नात्यातील तणाव कमी कसा करावा
महामारी नंतर आपले जीवन कसे असणार हे पूर्णपणे स्पष्ट झाले नसले तरी त्याची प्रचिती आजच्या जगण्यातून येते; काही लोकांचे संपूर्ण बदलून गेले, अनेकांचे पूर्ववत सुरु झाले पण तरुणांचे कसे असेल? हे त्यांचे त्यांना माहिती नाही.
कारण एकीकडे भविष्य त्याला “करियर” हे गोंडस नाव आपण दिले आहे. त्याचबरोबर आयुष्यातील स्वतःच्या मेहनतीने मिळवलेली खरी चिरकाल टिकून राहणारी संपत्ती म्हणजे मित्र मंडळी आपण टिकवू शकणार का?
मित्र एकमेकांना भेटू शकतात; मैत्रिणी एकमेकींना भेटू शकतात पण क्षणाचा विरह सहन न करणाऱ्या प्रेमी युगुलांचे काय?
त्यांच्या नात्यात विसंवादातून निर्माण होणाऱ्या तणावाचे निराकरण कसे करणार?
बंटी आणि बबली एकाच वर्गात अगदी पहिलीपासून शिकत होते त्यांच्यातील बाळ मैत्री तशी घट्ट होती. त्यांचे वर्गात दंगा घालणे, वही पुस्तके लपवून ठेवणे, परीक्षेच्या वेळी एकत्र अभ्यास करणे, खेळात सांस्कृतिक कार्यक्रमात एकत्र सहभागी होणे, सहलीला सोबत जाणे, एकमेकांच्या खोड्या काढणे सर्व काही विना तक्रार सुरु होते. त्यांच्यातील मैत्री महाविद्यालयात देखील तशीच टिकून राहिली; फक्त फरक त्यांच्यातील वागण्यात झाला जे बाळ मित्र लहान वयात एकत्र राहत होते त्यांच्यातील नैसर्गिक शारिरीक बदलांमुळे दोघांच्या हि आई-वडिलांनी त्यांच्यात इतर मुलं-मुलींसारखे अंतर निर्माण केले. कारण त्यांच्यातील मैत्रीचे प्रेमात रूपांतर होऊ नये या हेतूने कदाचित त्यामुळे या संकुचित मानसिकतेच्या समूहात त्यांची प्रतिष्ठा डागडण्याची शक्यता होती. पण बंटी आणि बबली शाररिरीक दृष्ट्या विशिष्ट अंतर ठेवून राहत असले तरी त्यांच्यातील मनाने हे अंतर कधीच मोडले होते त्या २ हृदयातील दुरी संपून त्याचे मिलन झाले होते; कोणत्याही “i love you” सारख्या शब्दांशिवाय आणाभाका न घेता पोकडं आश्वासने न देता ते एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करीत होते. दरम्यान बाहेर शक्य नसले तरी त्यांची महाविद्यालयात भेट निश्चित व्हायची तिथे त्यांना टोकणारे कोणी नव्हते. पण अचानक महामारी आली आणि बंटी बबली एखाद्या टवटवीत वृक्षाने अचानक सुखत जावे तसे त्यांचे झाले दिवसागणिक संवाद कमी झाला; बबलीसाठी स्थळांची पाहणी सुरु झाली आणि बंटीवर घराचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी नोकरी करण्याची वेळ आली.
या विद्यमान परिस्थितीत तुमच्यातील बंटी आणि बबली अशाच समस्यांना थोड्याफार फरकाने तोंड देत असतील तुमच्या प्रेम कहाणीचे स्वरूप वेगवेगळे असले तरी आव्हाने मात्र सारखीच आहेत.
आपल्या समाजात प्रेम करणाऱ्याचे ढोबळमानाने २ समूह करता येतील,
१ व्यक्त प्रेमी- जे सर्वांसमोर आपले प्रेम संबंध उघड करतात आणि या प्रेम द्रोही मानसिकतेच्या लोकांच्या नाकावर टिचून “girl friend boy friend “या भूमिकेत वावरतात.
२ अव्यक्त प्रेमी- यांच्यातील नाते तितकेच घट्ट असते जेवढे इतर व्यक्त प्रेमींचे असते. फक्त यांचा विचार वेगळा असतो एकमेकांवर निष्टेने प्रेम करत असताना “boy friend girl friend “ या भूमिकेत गुंतून न पडता समांतर पातदिवर एकत्र येतात.
वर नमूद केलेल्या दोनी हि प्रकारच्या प्रेमी युगुलांसमोर समस्या आहेत व्यक्त प्रेमींना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.
नो किसिंग झोन https://www.premsparsh.com/2021/08/blog-post_4.html
आपल्याला नैसर्गिक आकर्षणातून एकमेकांप्रती एकनिष्ठ राहत असताना “boy friend girl friend “ या भूमिकेत गुंतून न पडता नाते जोपासता येणार का?
तुम्ही कसे जगावे, हे सुंदर जीवन कोणाच्या सहवासात जगावे हे ठरवण्याचा तुम्हाला अधिकार आहे. अनेकांना वाटत असेल ज्यांच्यात अनेक दिवसांपासून ओळख आहे त्यांना हे शक्य आहे. पण आम्ही एखाद्या कार्यक्रमात भेटलो, एखाद्या सार्वजनिक ठिकाणी आमची ओळख झाली, महाविद्यालयात आमच्यातील नाते बहरत गेले मग आम्हाला कसे शक्य आहे?
तुम्ही जर खरे प्रेमी असाल तर दोघांच्या हिताचा निर्णय घेण्यास तुमचे प्राधान्य असेल कारण एखाद्याने झुकते माप घेऊन दुसऱ्याला सोईस्कर आणि त्याला आवडेल तसे वागणे यात व्यवसायिक प्रेम असते. आपण जर निरीक्षण केले तर सदैव एकत्र वेळ घालवणारे, गळ्यात गळा घालून फिरणारे, घडी-घडी एकमेकांचे चुम्बन घेणारे, केवळ शारिरीक आकर्षणातून एकत्र आलेले असतील; नाही तर एक व्यक्ती मनापासून प्रेम करीत असेल तर दुसरी व्यक्ती त्यात केवळ क्षणिक आनंद शोधत असेल याचा शेवट निराशा जनक असतो. त्याचबरोबर त्यांचे सामाजिक जीवन मर्यादित होते म्हणून तुम्हाला जर विचारांवर, स्वभावावर, त्यांच्यातील चांगुलपणावर निस्वार्थ प्रेम करायचे असेल तर त्या नात्यात “B F / G F “ अशी विभागणी नको. तर हे आयुष्य दोघांचे असले तरी एकच आहे हा भाव असायला पाहिजे ज्यांना ते शक्य आहे त्यांच्यातील खरे प्रेम बाहेर येईल; मग तुमच्या नात्याची सुरुवात कशी हि झालेली असो काही फरक पडत नाही.
याचा अर्थ मी प्रेमी युगुलांच्या एकत्र वावरण्याला चूक ठरवतो असे नाही तर त्यात नैतिक बंधन असायला पाहिजे; आणि मर्यादा देखील असली पाहिजे.
२ प्रेम संबंधातील तणाव कमी कसा करावा?
जसे साचलेले पाणी घाण होते तसेच आपल्या नात्याचे असते. ज्या प्रमाणे पाण्याच्या प्रवाहात काही अड्थडे येतात उदाहरणार्थ कचरा प्लास्टिक इत्यादी त्याप्रमाणे आपल्यातील थांबलेला संवाद, एकमेकांविषयी असणारे गैरसमज, अहंकार, अविश्वास इत्यादी घटक नात्यात तणाव निर्माण करतात. पाणी प्रवाही राहावे म्हणून आपण स्वच्छता करतो त्यात पुन्हा असा अडथडा येऊ नये याची दक्षता बाळगतो तसेच नात्यात असते. जर तुम्ही तणाव ग्रस्त असाल तर सुरुवातीला मोकळा मोकद संवाद साधा, अतिशय रंगात अथवा भावुक होऊन बोलणे टाळा आणि मन मेंदू आणि मनगट सामान्य अवस्थेत असेल याची खात्री पटवा. त्यानंतर तुमची चूक असेल तर पापी मागण्यास टाळाटाळ करू नका जर तुमच्या मित्राची चूक असेल तर त्याला / तिला त्याची जाणिव करून द्या; आणि मोठ्या मनाने माप करा.
दुसऱ्याच्या चुका डोक्यात ठेवून नाते खराब करण्यापेक्षा चांगल्या आठवणी जागून पुढचे आयुष्य मंगलमय जगण्यात आनंद मिळेल.
फोटो - साभार गूगल
Nice
उत्तर द्याहटवा