मैत्री आणि प्रेमात काय फरक आहे?

आपल्या यशाचा प्रवास नागमोडी वाटेनं करायचा असतो हे आपण गृहीत धरले आहे पण तो टाळण्यासाठी  अथवा सुखकर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी प्रयत्न केला नाही. आयुष्य सर्वतोपरी संपन्न असू नये कारण ज्याप्रमाणे “ड जीवनसत्व” मिळवण्यासाठी सूर्य प्रकाश पाहिजे त्याच धर्तीवर जीवनाचे कटू सत्य पचवण्यासाठी सर्व प्रकारचे अनुभव घेणे महत्वाचेआहे. 

दुर्दैवाने जे पुस्तकात वाचायला मिळते ते वास्तवात जगता येत नाही त्यातूनच लैंगिक भेदभाव कमी करण्याचा प्रयत्न करणारे वाचक आणि त्याला कायम ठेवू पाहणारे तथाकथित समाज रक्षक यांच्यात खटके उडतात. 

याची अनेक नमुने तुमच्या आजू-बाजूला सापडतील त्यांच्या वागणुकीचे सूक्ष्म निरीक्षण करून निष्कर्ष काढा तुमची संकल्पना स्पष्ट होईल. 

 

आपल्यावर झालेल्या संस्कारांमुळे मुलगा-मुलगी हि उबी फूट पडली आहे त्यांच्यातील नात्याची लोकमान्य संकल्पना सर्वानी निश्चित केली आहे. त्यामुळे सम वयीन  रक्ताचे बहीण-भाऊ नसतील तर त्यांचे प्रेम संबंध आहेत अशी सर्वजन मनोमन खात्री करून घेतात आणि त्यांच्याविषयी कायमस्वरूपी  पण ठाम मत बनवतात त्यातूनच अनेक प्रश्न निर्माण होतात. 

१ प्रेम आणि मैत्रीत काय फरक आहे? 

२ मैत्रीचे प्रेमात रूपांतर होण्याची लक्षणे कोणते आहेत? 

३ माझे तुझ्यावर प्रेम नसून मला मैत्रीचे नाते जोपासायचे आहे हे एखाद्या मुलीला कसे सांगायचे? 

जसे दोन मित्र / मैत्रिणी असू शकतात तसेच १ मुलगा व १ मुलगी चांगले मित्र का असू शकत नाहीत? 

आपल्या समाजात असं नातं असू शकते हे स्वीकारण्याची तयारी नाही त्यामुळे दोघांकडु ते टाळले जाते. त्यासाठी शालेय शिक्षणापासून मुले-मुली यांच्यातील दरी कमी करावी लागणार जनेकरून त्या निरागस मनावर लिंगाधारित विषमता परिणाम करणार नाही आणि त्या सोबत त्यांच्यातील मैत्रीभाव वाढेल. 

 

तरुण-तरुणी एकत्र आल्यास सर्व शक्यतांना वाव असतो त्यांच्यात घट्ट मैत्री असू शकते त्याचबरोबर त्यांचे एकमेकांवर प्रेम असू शकते. म्हणून यातील सूक्ष्म रेषा कोणती आहे हे प्राधान्याने समजून घ्यावे. 

प्रेम आणि मैत्री यात काय फरक आहे? 

मैत्रीत प्रेम नसेल किव्हा प्रेमात मैत्री नसेल तर ते अपुरे आणि कृत्रिम असेल कारण नाण्याला २ बाजू असतात त्याचप्रमाणे आपल्या जिव्हाळ्याच्या नात्याला प्रेम आणि मैत्री या दोन बाजूनी समजवून घेणे भविष्यातील धोके टाळण्यासाठी उपयुक्त ठरेल. या लेखात आपण समवयीन २ भिन्न लिंगी व्यक्ती गृहीत धरून विचार करणार आहोत. हि सीमा सर्वांच्या बाबतीत सारखीच असेल असे नाही तुमच्यातील प्रघल्भतेवर निश्चित करता येते मैत्री तुन प्रेम हा प्रवास तुमच्या नात्याचा सुरु असताना तुम्ही नाते किती खोलवर जाऊ देता यावर सर्व अवलंबून असते. मित्रत्व गुण दोषांसह स्वीकारायचे असते नंतर त्यात सुधारणा करतायेऊ शकते.  मित्रत्वाच्या नात्यात स्वार्थीभाव नसून त्यांच्यातील संवादाची एक मर्यादा असते. आणि हीच वृत्ती प्रेमात देखील असते. 

 

पुढील प्रष्न स्वतःला विचारा-- 

१ तुम्ही परस्पराना गांभीर्याने समजून घेतले आहे का? 

२ एकमेकांपासून काही अपेक्षा आहेत का? 

३ तुमच्यात एकमेकांबद्दल लैंगिक आकर्षण आहे का? 

४ तुमच्यात नाते का टिकून आहे? 

५ विरह सहन होतो का? 

६ तुमच्या स्वप्नातील जीवन साथीचे गुणधर्म त्या मित्रात आहेत का? 

८ त्याचे / तिचे इतर कुणाबरोबर प्रेम सम्बन्ध आहेत का? 

९ तुमच्या सम्वादातून तुम्ही काही निष्कर्ष काढला आहे का? 

असेल तर दोघांचा हि सारखाच आहे का? 

वरील प्रश्न स्वतःला विचारून तुम्ही मैत्री आणि प्रेम यापैकी तुमचे नाते नाण्याची कोणती बाजू आहे हे ठरवू शकता. त्यातीळ सूक्ष्म फरक लक्षात आल्यावर मैत्री आणि प्रेम ह्या दोनीही गुंतागुंतीच्या संकल्पना स्पष्ट झाल्या असतील. 

आज वर  आपण अनेकांच्या प्रेम कहाण्या वाचत असताना सुरुवातीला आमची मैत्री होती नंतर त्याचे प्रेमात रूपांतर झाले हे ऐकले असेल मग हे कसे होते. मैत्रीचे प्रेमात परिवर्तन होण्याचे कोणते लक्षणे आहेत? 

ज्यांच्यात मैत्रीतून प्रेमात रूपांतर होते माझ्यामते ते खरे प्रेम असते; आकर्षणाला प्रेम समजणे चुकीचे आहे. 

 

१ अचानक आपण कोणत्या निमित्याने  भेटतो त्यातून ओळखी वाढतात,  भेटीगाठी वाढतात,  त्यातूनच विचार जुडतात,  या वैचारिक बांधिलकीतून मन जुडतात, त्या भेटीतील सर्व काही आपल्या आयुष्यातील दुर्मिळ ठेवा असतो, आणि मग ७ जन्माचे संसार रथाचे सारथी होण्याची स्वप्ने रंगवले जातात हा प्रवास सोपा नसतो तर त्या प्रवासात मैत्रीचे प्रेमात आणि नंतर विवाहात देखील परिवर्तन होण्याची दाट शक्यता असते. 

२ या मैत्रीतील विश्वास तुम्हाला दुःख वाटून घ्यायला शिकवत असेल आणि तिचे / त्याचे  सर्व एकत्र करून ते आपले आहे हा अडवीत भाव निर्माण होत असेल तर तुम्ही नक्की प्रेमात पडला असण्याची शक्यता आहे. 

 

३ तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींपेक्षा त्याच्यात / तिच्यात काही वेगळे दिसत असेल आणि तिला / त्याला देखील तसेच वाटत असेल तर नक्कीच तुमच्या मनाची तयारी झाली असावी आणि आता व्यक्त करावें लागणार नाही तर ते नैसर्र्गिक रित्या व्यक्त होईल. 

४ तुमचे विचार जुडत असतील आणि आपल्या जोडीदारांकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये असल्याचे तुम्हाला जाणवेल तर सर्वस्वाने दोघे हि स्नेहाच्या धाग्याने गुंफले असण्याची शक्यता असते. 

५ तुमच्या वागण्यात एकमेकांची काळजी, भविष्याची चिंता, एकमेकांवर दृढविश्वास  त्याचबरोबर दोघांमध्ये प्रेमभाव असेल तर डोळे बंद करून तुम्ही स्वतःला आणि जगाला आमच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले असे सांगा. 

बऱ्याच नात्यात विसंवादातून अथवा दुसऱ्याला गृहीत धरल्यामुळे आपण काही संकेताने समजकरून घेतो बर्याचवेळी तो गैर समज असतो. उदाहरणार्थ तुम्ही केवळ मैत्रीसाठी हात पुढे केला आणि तुम्हाला हृदयाला लावले आणि आपण प्रेमात पडलो आहोत याची जाणीव करून दिली तर या परिस्थितीत आपली भूमिका मांडणे फार कठीण असते. 

 

३ माझे तुझ्यावर प्रेम नसून केवळ मैत्री करायची आहे हे कसे सांगाल? 

मित्राला दुखावणे आपल्याला हि आवडत नाही त्याला फसवणे हा मैत्रीच्या नात्याला काळे फासण्यासारखे आहे. मग आपण आपले विचार कसे मांडावे? हे फार अवघड असले तरी सत्य सांगणे दीर्घकालीन फायद्याचे ठरते. त्यामुळे तिचे तुमच्यावर प्रेम आहे असे तुम्हाला वाटत असल्यास तिला प्रेमाने भावना न दुखवता मला तुझ्याशी मैत्रीचे संबंध टिकवायचे आहेत हे नम्रपणे सांगा. या नंतर तिला टाळू नका पण त्याच बरोबर नको तेवढी जवळीक निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. तिला तुमचा सहवास हवाहवासा वाटत असेल तर तुम्ही तिच्यासाठी शक्य तेवढा वेळ द्या. यातच दोघांचे भले आहे. 

 

मैत्री आणि प्रेम दोनीही एकाच नाण्याच्या बाजू आहेत आणि हे नाणे मानवी समाजातील माणुसकीच्या व्यवहाराचे चलन आहे त्यासाठी त्याचा सन्मान राखू. 

 

फोटो - pixabay aap

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा