असहकार आंदोलनात सहभागी होऊन त्यांनी राय बहादूर हि पदवी वापस करत असताना आपल्या संग्रही असणाऱ्या सर्व पाश्चिमात्य वस्तुंना अग्नीच्या स्वाधीन केले; आणि खाडी वापरायला सुरुवात केली. 

तथाकथित उच्च वर्णीय लोकांना न जुमानता लक्षीमी नारायणाचे मंदिर सर्वांसाठी खुले केले; त्याचबरोबर त्या काळात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांच्या पंगतीला बसून त्यांनी अनेकदा जेवण केले. 

स्वातंत्र्य आंदोलनात झोकून देणाऱ्या वकिलांचा घर खर्च पूर्ण करण्यासाठी १००००० रुपयांचे दान केले. 

हे सर्व घडण्यासाठी त्यांच्या आयुष्यातील एक घटना फार महत्वाची आहे ती घटना घडली नागपूर अधिवेशनात, 

जमनालाल यांनी बापूंसमोर एक अनोखा प्रस्ताव ठेवला. 

आज पर्यंत अनेकांनी मुले दत्तक घेतली आहेत; पण मला तुम्हाला वडील म्हणून दत्तक घ्यायचे आहे. 

 

गांधीजींनी विचारांती याला मान्यता दिली. 

म्हणून कदाचित या वैरागी उद्योजकाला संसारी जीवनात परमार्थ साधता आला. 

त्यांना खुर्चीचा कधी हि मोह जडला नाही १९३८ साली त्यांना काँग्रेस अध्यक्ष करायचे निश्चित झाले असताना त्यांनी नुकतेच देशात परतलेल्या सुभाष चंद्र बोस याना खुर्चीवर बसावे असा आग्रह धरला. 

सम्पूर्ण आयुष्य राष्ट्र सेवेला अर्पण करणारा हा वैरागी ११/०२/१९४२ रोजी हे जग सोडून गेला. 

त्यांच्या पश्चात पत्नीने विनोबांच्या कार्यासाठी स्वतःला झोकून दिले भूदान आंदोलनात देखील त्यांचा सहभाग होता. 

अहिंसेच्या गिरिधरला नेहरू पटेल यांनी खांदा दिला असेल तर जमनालाल यांनी डोक्यावर घेतले. 

म्हणून बापू सर्व उद्योजकांना जमनालाल बजाज यांचे उदाहरण देत असत 

आजच्या व्यवसायिकांनी किती प्रमाणात जमनालाल बजाज समजून घेतले हा प्रश्न स्वतःला विचारून उत्तर शोधा. 

  

         फोटो - साभार गूगल 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

बायकोचा जाच

समर्पण