सापाने केली पत्नीची हत्या
सर्व वैवाहिक माणसे एवढी धडपड कशासाठी करतात?
२ वेळचे जेवण करण्याची सोय असताना, डोक्यावर सुरक्षित छप्पर असताना, आरोग्यासाठी तरतूद केली असताना, समाजात प्रतिष्ठा असताना संपत्तीचे संग्रहण का करतात?
थोडक्यात आई-वडील आपल्या लेकरासाठी कष्ट का उपसतात?
याचे सर्व मान्य उत्तर मुलांच्या आनंदी आयुष्यासाठी.
याचं फलित काय होईल? अशी चिंता न करता ते अहोरात्र झटत असतात.
पण हेच जन्मदाते आपल्या मुलीची लग्न गाठ एका हत्यारांबरोबर बांधून देतील यावर तुम्ही विश्वास तरी कसे ठेवणार ! म्हणून तुमच्या समोर सविस्तर घटना ठेवणे उचित ठरेल.
दक्षिणेतील छोटेसे पण सर्वार्थाने संपन्न राज्य अशी केरळ राज्याची ओळख आहे.
या राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी एका हत्यारा असणाऱ्या पतीला दुहेरी जन्म ठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली कारण त्याने सापाच्या मदतीने पत्नीची हत्या केली.
पण हे प्रकरण एवढे सरळ असते तर दुर्मिळ अशी दुहेरी जन्म ठेपेची शिक्षा थोटवण्याचे कारणच काय?
म्हणून प्रकरणाच्या मुळाशी जाऊन समजून घेऊ-
३ वर्षांपूर्वी सूरज आणि उत्तराची विवाह जोडणाऱ्या एका संकेतस्थळावर ओळख झाली म्हटल्यापेक्षा तिथूनच त्यांचे लग्न ठरले असे म्हणणे सयुक्तिक ठरेल.
सूरज एका गरीब कुटुंबातील तरुण असला तरी संपन्न कुटुंबातील तरुणीबरोबर त्याचे लग्न होण्यासाठी तिच्यातील अपंगत्व कारणीभूत ठरले; ती “लर्निग डिसेबल” म्हणजे सामान्य व्यक्तीपेक्षा वाचण्या लिहिण्याची क्षमता कमी असणारी मुलगी होती.
तिचा विवाह ठरवताना उत्तराच्या आई-वडिलांनी ७६८ ग्राम सोने, ४ चाकी गाडी, लक्षावधी रुपयांची रोकड आणि मासिक खर्च ८००० एवढा प्रचंड हुंडा दिला.
हुंड्यासाठी नवविवाहितेला किती छळले जाते याचे एक उदाहरण-
पण पैश्याची हवा काही दिवस कायम राहिली आणि एका मुलाला जन्म दिल्यावर त्याची वासना बळावली दुसऱ्या सुंदरीला घरात पत्नी म्हणून आणण्यासाठी हीचा काटा काढण्याचा त्याने थंड डोक्याने कट रचला.
आपल्या देशात सापाची तस्करी करणे गुन्हा असताना त्याने परिचयातील एका सर्प मित्राकडून विषारी साप विकत घेतला एका प्लॅस्टिकच्या डब्ब्याला हवा येईल एवढे छिद्र करून
तो घरी आणला.
रात्री तिला मोबाईल वरच्या खोलीत राहिला म्हणून आणायला पाठवले पण त्या आधी त्याने साप खोलीत सोडला होता; पण त्याचा डाव त्याच्यावरच उलटला साप बघून उत्तराने आरडाओरडा केला तिचा आवाज ऐकून कुटुंबातील सर्वजन तिथे जमा झाले; सुरजणे शेवटी तो काठीने उचलून बाहेर फेकून दिला.
नंतरच्या प्रयत्नात त्याला यश आले पूर्वी केलेली चूक लक्षात ठेवून ती झोपल्यावर अंगावर साप सोडला नशीब बलवत्तर म्हणून तो पायाला चावून निसटला आणि सूरजला आपला हेतू साध्य झाल्याचा आनंद झाला.
पण वैद्यकीय तज्ज्ञांनी ५२ दिवस उपचार करून उत्तराचे प्राण वाचवले.
दरम्यानच्या काळात इंटरनेटची मदत घेऊन त्याने विषारी सापांची माहिती मिळवली.
उत्तरा माहेरी अराम करायला गेली असताना रात्री जूस मध्ये झोपेचे औषध देऊन त्याने कोब्रा तिच्या अंगावर सोडला तो निसटून गेल्यावर त्याची मान पकडून चावण्यासाठी त्याला मजबूर केले शेवटी त्या सापाने उत्तराचा चावा घेतला आणि त्याच शनी तिने झोपेतच कायमची निद्रा घेतली.
दुसऱ्या दिवशी तिला रुग्णालयात नेल्यावर डॉक्ट्रांनी मृत घोषित केले; तब्ब्ल ७५ दिवस कसून चौकशी केल्यावर सूरजला त्याच्या कृत्याचे फळ चाखायला भाग पाडले.
आयुष्याची कमाई आपल्या मुलीच्या रक्षणासाठी ज्याच्या हातावर ठेवली त्याला आपल्या लेकीचा हत्यारा म्हणून पाहताना वडिलांना काय वाटले असेल?
वडील मुलींसाठी काय करू शकतात?
अशा घटना थोड्या फार फरकाने नेहमीच घडत असतात याला आपली पितृसत्ताक विवाह संस्था व्यापक अर्थाने जवाबदार आहे.
मुलीपेक्षा मुलगा पारंपरिक निकष लावून श्रेष्ठ शोधतात त्यासाठी मुलीची खुल्या बाजारात बोली लावावी अशी हुंड्याची रक्कम तसेच तत्सम वस्तूंचे स्वरूप ठरवले जाते.
परिणामी तो तिला कायमचे ४ भिंतींच्या आत एका पिंजऱ्यात डांबून ठेवतो सामाजिक रुढींचे कठोर झापड या पिंजऱ्यात मानवी हक्काचा विषाणू जाणार नाही यासाठी डोळ्यात तेल घालून खडा पहारा देण्यासाठी तत्पर असते.
यापासून रक्षण करायचे असेल तर विवाह व्यवस्थेची चिकित्सा करा तिला बुद्धीच्या धारेवर तपासून पहा.
मुलींना जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य द्या आणि प्रेम विवाहाला प्रोत्साहन देऊन सर्व शोषक वृत्तीना कायमस्वरूपी मातीत गाळून टाका.
तोवर मानवी मूल्यांवर आधारित कुटुंब व्यवस्थेची पाय भरणी होणार नाही परिणामी अशा अनेकींच्या आर्तकिंकाळ्या मन सुन्न करत राहतील.
हे टाळण्यासाठी सर्वानी एकत्रित रित्या चळवळ उभारणे क्रम प्राप्त आहे त्यासाठी प्रस्थापितांचा रोष पत्करण्याची; कर्मठ लोकांच्या भ्याड हल्ल्यानं तोंड देण्याची तयारी ठेवावी लागेल.
कदाचित आपल्या पिढीला शक्य झाले नाही तरी पुढची पिढी या चळवळीतून शोषणमुक्त भेद भावाला स्थान नसणारा मानवतावादी समाज नक्की उभारणार अशी खात्री वाटते.
यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करावी आणि घरातल्या स्त्रीला पहिले बंधनातून मुक्त करावे.
आपल्या लेकरांना अंतर जातीय / अंतर धर्मीय विवाह करण्याची मुभा द्यावी.
आदर्श विवाह ठरवताना कोणते निकष असावे?
यांचे उदाहरण डोळ्या समोर ठेवून आपण देखील आपल्या संसाराचे प्रयोजन ठरवू शकतो.
त्यासाठी सौंदर्यापेक्षा कर्तुत्वाला भुलून माणसांवर प्रेम करायला शिकावे लागेल त्याचबरोबर पर स्त्रीत आई-बहीण पाहण्याची दृष्टी तुमच्याकडे आहे का?
याचे उत्तर शोदहा
फोटो - साभार गूगल
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा