नग्न मुलींची मिरवणूक
भारतीय घटनेने सर्व नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देत असताना त्याद्वारे कोणाचे हि शोषण होणार नाही असे निर्देशित केले आहे. त्याचबरोबर मूलभूत कर्तव्यात वैज्ञानिक दृष्टिकोन आचरणात आणावा असे नमूद केले आहे.
पण हे तत्वज्ञान धार्मिक अल्पसंख्यांकांना सांगितले जाते पण स्वधर्मियाना मात्र परंपरेच्या नावाने यातून सूट देण्याची विकृत मानसिकता मोठ्याप्रमाणात वाढली आहे.
एकीकडे मुलगा-मुलगी समान आहेत असे ओटातून बोलले जाते मुलीला दुय्य्मत्वाचा दर्जा देण्याची भावना त्यांच्या मनात असते त्याचबरोबर स्त्रियांचा छळ करण्याचे पापीकृत्य यांच्या पोटात शिजते.
मध्य प्रदेशातील बुंदेल खंड कायम दुष्काळी प्रदेश म्हणून ओळखला जातो; आपल्या विदर्भापेक्षा अधिक बिकट परिस्थिती त्या प्रांतात आहे.
या परिस्थितीला वरून राजाचा कोप कारणीभूत असावा हि इथल्या धर्म मार्तंडांची धारणा असल्यामुळे दामोह जिल्ह्यातील एका खेड्यात अनोखी मिरोवणूक काढली.
गावातील ५ अल्पवयीन मुलींना विवस्त्र करून त्यांच्या खांद्यावर एक लाकूड बांधले आणि गावातील त्यांनी सर्व घरचं धान्य गोळा केले.
त्याचा भंडारा केल्यावर गावात पाऊस पडेल असे या लोकांचे म्हणणे आहे.
हि बातमी B B C मराठी या संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे.
समाज माध्यमावर याचा व्हिडीओ वेगाने पसरला आणि या खेड्यातील बातमी देशभर पसरली.
नंतर सर्व स्तरातून टीकेची झोड उठणे स्वाभाविक होते. या सर्वांवर प्रतिक्रिया देताना मध्य प्रदेश पोलिसांनी सांगितले “आता पर्यंत आमच्याकडे तक्रार आली नाही अशाप्रकारची घटना घडल्याची लेखी तक्रार आल्यावर आम्ही कार्यवाही करू”
[हा लेख प्रकाशित होई पर्यंत पोलिसांची हि भूमिका स्पष्ट झाली आहे कदाचित नंतर त्यांची भूमिका बदलू शकते म्हणून आपण तपासून पाहावे हि विनंती]
तसेच जिल्हा अधिकारी महुदय घटनेवर मत व्यक्त करताना “सर्व अल्पवयीन मुलींच्या पालकाची याला सहमती होती ते देखील या मिरवणुकीत सहभागी होते. आपण फक्त अशा निरर्थक प्रथांविरुद्ध जनजागृती करू शकतो” असे वक्तव्य केले.
राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगानं मध्य प्रदेशच्या दामोह जिल्हा प्रशासनाला या घटनेचा सविस्तर अहवाल माघितला आहे.
या प्रकरणाला हवा मिळाली तर नक्कीच दोषींवर कार्यवाही केल्याचे दाखवले जाईल पण त्या मानसिकतेचे काय?
एकीकडे मुलींची नग्न मिरवणूक काढली जाते तर दुसरीकडे मुलीने जीन्स पॅन्ट घातला म्हणून तिची हत्या केली जाते.
या दुटप्पी मानसिकतेत पुरुषी वर्चस्व दडलेले आहे.
केवळ खेडुतांमध्ये हा पुरुषप्रधान संस्कृतीचा विषाणू नाही तर प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये देखील तो तेवढाच संक्रमित झाला आहे.
जर या देशात तक्रार मिळाल्याशिवाय पोलिसांना हस्तक्षेप करता येत नाही असा नियम असेल तर आंदोलकांवर लाठी चार्ज करताना तक्रारदाराचे नाव का सांगत नाही?
मुलींच्या पालकाची याला सहमती असल्यामुळे जर हे प्रकरण वयक्तिक होत असेल तर
बाळ विवाह का होण्यापासून थांबवले जातात?
असे कितीतरी प्रश्न विचारता येतील पण महिला सक्षमीकरण तसेच बाल हक्क स्वरक्षण याबाबतीत प्रशासकीय उदासीनता हि सगळ्यात जास्त जबाबदार आहे.
म्हणून सुरुवातीला जबाबबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्याला शिक्षा करायला पाहिजे. जनेकरून कार्यवाहीच्या भीतीने अधिकारी जागरूक राहून अशा घटना थांबवतील आणि पोलिसांच्या भीतीने गावातील लोक असे अतार्किक कार्यक्रम आयोजित करणार नाहीत.
समाजाचे काय?
लोकांचे प्रतिनिधित्व करणारे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसणारे व्यक्ती महिलांबद्दल आक्षेपार्य वक्तव्य करतात.
समाजातील प्रतिष्ठित वाचाळवीरांवर नियंत्रण आणणे फार गरजेचे आहे कारण जर यांचे बर्डने बंद केले तर अनेक लोक योग्य मार्गावर येतील. त्याशिवाय याप्रकारच्या घटनांना वेसण घालणे कठीण आहे.
त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलनास मदत होईल त्यामाध्यमातून होणारे महिलांचे शोषण थांबेल. म्हणून
महाराष्ट्राच्या धर्तीवर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा देशभर लागू केला पाहिजे.
केवळ मुलींसाठी शाळा सुरु करून तसेच त्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत तर त्यांना सामाजिक सुरक्षा देणे महत्वाचे आहे.
मध्य प्रदेशात झालेल्या या घटनेत समाजाची दुसरी विदारक बाजू समोर येते. ज्या मुली नग्न अवस्थेत गावभर फिरत आहेत त्यांचे आई-वडील हे चित्र आपल्या उघड्या डोळ्याने पाहत असले तरी त्यांना या बद्दल खंत वाटत नाही.
जी मुलगी घराची इज्जत आहे असे आपण म्हणतो ती तुमची अब्रू वेशीवर टांगली जात असताना तुमच्यातील माणूस मरतो का?
स्वतःच्या मुलीची हि स्थिती पाहताना या धर्मांध पालकांना यत्किंचित हि वेदना होऊ नये; जर कोणी आपल्या मुलीकडे वाकड्या नजरेने पाहिले तर घरात घुसून त्याचा हिशेब चुकता करणारे मुलीला विवस्त्र करून गावात फिरवतात. धर्माची अघोरी परम्परा या धर्मांध लोकांसमोर कोणते भविष्य निर्माण करू पाहते हे सर्व अनाकलनीय आहे.
आपण अशा परिस्थितीत आपला विवेक जागृत ठेवून मानवी शोषणावर आधारित सर्व रूढींना तीव्र विरोध केला पाहिजे; त्याचबरोबर या धार्मिक जनतेला त्यांच्या धर्मातील विरोधाभास दाखवून देणे हे देखील आपले कर्तव्य आहे.
धर्माने कायम सर्व वयोगटातील स्त्रियांचे शोषण केले आहे हे जर ठ्ठाम्बवायचे असेल तर सुजाण नागरिकांनी एकत्र येऊन प्रबोधनाचा आवाज बुलंद केला पाहिजे.
त्याशिवाय गत्यंतर नाही जर आपण कुठे कमी पढलो तर अशा घटना दिवसागणिक वाढत राहतील.
जी तुमच्या घरातील देवी आहे तिची अवहेलना जर भक्त करीत असतील तर ती कोपणार नाही का?
मूर्तीतील देवांना भावना नसतात पण जिच्यात देवाचा वंश आहे ती तर या जाचाला त्रासली असणारच ना किमान तिच्या भावनांचा तरी विचार करा.
फोटो - साभार गूगल
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा