समर्पण
निसर्गाने सृष्टीचे चक्र सुरळीत चालण्यासाठी स्त्री-पुरुष असा लैंगिक भेद केला असावा. पण शारिरीक बळाचा वापर करून, स्त्रियांच्या भावनिकतेचा गैर वापर करून स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या पुरुषांनी स्त्रियांवर अनेक बँडने लादली; त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला. अशा परिस्थितीत एका जोडप्याने सामाजिक-शैक्षणिक क्रांतीच्या आधारे हे शतकानुशतकांचे अंधकारमय जीवन नष्ट केले आणि प्रकाशाचीपणती लावली .
या कार्यात झोकून देणाऱ्या आई सावित्रीला त्यांच्या जयंती दिनीं त्रिवार अभिवादन.
“प्रेम दिले तर प्रेम मिळते” या त्रिकाल बाधित सत्याचे स्मरण ठेऊन जोतिबा आणि सावित्री या उभयतांनी एकमेकांवर जीवापाड प्रेम केले. त्यांच्या प्रेमाचे प्रतीक आज सर्वत्र शिक्षण खेडोपाडी पोहचले आहे. स्त्री पंतप्रधान राष्ट्रपती न्यायाधीश अशा सर्व पदांवर विराजमान झाली असून सर्वत्र भरारी घेत आहे. सर्व जाती धर्माचे लोक या देशात गुण्या गोविंदाने राहत आहेत. आज म्हणून मुलींची पहिली शाळा ज्या शहरात सुरु झाली त्या पुणे शहरातील विद्यापीठाला पहिला महिला मुख्याध्यापिका आई सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले आहे.
त्यांच्या या अफाट कर्तृत्वाचे रहस्य त्यांनी केलेल्या संघर्षात दडले आहे. सावित्रीबाई यांचा जन्म ०३-०१-१८३१ रोजी झाला. तत्कालीन रूढीनुसार त्यांचे लग्न झाले; त्यावेळी त्या अशिक्षित होत्या. पण विवाह नंतर त्यांच्या वैचारिक सहकार्याने अर्थात महात्मा जोतिबा फुले यांनी त्यांना लिहिणे-वाचणे शिकवले आणि स्त्री शिक्षणाचे बीज आपल्या पत्नीपासून पेरायला सुरुवात केली त्याचा पुढे वटवृक्ष झाला. https://www.premsparsh.com/2021/04/blog-post_10.html
सावित्रीचे शिकणे तत्कालीन समाजाने स्वीकारले नाही त्यांचे हे पाऊल रूढी परम्पराना फाटा देणारे होते. नंतर या दाम्पत्याने मुलींसाठी पुण्यातील भिडे यांच्या वाड्यात १८४८ साली देशातील पहिली मुलींची शाळा सुरु केली. त्यानंतर टप्याटप्याने शाळा वाढत गेल्या त्याच बरोबर त्यांनी समाज सुधारणेला देखील सुरुवात केली. मुलींनी शाळेत जाऊ नये म्हणून घरातील पुरुष तसेच महिला आग्रही असत त्या परिस्थितीत मुलींनी शाळेत यावे याच्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागली. समाजातील कर्मठ लोक त्यांना त्रास देण्याची एक देखील संधी दवडू देत नसत त्यांच्या अंगावर शेण माती फेकणे दगड फेकणे हे नित्याचेच होते. पण सावित्रीबाईंनी कधी तक्रार करून आपल्या कार्यापासून फारकत घेतली नाही.
शिक्षणाबरोबर त्यांनी सामाजिक दृष्ट्या सोशीत असणाऱ्या लोकांना धीर दिला विधवा महिलांसाठी आपल्या घराचे दारे उघडी केली. त्यांना हक्काचे माहेर दिले आणि त्यांच्यात जगण्याचे सामर्थ्य निर्माण केले.
पत्नी हि पतीची गुलाम नसून त्याच्या एवढेच तिला देखील अधिकार आहेत हा महिलांमध्ये विश्वास निर्माण केला. या दाम्पत्याने एका विधवा स्त्रीचे मूळ दत्तक घेऊन नवा आदर्श घालून दिला जोतिबांच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी सत्य शोधक समाजाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. आणि कार्य अविरत सुरु ठेवले. १८९७ साली प्लेगची साथ सर्वत्र पसरलेली असताना, त्या आपल्या सहकाऱ्यांसह रुग्णाची सेवा करीत असायच्या त्या दरम्यान त्यांना प्लेगची लागण झाली; आणि त्यातच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्यातील कवयित्री देखल तितकीच जागृत होती त्यांचा एक काव्य संघ्रह देखील उपलब्ध आहे.
आपले जीवन स्वतः पुरते मर्यादित न ठेवता त्यांनी समाजासाठी स्वतःला समर्पित केले . या दाम्पत्याचा हा प्रेम स्पर्श अनेकांचे जीवन मंगलमय करणारा होता.
फोटो - साभार गूगल
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा