बाबासाहेबाना विद्यार्थ्यांचे पत्र


प्रिय बाबासाहेब, 


पत्रलिहीणाऱ्याचा तुमच्या विचाराचा वारसा घेऊ पाहणाऱ्या लेकराचं साष्टांग नमस्कार. 

पत्र लिहिण्याचे कारण कि आज तुम्हावर महापरिनिर्वाहन दीना निमित्य शुभेच्छांचा वर्षाव झाल्याने इजा पोहचली असेल म्हणून सांत्वनासाठी. 

तसं जगाला वैचारिक दिशा दाखवणाऱ्याचे माझ्यासारख्या छोट्या तरुणाने सांत्वन करावे तरी कसे? 

पण तुम्हीच घटनेत अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आम्हाला दिले असल्याने हा तोकडा पण मनापासून प्रयत्न.  वेळ मिळाल्यावर नक्की 

वाचा आणि अभिप्राय कळवा  


आज या पत्रात मी काही तुमची थोरवी मांडणार नाही अथवा तुमच्या जीवित  कर्तबगारीवर माझे मत व्यक्त करणार नाही. 

तुम्ही जेव्हा या भूमीवर शेवटचा श्वास घेतला त्यावेळी माझ्या बाबाचा देखील जन्म झाला नव्हता त्यामुळे आपली प्रत्येक्षात भेट होण्याचे कारणच नाही. 

तुमच्या लेखनातूनच मी तुम्हाला भेटू शकलो म्हणून तुम्हाला पत्र लिहिण्यास घेतले. 

तुम्हाला समजून घेण्यासाठी माझ्यासारख्या सामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्याला अख्ख आयुष्य अपुरे पडेल म्हणून मी अजून तुम्हाला समजू शकलो नाही हे प्रामाणिकपणे मान्य करतो; आणि जे आमच्या अंगात बाबासाहेबांचे रक्त आहे असे छाती फुगवून सांगतात त्यांनी तर तुमच्या विचारणा कधीच जमिनीत गाळून टाकलं असं मला वाटतआहे. 


याला काही अभ्यासू माणसे अपवाद आहेत पण अपवाद तर सर्वत्र आढळतात. 

वर नमूद केल्याप्रमाणे मी तुम्हाला समजू शकलो नाही म्हणून आज काही प्रश्न विचारणार आहे. 

त्याची सुरुवात कशी करावी हे काही कळत नाही म्हणून माप करा. 

१ तुमच्या सन्मानार्थ बापू हरी नगराळे  यांनी “जय भीम” हा नारा दिला होता आता ते क्रांतीचे घोष वाक्य ठरले आहे हे यातूनच खूप काही स्पष्ट 

 होते. 

पण आजकाल एका विशिष्ट जातीचे लोक मी जय भीम आहे अशी ओळख करून देतात तसेच अनेकदा तू जय भीम आहेस का? विचारतात 

हे ऐकून तुम्हाला काय वाटते? 

सामाजिक आणि  शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या समूहांसाठी घटनेत शिक्षण व नोकरीत आरक्षणाची तरतूद केली होती त्याचा फायदा अनेकांना झाला. 

तरी देखील संबंधित जातीतील मोजक्या लोकांनी अधिकच फायदा करून घेतला आणि त्यातीलच गरिबांना काही हि लाभ झाला नाही. 

मग सर्व सवलतींचे फायदे स्वतःपुरते  ठेवणाऱ्या लाभार्त्याना तुमचा काय सल्ला असेल? 

तुम्ही एके ठिकाणी म्हणाला होतात “राजा हा राणीच्या कुशीतून नाही तर मताच्या पेटीतून जन्माला यायला हवा” पण आज सर्रास तुमच्या नावाचा वापर करून काही धूर्त राजकारणी मत मागतात; त्यांच्या भावनिक आवाहनाला  भुलून अनेक अनुयायी मत देतात या अनुयायांसाठी काही संदेश आहे का? 

तुम्ही आयुष्यात मादक पदार्थांचे वेसण केले नाही तसेच धर्मांतर करताना उपस्थितांना तशी प्रतिज्ञा घ्यायला लावली. पण आज तुमच्या जयंतीला मिरवणुकीत  लोक दारू पिऊन सहभागी होतात तेव्हा तुम्हाला क्षे वाटते? 

तुम्ही जिना नसलेल्या वर्ण व्यवस्थेच्या इमारतीचा पाया उधवस्त करण्यासाठी सुरुंग लावला पण आज देखील शिकलेले आपल्या देशातील जवाबदार नागरिक जाती व्यवस्था अधिकाधिक घट्ट करतायत मग जाती निर्मूलन कशे होणार? 

तुम्ही मनुसृतीचे दहन करून रूढीवादी लोकांना विज्ञानाचा मार्ग दाखवला तुमच्या प्रयत्नाने तत्कालीन दलित समुदाय न्याय हक्कासाठी मैदानात उतरला आज मात्र आधुनिकतेच्या लेबल खाली तोच भुसा आमच्या डोक्यात भरला जातोय; देश भक्तीचे  ठेकेदार व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्याला देश द्रोही ठरवतायत तुम्हीच सांगा आता लोकशाही कशी टिकवायची आणि राष्ट्र कशे उभारायचे? 

स्त्री-पुरुषांना समान दर्जा मिळावा म्हणून घटनेत तशी तरतूद तुम्ही केली; पण प्रेम विवाह केला म्हणून  भावाच्या हाताने बहिणीची हत्या झालेली तुम्ही स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयाच्या जिल्ह्यात आम्ही नुकतीच पाहिली. क्षमा असावी मग सांगा तुम्ही कुठे कमी पडले? 

स्त्रियांना वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळावा म्हणून कायदा करण्यासाठी मंत्री पदाच्या खुर्चीला त्यागून तुम्ही नवीन आदर्श घालून दिला पण आज देखील या समाजात म्हणावा तेवढा बदल झाला नाही.  मग काय करायचं राहून गेलं? 

जाऊ द्या मी जास्त प्रश्न विचारून तुम्हाला त्रासून सोडणार नाही. 

आता शेवटचा प्रश्न या पुढच्या आयुष्यात येणाऱ्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादी  समस्यांचा आम्ही कसा सामना करावा? 

बाबासाहेब कृपया rautpratikpr9622394@gmail.com या पत्त्यावर उत्तर पाठवा. 

आपला आभारी, 

तुमचा विद्यार्थी, 

प्रतीक राऊत. 

दिनांक ०६-१२-२०२१ 

मित्रानो जेव्हा महापुरुषांचा  विचार पुस्तकांच्या कपाटात बंद होतो आणि त्यांना पुतळ्यात कैद केले जाते तेव्हा ..


बाबासाहेबांचा पराभव  

 

फोटो - साभार गूगल





 

टिप्पण्या

  1. प्रतिक तू खुप परखड मत मांडतोस , तुझा प्रत्येक लेख वाचताना प्रत्येक विचार मनापर्यंत, मेंदूपर्यंत जाऊन भिडतो

    उत्तर द्याहटवा
  2. खूप सच्च्या भावनेतून आलेले प्रश्न..

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

बायकोचा जाच

समर्पण