या प्रियसीने का पेटवून घेतले?

आयुष्याच्या कोऱ्या कागदावर विश्वासाच्या कुंचल्याद्वारे प्रेमाच्या रंगाने चितारलेले भविष्याचे चित्र आपल्या नजरेत जगातील सर्वाधिक देखणे असणार;  पण हे  सुंदर चित्र कोणी पाय खाली तुडवले तर तुम्हाला काय वाटेल? 

  • नाही तर ते तुमच्या सर्वस्व झोकून केलेल्या श्रमातून साकार झालेल्या चित्रावर तुमच्या नजरेसमोर तिसऱ्याने हक्क सांगितला तर तुम्ही काय करणार? 

    कदाचित अनेक प्रेमी काळजाच्या पटलावर ७ जन्म चमक कायम राहणार असे चित्र प्रेम आणि विश्वासाचे रंग भरून रेखाटत असतील आणि त्याकडे बघूनच  त्यांच्यातील नाते फुलत असणार. 

    आपल्या समाजात प्रेम विवाह करणे माझ्यामते सर्वाधिक धाडसाचे आहे कारण ज्यांना प्रेम विवाह करणे शक्य आहे ते जगातील कोणत्या हि संकटांशी २ हात  करण्यात कमी पडत नाहीत. 

    हा दृढ विश्वास प्रेमातूनच येतो;  पण प्रेम विवाह करणाऱ्यांचे जीवन काटेरी वाटेने भरलेले असते. त्यामुळेच अनेकांचे या वाटेवर प्रवास करण्याचे स्वप्न असले तरी ते साकार होत नाही अशा वेळी उभयतांचा प्रवास कल्पक नरक यातनांनी भरलेला असतो. 

    मुंबई शहरात सोनल खराब या २६ वर्षीय तरुणीचे तिचा नातेवाईक असणाऱ्या प्रकाश खराब यांच्याशी प्रेम संबंध होते; त्यांनी लग्न करण्याचा प्रयत्न केला पण ते दोघे हि नातेवाईक असल्यामुळे घरून स्पष्ट नकार आला. त्यामुळे प्रकाशचा दुसऱ्या एका मुलीबरोबर साखरपुडा झाला हे सोनलला मान्य नव्हते म्हणून ती प्रकाशच्या घरी गेली त्याच्या आई-बहिणीशी तिचे कडाक्याचे भांडण झाले नंतर तिने रॉकेल अंगावर टाकून आत्मदहन केले असून ती ५० टक्के भाजली  आहे आता तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हि बातमी इ-सकाळ या वर्तमानपत्राने दिली.  

      प्रेम भंग का होतात? यातून बाहेर कसे पडावे- आयुष्याच्या एका टप्प्यावर आपण अलगत रित्या प्रेमात पडतो त्यापेक्षा हे प्रेम त्याच्याकडे खेचून घेते असे म्हणणे सयुक्तिक ठरेल.  आणि त्याव्यक्तीचा सहवास आपल्याला कायम लाभावा असे दोघांना हि मनापासून वाटते यात गैर काही नाही हे प्रेमाची पावती असते. पण आपण अशे नाते ठेवत असताना जात, धर्म, भाषा, प्रांत, गरीब-श्रीमंत या दृष्टिकोनातून जोडीदाराकडे पाहत नाही तशे प्रेमात हे सर्व मानव निर्मित भेद-भाव निरर्थक असतात. 

    अनेक दिवस हे नाते फुलत गेले कि, आणखी दृढ होत जाते त्याचबरोबर त्यात चुंबकीय शक्ती निर्माण होते. मग कोणती हि ताकद त्यांना वेगळे करू शकत नाही. जेव्हा लग्नाची वेळ येते त्या प्रसंगी दोघांची देखील अग्नी परीक्षा असते त्यातील एक जरी या परीक्षेत अयशस्वी झाला कि,  दोघांचाहि वनवास ठरला. यावेळी वडीलधारी माणसे लग्नाचा विचार करताना सर्व प्रेम द्रोही निकष लावतात आणि ९९ टक्के जोडपे या निकषात बसत नाहीत. मग केवळ २ उपाय असतात १ ज्येष्ठ मंडळी सांगतील त्या जोडीदाराशी लग्न गाठ बांधायची आणि आपण जे वचन दिले ते मोडून खऱ्या जोडीदाराचे जीवन बरबाद करायचे; नाही तर 

    २ सर्वांचा विरोध न जुमानता कशाची हि पर्वा न करता आपल्या जोडीदाराबरोबर प्रेम विवाह करायचा. 

    हि संकल्पना खोलात जाऊन समजून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा-- जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान https://www.premsparsh.com/2021/07/blog-post_31.html  

    या अग्नी परीक्षेत बरेच प्रेमी अयशस्वी होतात आणि त्यामुळे प्रेम भंग होतो; त्यासोबत प्रेमाला व्यवसायिक स्वरूप येते अशावेळी परस्परांमधील देवाण-घेवाण दोघांमध्ये महत्वाची ठरते त्यात एक जर कमी पडला तर वितुष्ट निर्माण होते. काही प्रेमी प्रेम आणि आकर्षण यातील फरक समजू शकत नाहीत त्यावेळी त्यांच्यात विसंवाद निर्माण होतो संशयी वृत्ती बळावते आणि त्यातून प्रेम भंग होतो निमित्य कोणते हि असो प्रेम भंग झाल्यास तुमच्या हाताला नैराश्य लागणार हे निश्चित. 

    प्रेम भंग झाल्यावर येणाऱ्या नैराश्यातून बाहेर कसे पडावे- 

    जसे साचलेल्या डबक्यात घाण असते आणि वाहत्या पाण्यात प्राण असते आपल्या मनस्थितीची देखील तशेच आहे जर आपण त्या धक्क्यातून बाहेर पडलो नाही तर तिथेच संपतो; म्हणून आयुष्य जगायचे असेल तर दुःख / नैराश्य टाकून देण्याची मनाची तयारी ठेवावी लागते. प्रत्येकाच्या आयुष्यात कायम स्वरूपी जखम करणारे काही आघात होत असतात त्यातील हा एक आहे म्हणून त्याच गोष्टीचा विचार करून त्या जखमेवर मीठ चोळण्यात काही अर्थ नाही. 

    अशावेळी वास्तव स्वीकारून नवीन आयुष्याला सुरुवात करावी त्याचबरोबर आपल्याला ज्याने प्रेमात धोका दिला त्या व्यक्तीला मोठ्या मनाने माप करावे कारण त्याशिवाय आपण या नैराश्यातून बाहेर पडू शकत नाही; अशा वेळी आत्महत्येचा विचार चुकून देखील मनात अनु नका कारण आयुष्य हे अनमोल आहेत्याचा असा शेवट करणे म्हणजे स्वतःचा अपमान करण्यासारखे आहे. 

    लग्नाचे आश्वासन मोडून दुसऱ्या व्यक्तीशी त्याने / तिने विवाह केला तर काय करावे? 

    या आधुनिक युगात सर्व काही अनिश्चित आहे कदाचित तुम्ही ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करता ती व्यक्ती तुम्हाला केवळ हुलकावणी देण्याच्या हेतूने हे नाते जोपासत असणार; कदाचित लग्नाचा निर्णय घेताना त्याच्यासमोर जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे त्याने तुमच्याशी लग्न केले नसेल.  तुमच्या नात्यातील वास्तव कसे जाणून घ्यायचे यासाठी हा लेख वाचा-- फसवे प्रेम https://www.premsparsh.com/2021/06/blog-post_4.html 

    खरं तर असे आश्वासन मोडणे समर्थनीय नाही पण त्याचबरोबर काही लोक असे वागतात म्हणून प्रेम या संकल्पनेला दोष देण्यात अर्थ नाही. म्हणून नात्याची सुरुवात करताना पूर्ण विचार करावा आपले विचार जुडतात का? 

    कुणाच्या हि दबावाला बळी न पडता आपण दोघे हि प्रेम विवाह करण्यासाठी सक्षम आहोत का? 

    ज्यावेळी या प्रश्नाची उत्तरे होकारार्थी येतील तरच हे नाते आजीवन टिकू शकते; प्रेम विवाह करण्याचे स्वप्न पाहत असताना स्वतः सोबत जोडीदाराचे तटस्थ परीक्षण करावे. जनेकरून उद्या आपल्यावर असे संकटे येणार नाहीत 

 

फोटो - pixabay aap

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा