करोडपती--हिमानी बुंदेला

१ सर्व सामान्य मुलगी वयानुसार सर्वांसारखी वाढते तिच्यात ते सर्व गुण असतात जे इतरांमध्ये आढळतात. काही वर्षांनी तिची नजर कमी-कमी होत जाते १० वर्षाची असताना तिच्यावर डोळ्याची शस्त्रक्रिया केली जाते त्यामुळे तिची नजर परतते पण काही अटी आणि  शर्तींसह तिचे जगणे मर्यादित होते. Dr. तिला सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळायला सांगतात तसेच मोठ्या कार्यक्रमात सहभागी  होण्यास मज्जाव करतात प्राप्त परिस्थिती ती स्वीकारते आणि आपले शैक्षणिक कार्य सुरु ठेवते. या परिस्थिती ती चांगल्या टक्क्यांसह  १०-वि उत्तीर्ण होते. नंतर तिला वैद्यकीय शाखेत पदवी घ्यायची होती दुर्दैवानं ११ वित्त असताना तिच्या सायकलला दुचाकीवाला उडवतो तिला गंभीर इजा होते. आणि त्या अपघातात ती पूर्णपणे दृष्टी गमावून बसते. या घटनेने ती पूर्णपणे खचते. नंतर ती स्वतःला सावरते आणि १२-वि उत्तीर्ण होऊन अंधकार सारून प्रकाशाचा उत्सव साजरा करते. त्यानंतर पदवी घेण्यासाठी तिला फार धडपड करावी लागते ती दृष्टिबाधित असल्यामुळे सर्व महाविद्यालये तिचा प्रवेश नाकारतात शेवटी ती लखनौच्या दिव्यांगांसाठी असणाऱ्या विद्यापीठातून पदवी घेते आणि केंद्रीय शाळेत शिक्षिका म्हणून सेवा द्यायला सुरुवात करते. तिचा हा प्रवास नेत्र दीपक आहे पण त्याकडे फार गांभीर्याने या समाजाने पाहिले नाही म्हणून तिला आजवर आपण  ओळखू शकलो नाही. पण “कोण बनेगा करोडपती “ या कार्यक्रमातून हिमानी बुंदेला या शिक्षिकेला संपूर्ण देशभरात आदराचे स्थान प्राप्त झाले आणि त्या क्षणात लक्षवेधी तरुण-तरुणींच्या गळ्यातील ताईद बनल्या. आग्रा शहरातील या जिवंत आश्चर्याकडे पाहून  [ जगाला पाहण्याची शक्ती माझ्याकडे नसेल पण संपूर्ण जगाने माझ्याकडे पाहावे अशी कीर्ती मात्र मी करून दाखवली. ] 

  • त्यांचा हा प्रवास कोणत्याच अर्थाने सोपा नव्हता कारण या करोडपती करून देणाऱ्या कार्यक्रमापर्यंत पोहचणे सर्वांसाठी जिकिरीचे असते त्यात तुम्हाला डोळे नसतील तर ते स्वप्न तुमच्यापासून किती दूर जात असणार विचार करा. 

    त्यांना अगदी ५ वर्षाच्या होत्या त्यापासून आपण दूरचित्रवाणीवर जावे असे वाटायचे जसे त्यांना कळायला लागले आणि अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकायला यायचा त्या वेळी त्यांना असे वाटायचे आपण देखील एक दिवस हॉट सीटवर बसावे आणि त्यांनी २०१९ पासून त्या दिशेने प्रयत्न सुरु केले आणि २०२१ साली त्या तिथे केवळ बसल्या नाहीत तर करोडपती झाल्या. 

 

  • सुरुवातीला सर्व सहभागी सामान्य होते त्यांच्यासमोर कोणते हि आवाहने नव्हती पण दृष्टी नसताना आपण तिथे गेलो म्हणून समाजाची कौतुकाची थाप मारून घेण्यापेक्षा त्यांनी सर्वांसोबत स्पर्धा करून दृष्टी नसेल तरी चालेल दृष्टिकोन असला पाहिजे हे दाखवून दिले. 

    त्यांच्या या यशामुळे सर्वत्र दृष्टिहीन व्यक्तीच्या सामर्थ्यावर चर्चा सुरु झाल्या, डोळे नसताना या स्पर्धेच्या युगात त्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक केले जाऊ लागले पण आजवर इतर दृष्टिबाधित या सारख्या मोठ्या व्यासपीठावर का पोहचले नाहीत? 

    हा प्रश्न  विचारात घेतला तर आपल्या लक्षात येईल कि, समाजाने / कुटुंबीयांनी कायम दृष्टिहीन पाल्यांकडे दुर्लक्ष केले केवळ सहानुभूती दिली पण समान संधी निर्माण करून दिली नाही. कारण एक हिमानी बुंदेला करू शकतात तर इतर अनेक दृष्टिबाधित व्यक्ती हे शिखर गाठू शकतात फक्त समाजाने त्यांना पाठिंबा द्यायला पाहिचे. 

    केवळ एखाद्या क्षेत्रापुरते मर्यादित न ठेवता सर्वत्र दिव्यांग मित्र-मैत्रिणी आपल्या कर्तृत्वाची चमक दाखवण्यास समर्थ आहेत. पण त्यांना तेवढा पाठिंबा मिळत नाही याची खंत वाटते त्याचबरोबर विशेष गरज असताना त्यांना पूर्ण सुविधा मिळत  नाहीत. ऑलम्पिकमध्ये  एक सुवर्णपदक नीरज चोप्रा याला मिळाले तर देशभर दिवाळी साजरी झाली; पॅरा-ओळम्पिकमध्ये २ स्वर्णपदके मिळाली त्यांची कुठे चर्चा देखील नाही. 

 

  • क्रिकेट सारख्या खेळाचे उदाहरण घ्या  सारखीच परिस्थिती आहे. आपल्या देशाच्या दृष्टिबाधित क्रिकेट संघाने २ विश्व चषक आणले असताना ,या संघात खेळणाऱ्या क्रिकेट पट्टूचे नाव ही माहीत नाही.हि समाजाची नकारात्मक वृत्ती आमच्या विकासास बाधा आणते त्यामुळे दिव्यांग सक्षमीकरणाला सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करायला पाहिजे.  अगदी त्याची सुरुवात करत असताना दृष्टिबाधित व्यक्ती १ आपल्यातीलच आहे हे मान्य करा. त्यानंतर त्यांना तुमच्या सहकार्याची अपेक्षा असताना सहानुभूतीची गरज नाही याचे भान ठेवा आणि नंतर आज पर्यंत आपण काय केले अथवा नाही केले हे विसरून या पुढे काय करता येईल याचा विचार करा. 

    तुम्ही कुठे हि काम करत असाल तर तुमचे दिव्यांग मित्र-मैत्रिणी किती आहेत हे तपासा जर नसतील तर का नाहीत हा प्रश्न स्वतःला विचारा; जर असतील तर तुमचे अनुभव इतरांना सांगा. १-२ व्यक्ती म्हणजे संपूर्ण दृष्टिहीन समाज नव्हे त्यांच्यातील चांगले-वाईट गुण  म्हणजे संपूर्ण दृष्टिबाधित लोक अशेच असतात अशी समजूत करण्यात अर्थ नाही. त्यामुळे जसा सर्व सामान्य लोकांचा स्वभाव भिन्न असतो त्याचप्रमाणे सर्व दिव्यांग व्यक्तींचा स्वभाव भिन्न असतो. 

    तुम्ही जर दिव्यांग व्यक्तीला चांगल्या प्रकारे सहकार्य केले तर त्यांच्यासाठी कोणते हि शिखर गाठणे अशक्य नाही. त्यासाठी हा लेख नक्की वाचा-- 

    जमीनिवरचा सूर्य-हेलन केलर

 

  •  दिव्यांग व्यक्तीला सामान्य अपेक्षा असतात त्यांना देखील चांगली नोकरी सुरक्षित जीवन असावे असे वाटते जर महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी असतील तर आपल्यावर प्रेम करणारे कोणी असावे हि भावना असते. सर्व कार्यक्रमात आपण सहभागी व्हायला पाहिजे अशी आंतरिक इच्छा असते पण बऱ्याच ठिकाणी डावलले जाते केवळ तुम्ही शारिरीक दृष्ट्या इतरांपेक्षा वेगळे आहात म्हणून.  यामुळे त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो; त्यामुळे  आता हे सर्व थांबले पाहिजे. 

    जसे फार थोडे विद्यार्थी विशिष्ट क्षेत्रात प्राविण्य मिळवतात तसेच अगदी बोटावर मोजण्या एवढे दिव्यांग व्यक्ती नेत्रदीपक कामगिरी करतात त्यामुळे अशा यशस्वी व्यक्तींचे उदाहरण देऊन इतरांना तुच्छ लेखण्यात मूर्खपणा आहे. 

    किमान हा लेख वाचून तुम्ही दिव्यांग व्यक्तीशी माणुसकीने व्यवहार केला तर माझ्यासाठी सर्वाधिक समाधान देणारी बाब असेल ..

 फोटो - साभार गूगल

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विवाहाचं खरं वय

धर्माच्या भिंती मोडतात तेव्हा

शेवटि तिचे ही लग्न झालेच