सापाने केली पत्नीची हत्या
सर्व वैवाहिक माणसे एवढी धडपड कशासाठी करतात? २ वेळचे जेवण करण्याची सोय असताना, डोक्यावर सुरक्षित छप्पर असताना, आरोग्यासाठी तरतूद केली असताना, समाजात प्रतिष्ठा असताना संपत्तीचे संग्रहण का करतात? थोडक्यात आई-वडील आपल्या लेकरासाठी कष्ट का उपसतात? याचे सर्व मान्य उत्तर मुलांच्या आनंदी आयुष्यासाठी. याचं फलित काय होईल? अशी चिंता न करता ते अहोरात्र झटत असतात. पण हेच जन्मदाते आपल्या मुलीची लग्न गाठ एका हत्यारांबरोबर बांधून देतील यावर तुम्ही विश्वास तरी कसे ठेवणार ! म्हणून तुमच्या समोर सविस्तर घटना ठेवणे उचित ठरेल. दक्षिणेतील छोटेसे पण सर्वार्थाने संपन्न राज्य अशी केरळ राज्याची ओळख आहे. या राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी एका हत्यारा असणाऱ्या पतीला दुहेरी जन्म ठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली कारण त्याने सापाच्या मदतीने पत्नीची हत्या केली. पण हे प्रकरण एवढे सरळ असते तर दुर्मिळ अशी दुहेरी जन्म ठेपेची शिक्षा थोटवण्याचे कारणच काय? म्हणून प्रकरणाच्या मुळाशी जाऊन समजून घेऊ- ३ वर्षांपूर्वी सूरज आणि उ...