आई-वडील कि गर्ल फ्रेंड निवड कोणत्या वेळी कशाप्रकारे करावी?

सुसंस्कारी मुले-मुली सर्वाना आवडतात त्यामुळे प्रत्येक आई-वडील लहानपणापासून आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करतात कारण ते केवळ स्वतःच्या मुलांवर संस्कार करत असताना समाजातील वाम मार्गाला लागणाऱ्या मुलांना योग्य वाट दाखवण्याची तजबीज घेत नाहीत मग त्यांचे सुसंस्कारी मुले या मुलांच्या सहवासात येतात आणि नंतर त्यांच्यासारखे होतात; त्या आई-बाबा या उभयतांना मुले चुकीच्या मार्गाने जात आहेत याची खबर देखील नसते. असण्याचे कारणच नाही जन्मदाते कधी त्यांच्या मुलांबरोबर मोकड्या मनाने संवाद साधतच नाहीत. परिणामस्वरूपी या सुसंस्काराचे कवच तुटते आणि  टवाळखोर वृत्तीचा व्हायरस त्यांच्या मनात प्रवेश करतो. 

    • असे का होते? 

      आपल्याकडे संस्काराचे स्वरूप संकुचित आहे पहिली बाधा संस्कार करणाऱ्या गुरूंच्या विचारात असते त्यांच्या ठायी आपण ज्यांना जन्म दिला केवळ तेच आपले मुले आहेत इतर मुलांवर त्यांचे प्रेम नसते पण हे संस्काराच्या साच्यातून काढलेले कच्च्यास्वरूपाचे मडके त्या ओब्द्ध-धोबड भांड्यांच्या सहवासात आले कि त्यांचा आकार घेते. सुसंस्कारी मुलगा-मुलगी असण्याचे लक्षणे कोणते? 

      १ मुलं-मुलीने आज्ञाधारक असावे-म्हणजे त्यांनी केवळ दुसरे सांगतील ते निमूटपणे ऐकावे त्यांना प्रतिप्रश्न करू नये. त्याद्वारे हे संस्कारी मुले निर्णय घेण्याची क्षमता गमावून बसतात आणि नंतर त्यांच्या आयुष्यात मोठे संकटे आली कि ते कोलमडून पडतात. 

      २ भिन्न लिंगी मित्र / मैत्रिणीच्या सहवासात राहू नये- संविधानाने लैंगिक समानता मान्य केली असताना अद्याप देखील त्याला सामाजिक मान्यता नाही. अगदी घरात बहीण-भाऊ एका ताटात जेवण करतात आणि शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गात मुलांचे आणि मुलींचे बाक वेगळे असतात त्यातूनच त्यांच्या बाळ मनावर लैंगिक भेद कोरला जातो अगदी आयुष्भर तो कायम असतो. मुले आणि मुली स्वतंत्र खेळतात, जेवण करतात, फिरायला जातात, त्यांचे मित्र / मैत्रिणी असे स्वरूप असते. मग नंतर त्यांचे मन स्वतःला आपण मुलींशी वागताना कसे वागावे? अशा स्वरूपाचे प्रश्न विचारते कारण महाविद्यालयातीळ वातावरण पूर्णपणे वेगळे असते. म्हणून या वातावरणाशी जुडवून घेताना हे चलबिचल मन त्याला वाटेल तसे ते भरकटते आणि अनेकांचे जीवन बरबाद करते. 

      ३ जाती-धर्माचे शिक्के- जन्माला येणाऱ्या मुलाला त्या कुटुंबाच्या दर्जानुसार  वाढवले जाते अनेक  कुटुंब मुलांवर जात धर्म फार महत्वाचा आहे असे बिंबवतात आणि हे मुले नंतर तसेच वागतात. अगदी तरुण वयात इतर जातीच्या / धर्माच्या भिन्न लिंगी व्यक्तीवर जीव लावून प्रेम केले तरी त्या व्यक्तीशी लग्न करण्याची त्यांची मानसिकता नसते त्यामुळे दोघांचे हि आयुष्य उद्वस्त होते. 

        असे म्हणतात “ प्रेमात आणि युद्धात सर्व काही माप असते” आपल्या काळजात अपार प्रेम आणि डोक्यात घनघोर युद्ध नेहमी सुरु असते. 

      आई-वडील , बहीण-भाऊ, नातेवाईक, समाज, प्रियसी / प्रियकर यांच्या बद्दल कायम प्रेमाचा झरा वाहत असतो. तर दुसरीकडे जात, धर्म, गरीब, श्रीमंत, गाव, शहर, प्रस्थापित, विस्थापित, अज्ञान, अंधश्रद्धा यांचा फडशा पाडावा अशी मनोमन इच्छा असते. पण खरं काही करता येत नाही आपण अशा वेळी हतबल असतो; निर्णय घेण्या इतपत आपल्या बुद्धीचा विकास झालेला नसतो. 

      या साच्यातून बाहेर पडलेल्या तरुणांसमोर त्याच्या या जडण-घडणीमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात त्याची उत्तरे काही शोधतात काही तसा प्रयत्न करतात आणि अनेक त्यांच्या निवडीतून प्रश्न निर्माण करतात. 

      महाविद्यालयात प्रेमात पडलो कि बाहेर पडावे असे वाटत नाही पण शिक्षण संपले कि आयुष्याचा नवीन टप्पा सुरु होतो त्यासाठी मनाची तयारी ठेवावी लागते. जिच्यावर सर्वस्व ओतून प्रेमाचा वर्षाव केला तिच्याशी ७ जन्माची गाठ बांधावी असे वाटत असताना, आपल्या संस्कारातून निर्माण होणारे प्रश्न दोघांमध्ये माउंट एव्हरेस्ट पेक्षा मोठा पर्वत निर्माण करतात; एकीकडे ती आणि दुसरीकडे आई-वडील दोघांपैकी कोणाची आणि कोणत्या वेळी निवड करावी? 

      तिला लग्नास नकार देणे प्रेमाची हत्या ठरेल कदाचित तुम्ही एखाद्याची हत्या केली तर एकदाच त्याला मरण येईल पण जिने तुम्हाला सर्वस्व अर्पण केले तिला “माप कर मी तुझ्या बरोबर लग्न करू शकत नाही; कृपया झाले ते विसरून जा” असे बोलणे शक्य नाही कारण हे शाब्दिक बाण प्रत्येक सूर्योदयाला तिचे काळीज चिरतील; ज्यांनी जन्म दिला त्या जन्म दात्यांना “ तिच्या शीवाय  माझे या जगात कोणी नाही मी तिच्या शीवाय राहू शकत नाही “ हे वार त्यांची गर्दन उतरवतील मग काय करायचे? 

      प्रत्येकाचा इतिहास वेगळा असतो तिचा इतिहास आणि माझा इतिहास मिळत जुळत नसेल तर कुटुंबीयांची अशा नात्याला अनुमती भेटणे अशक्य आहे. एकाचजनम एकाच जन्म  श्रीमंत तर दुसऱ्याचा गरीब कुटुंबात झाला असेल, एक कुटुंब श्रीमंत तर दुसरे कुटुंब गरीब असेल, दोघांच्या हि जाती / धर्म वेगळे असतील , कदाचित तिच्या आयुष्यात चारित्र्यावर शंका घ्यायला अनेकांना वाव असेल, एवढेच काय तर तिच्यावर अत्याचार झाला असेल तरी पण माझे तिच्यावर खरे प्रेम असेल आणि माझ्या आई-वडिलांचा तिच्या भूत काळामुळे आमच्या लग्नाला विरोध असेल तर कोणत्या वेळी आई-वडील किव्हा गर्ल फ्रेंड अशी निवड कोणत्या निकषांवर करावी? 

        हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला असेल अशा वेळी सर्वाना समाधान देणारे उत्तर सापडले असेलच असे नाही अनेकांनी या पैकी एक निवड केली असावी. आपण हा प्रश्न उद्या उपस्थित होणार आहे म्हणून आज प्रेमात पडू नये असा   विचार करणे चुकीचा आहे; त्यापेक्षा उद्या या प्रश्नाला तोंड द्यायचे आहे म्हणून आजपासून उत्तराचा शोध घेणे सुरु करावे. 

      सुरुवातीला तुम्ही तिचे तुमच्या  किती महत्वाचे आहे हे आई-वडिलांना सांगत असताना तिच्यातील जमेच्या बाजू त्यांच्या गळी उतरवा त्याचबरोबर तिच्या सोबत काही दुर्दैवी घटना घडल्या असतील तर त्यासाठी ती कशी दोषी नाही हे पटवून द्या. अखेर पर्यंत त्यांचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करा त्याची सुरुवात महाविद्यालयात असताना केल्यास अधिक फायदेशीर ठरेल हाच प्रश्न माझी पंत प्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यात निर्माण झाला होता त्यांनी काय केले हे नक्की वाचा-- नकारत दडलेला होकार https://www.premsparsh.com/2021/01/blog-post_5.html 

      अनेकांच्या बाबतीत किती हि विनवण्या केल्या तरी पदरी अपयश येते त्यांनी काय करावे? 

      प्रेम हा माणसाचे माणसाशी मन गुंफून दोघांमध्ये तू आणि मी हा फरक संपवणारा धागा आहेमग ते कोणत्या हि सजीवाच्या नात्याला लागू पडते. 

      आई-वडील प्रेम विवाहाला विरोध का करतात? 

      त्यांची पिढी जुन्या विचारांची आहे त्यांनी आपल्या आयुष्यात अनेकांचे प्रेम विवाह मोडताना त्यांचे कुटुंब अस्तव्यस्त होताना उघड्या डोळ्याने पाहिले असते तसे आपले होऊ नये हा त्यांचा हेतू असतो. त्यासाठी तुम्ही जिच्या बरोबर लग्न करणार  आहात ती या निकषांवर कशी चफकल बसते हे त्यांना समजावणे आवश्यक असते त्यासाठी कसरत करावी. ती जर वेगळ्या जाती / धर्माची असेल तर हे सहसा माघील पिढीतील लोक स्वीकारत नाहीत अशावेळी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी आपल्या नातेवाईकांपैकी कोणीही असा अंतर जातीय / धर्मीय विवाह केला असेल आणि त्यांचे सर्व सुरळीत चाले असेल तर उदाहरणे द्यावी. तुम्ही जर चांगला संवाद साधू शकत असाल तर काही हि अशक्य नाही एका सामान्य पुरुषाने तृतीयपंथी व्यक्तीशी लग्न केले हे जर त्याला शक्य असेल तर आपण नैसर्गिक रित्या जसे सर्वांचे भिन्न लिंगी व्यक्ती बरोबर लग्न होतात तसाच प्रेम विवाह का करू शकत नाही? या तृतीयपंथी व्यक्तीचा विवाह कसा झाला वाचण्यासाठी-- ऐतिहासिक विवाह https://www.premsparsh.com/2021/07/blog-post_8.html 

      जाती धर्म आपल्या सर्व पिढ्यांच्या रक्तात वाहत आला आहे त्यामुळे प्रयत्नांती तुमचे आई-वडील प्रेम विवाहाला नकार देत असतील तर त्यांची मापी मागून त्या पडत्या फळाची क्षमा मागून तुम्हाला शक्य त्या प्रकारे विवाह करा उदाहणार्थ ज्यांना शक्य आहे त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह करा अथवा तुमच्या इच्छेप्रमाणे लग्न गाठ बांधा आणि त्यानंतर तुम्हाला घरांत घेतले नाही तर स्वतंत्र राहा पण आई-वडिलांचा राग मनात ठेवू नका. ते एक दिवस तुमचा स्वीकार नक्की   करतील हा आशावाद जिवंत ठेवा. कारण शेवटी कोणत्या हि आई-वडिलांना आपल्या पोटचा गोळा टाकून देणे शक्य नाही. दोघांनी मिळून त्यांची काळजी घ्या मन जिंकण्याचा प्रयत्न करा मानवी हृदय दगडाचे नसून त्यात  करुणा असते त्यामुळे त्याच्या डोळ्यात दुसऱ्याच्या आनंदात आणि दुखत पाणी येते. दोघांपैकी एकाची निवड करण्यापेक्षा त्यांच्या-त्यांच्या भूमिकेत दोघांचा स्वीकार करा याचा अर्थ आई-वडिलांनी तिचा भूत काळ लक्षात घेऊन तुमचे तिच्यावर अपार प्रेम असताना  लग्नाला नकार दिला तरी तिच्या बरोबर लग्न करून जन्म दात्यांचे मन परिवर्तन करण्याचा शेवट पर्यंत अविरत प्रयत्न सुरु ठेवा. जातीची भिंत आडवी आल्यावर २ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काय केले वाचण्यासाठी-- जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान  https://www.premsparsh.com/2021/07/blog-post_31.html 

       
    • फोटो - साभार गूगल

    टिप्पण्या

    या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

    पुरुषांचा महिला दिन

    जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

    एक होते गाडगे बाबा