फसवे प्रेम

👿प्रेमात आणि  युद्धात  सर्व  काही माप असते. 

जिथे अक्षम्य वागणूक असते तिथे मात्र प्रेमाचे  नाटक  केल्याचा भाव असतो. तिच्या शरीरावर प्रेम करायचे फक्त लचके तोडण्यासाठी;   तथाकथित  मर्द  ठरण्यासाठी. हि विकृत मानसिकता समस्त  समाजात पसरली   त्यामुळे हि  सामाजिक समस्या निर्माण  झाली   आहे. 

एका तरुणीचे तिच्या समवयीन तरुणाशी प्रेम सम्बन्ध होते. त्याने तिचा विश्वास संपादित  केला. अर्थातच त्यांनी आपल्या सुखी संसाराची स्वप्ने बघितले ; त्यानंतर त्यांच्यात शारिरीक जवळीकता वाढली आणि नैसर्गीक रित्या ते एकमेकांकडे आकर्षित झाले. इथेच तिच्या आयुष्याला उत्र्तीकला लागली. त्या खाजगी क्षणांचे चित्रीकरण मोबाईलमध्ये केले गेले; आणि तिला कायमचे ब्लॅकमेल करायला सुरुवात झाली. वारंवार अशा प्रकारे चित्रीकरण झाल्यावर ती केवळ त्याच्यासाठी वस्तू बनली होती. त्याने मग हि चित्रफीत त्याच्या मित्रांना पाठवली आणि 2 अल्पवयिन मुलांसह ६ तरुणांनी तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. 😢

  अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या जाचाला त्रासून ती २२ वर्षीय तरुणी पिंपरी चिंचोळच्या पोलीस आयुक्तांना भेटली आणि तिने आपली तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य ओळखून आयुक्तांनी त्वरित गुन्ह्याची नोंद करून आरोपीना अटक केली हि बातमी लोकसत्ता  वर्तमान पत्राने दिली. बातमी प्रकाशित होई पर्यंत प्रियकरासह ४ तरुण  पोलिसांच्या ताब्यात  होते; तर अल्पवयीन मुलांचा  शोध  सुरु होता. ✌

हि बातमी प्रकाशित झाल्यावर अनेक प्रश्न निर्माण होतात आणि त्याच्या सामाजिक परिणामांची भीती देखील वाटते. आज आपल्या देशात स्त्रियांच्या रक्षणासाठी कित्त्येक कायदे असताना आपण महिला अत्याचार कमी करू शकलो नाही हे समाज म्हणून सर्वांचे अपयश आहे. 

आता यातील काही किव्हा सर्वच आरोपींवर अनेक वर्षानंतर कार्यवाही केली जाणार पण तोवर याचा सर्वाना विसर पडणार तिला जो न्याय मिळाला असे आपण म्हणू तो खर्च न्याय असणार का? तर नक्कीच नाही. पिढीतेची माहिती जरी सार्वजनिक केली जाणार नसली तरी परिसरात मात्र सर्वाना माहिती असते. त्यांचा या मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्किच संकुचित  झाला असणार याला जवाबदार कोण? 

तर आपण सर्व पुरुषाने अनेक स्त्रियांशी संबंध ठेवणे पुरुषार्थाचे लक्षण मानले जाते. पण स्त्रीने एका पेक्षा जास्त व्यक्तीशी संबंध ठेवले तर तिला वाटेल त्या अपमानकारक शब्दांनी  संबोधले  जाते. त्यात हि एखाडीवर बलात्कार झाला असेल तर त्याचा संपूर्ण दोष तिलाच दिला जातो. मुलींनी तोकडे कपडे घालू नये , तिने एकटी-दुकटीने फिरू नये, तिने प्रेमात पडू नये, घरातील पुरुषासह बाहेर जावे, शक्य तो ७ वाजायच्या आधी घरी परतावे. अशे कित्त्येक सल्ले दिले जातात. पण हेच सल्ले मुलांना दिले जातनाहीत . कारण आमच्यासाठी स्त्री-पुरुष संकल्पना फक्त कागदावर आहे; ती अद्याप आम्ही मूल्य म्हणून स्वीकारली नाही. 

तिला त्रास देणाऱ्या तिच्या स्त्रीत्वाचा खून करणाऱ्या त्या नराधमांना कायदा त्याच्या कासवाच्या गतीने शिक्षा करेल पण तिच्या सन्मानाने जगण्याच्या मूलभूत अधिकाराचे काय? 

आज तिच्या परिसरातील लोक तिचे लग्न ठरवताना आडकाठी आणणार नाहीत याची शाशवती कोण देणार? 

निश्चितपणे तिला अशाप्रकारचा त्रास सहन करावा लागणार पण तिने तक्रार करण्याचे जे धाडस दाखवले त्यासाठी तिला सलाम. नाही तर हे दानव  उघड माथ्याने फिरले असते आणि तिच्या वेदना दिवसागणिक वाढत गेल्या असत्या.  

कदाचित अशा भीती पोटी मुली तक्रार करायला सरसावत नसणार कारण पिढीत मुलीला वर वर पाठिंबा देणारे खरोखर त्या मुलीच्या मागे उभे राहतात का? 

याचा हि विचार करावा लागणार त्यासाठी अनेक निकष असू शकतात 

बलात्कार पिढीतेशी लग्न करायला तुम्ही तयार आहात का? 

१०० पैकी ९९ तरुण नाही हेच उत्तर देतील हि वास्तविकता आपल्या पुरुष प्रधान व्यवस्थेमुळे तयार झाली आहे. सामान्य माणसांपर्यंत मर्यादित नाही तर अगदी न्यायाधीश देखील याच मानसिकतेत वाढले आहेत. एका बलात्काराच्या आरोपीला सर न्यायाधीशांनी तू पिढीतेशी लग्न करणार का? विचारले होते. सविस्तर वाचण्यासाठी https://www.premsparsh.com/2021/03/blog-post_1.html    

वरील प्रकरणात पिढीतेने सुरुवातीला प्रियकराशी संबंध ठेवले होते त्याचे चित्रण केल्यामुळे हि दुर्दैवी वेळ तिच्यावर आली . यामुळे प्रेम आणि फसवणूक हे न उलगडणारे कोडे सर्वांसमोर निर्माण झाले आहे. अशा घटनांमुळे प्रेमाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन संकुचित होतो. त्यामुळे प्रेमी युगुल प्रचंड तणावाला सामोरे जावे लागते. यातूनच मुलींना महाविद्यालयात जाण्या आधी त्यांचे लग्न करून दिले जाते,  नाही तर त्यांना घरात डांबून ठेवले जाते,  जाण्याची अनुमती मिळालीच तर प्रत्येक दिवशीं त्यांचे दप्तर तपासले जाते, त्यांच्या फोनची  तपासणी  केली जाते. 

अशा परिस्थितीत प्रेम विवाह वास्तव कि आभास? हा प्रश्न निर्माण होतो  याचे उत्तर शोधण्यासाठी   नक्की वाचा 🤔 https://www.premsparsh.com/2021/03/blog-post_31.html   https://rautpratikpr9622394.blogspot.com/2021/03/blog-post_31.html 


कायदेशीर मार्गाने न्याय मिळावा हि सर्वांची इच्छा आहे. पण न्यायदानात  होणारा विलंब न्यायावरचा विश्वास कमी करतो यासाठी जलदगती  न्यायालयात सर्व प्रकरणे चालवावी जनेकरून कायद्याची दहशद निर्माण होईल आणि पिढीतेला न्याय मिळाल्याचे समाधान मिळेल 

विद्यमान व्यवस्थेत पिढीतेला आरोपी प्रमाणे वागवले जाते हि समाजवृत्ती बदलेल आणि वास्तविक जीवनात स्त्री-पुरुष समानता येणार. 

प्रेमात पडणे चुकीचे नाही; तर प्रेमाच्या फसव्या जाळ्यात अडकणे धोका दायक आहे. म्हणून शारिरीक जवळीक साधताना भावनेच्या नव्हे तर तर्काच्या आधारे विचार करावा सुरक्षिततेची खात्री पटवून घ्यावी कुठल्या हि प्रकारचे चित्रीकरण करू देऊ नये जर तरी देखील छुप्या/ उघडपणे करण्याचा प्रयत्न केला जात असणार तर त्यामागचा हेतू जाणून सावधान होणे गरजेचे आहे. तुमचे जर कोणी शोषण करीत असणार तर समाजाची भीती न बाळगता तक्रार करावी आणि स्वरक्षणाचे प्रशिक्षण घ्यावे आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचा बचाव करता येणे आवश्यक आहे. 


    •  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा