... मुळे सावत्र आई-वडिलांचा त्रास कमी करता येणार

आपल्या देशात बहू पती /बहू पत्नी विवाह बेकायदेशीर असल्यामुळे होत नसले ; तरी पूणर विवाहांचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले आहे. त्याचबरोबर पूर्वाश्रमीच्या जोडीदारांपासून झालेल्या मुलं-मुलींचे जीवनमान  ढासळले असल्याचे निदर्शनात येते. महामारी सुरु झाल्यापासून अनेक लहान मुले  अनाथ झाले; त्याचबरोबर अनेकांनी आपले एक पालक गमावले त्यामुळे त्यांच्या आई / वडिलांनी दुसरे लग्न केल्यावर त्या मुलांसमोर अनेक आवाहने असतील आपल्या सामाजिक व्यवस्थेचा विचार केल्यास आई मुलांचा सांभाळ करते; तर बाबा घरातील करते पुरुष असतात त्यामुळे सर्व निर्णय घेण्यासाठी त्यांची अनुमती आवश्यक असते. 

  • म्हणून वडिलांनी आपल्या पेक्षा सावत्र भाऊ-बहिणीकडे जास्त लक्ष दिले तर अशा परिस्थितीत आपण काय करावे? 

    या प्रश्नाचा विचार करत असताना हि परिस्थिती का निर्माण होते याचा शोध घेणे आवश्यक आहे कारण समस्येचे मूळ शोधल्या खेरीज तिचे निराकरण करणे शक्य नाही. 

    मानव हा समाजशील प्राणी असला तरी केवळ तो समाजाच्या आधारे जगू शकत नाही; तर या समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी तसेच स्वतःचे जीवनमान उंचावण्यासाठी त्याला कुटुंबाची गरज असते याच गरजेतून जगात सर्वत्र पूणर विवाह होतात. अनाथालयात ज्यांना सांभाळणारे कोणी हि नसते म्हणजेच ज्यांचे आई-वडील हे जग सोडून गेलेले असतात त्यांना प्रवेश दिला जातो. पण ज्यांचे एक पालक जिवंत असतात त्यांच्यावर मुलांची जवाबदारी येते अशावेळी त्यांना निर्णय घेण्यास कसरत करावी लागते एकीकडे मुलांचे भविष्य तर दुसरीकडे आपले सुरक्षित जीवन मग अशावेळी अनेक माता / पिता दोनी हि उद्दिष्टे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात म्हणजेच पूणर विवाह करत असताना आपल्या मुलांच्या पालनपोषणाची जवाबदारी असल्याची भावी जोडीदाराला कल्पना देतात. 

    अनेक प्रकरणात विवाह झाल्यावर काही वर्षे सुखी संसार करतात मग भांड्याला भांडे लागले कि विभक्त होतात पण तोवर त्यांनी मुलांना जन्म दिला असतो; अशा वेळी मुलांच्या जवाबदारीचे ओझे बहुतांश वेळी आईच्या खांद्यावर येते त्यामुळे तिने दुसरे लग्न केल्यावर नवीन वडील त्यांना तेवढी माया लावत नाहीत.  म्हणून हि लेकरं अघोषित रित्या पोरकी होतात त्यांच्या प्रगतीची पंख छाटले जातात. तर दुसरीकडे त्याच घरात राहणाऱ्या आपल्या सावत्र बहीण-भावाला सर्व सुविधा मिळतात याची चीड मनात असते मग अशा वेळी काय करावे? हा प्रश्न हिमाल्यासारखा आपल्यासमोर उभा राहतो. 

    तुमच्यावर जर अशी परिस्थिती ओढवली असेल तर सर्वप्रथम तिचा स्वीकार करा आणि नंतर तिच्याशी २ हात करण्याचा संकल्प करा. 

    प्राप्त परिस्थितीत हिंसाचार अथवा आत्मक्लेश यांसारखे उपाय निरर्थक आहेत; म्हणून वडिलांचे मत्परिवर्तन करण्याचा प्रयत्न करा. हे सहज शक्य नाही; किंबहुना सर्वाना शक्य नाही. म्हणून खचून न जात आपल्याला आधार देणाऱ्या आहोत तसे स्वीकारणाऱ्या नातलगांची मदत घ्या जर असे कोणी नातेवाईक नसतील तर सोयंसेवी संस्थांची सहायता मिळवा. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी  असल्यामुळे सर्वांसमोरचे मार्ग देखील वेगळे असतातम्हणून आपण यावेळी काय करावे यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळवा कारण आई-वडिलांनंतर तेच आपल्यासाठी जवळचे असतात. तुम्ही या सर्व आव्हानांशी भिडत आहात याची कल्पना तुमच्या आईला आता पर्यंत आली असेल,  पण ती देखील काही करू शकत नाही तिला देखील तुमच्याबरोबर होणारा पक्षपात जाणवत असेल पण ती हतबल असल्यामुळे तिला दुखावू नका. तर या सर्व संकटाना तोंड देऊन आपले अस्तित्व निर्माण करा दरम्यानच्या काळात आई बरोबर कायम संवाद साधा आणि तिला हसवा तिच्या चेहऱ्यावरचे समाधान तुम्हाला चिरकाल लढण्याची प्रेरणा देणार. 

    वयाच्या एका टप्प्यापर्यंत हा व्यवहार ठीक आहे. पण तुम्ही सर्व जीवन असे जगायचे नाही तुमच्या वाट्याची वडिलोपार्जित संपत्ती तुम्हाला योग्य प्रमाणात मिळत नसेल अथवा तुमच्या सोबत हिंसाचार झाला असेल तर कायदा तुमच्या रक्षणासाठी सज्ज आहे त्याला शरण जा.  कारण तुमच्या हक्काचे सर्व काही मिळवून देण्याची क्षमता त्याच्याकडे आहे अशावेळी भावनिक होऊन चालणार नाहीकारण अन्याय करणार्यापेक्षा तो सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. 

    काहींच्या बाबतीत सावत्र आई असेल तर- सावत्र आई गृहिणी असेल तर तुम्ही स्वतःचे सर्व कामे करायला सुरुवात करा ती जर त्रास देत असेल तर तिच्यावर  अवलंबून राहू नका. त्याचबरोबर तुम्ही आवश्यकतेनुसार योग्य  व्यक्तीचा सल्ला घ्या; कोणत्या हि परिस्थितीत  आत्महत्येचे विचार डोक्यात शिरणार नाहीत याची काळजी घ्या. 

    आपल्याकडे आई-वडील आणि मुलांमध्ये असणाऱ्या कटूपणातून मुलांनी त्यांची हत्या केल्याचे उदाहरणे देता येतील या टोकाच्या निर्णयापर्यंत जाण्यापूर्वी सतर्क होणे गरजेचे आहे त्यासाठी उदाहरणादाखल दिलेले लेख वाचा---- मुलाने केली वडिलांची हत्या https://www.premsparsh.com/2021/04/blog-post_6.html  हत्यारी लेक https://www.premsparsh.com/2021/03/blog-post_14.html  

    या संपूर्ण प्रवासात आपण एकटे नसून तुमच्यासारखे अनेक समदुःखी आहेत हे विसरू नये. तुम्ही आयुष्यात स्थिरस्थावर झाल्यावर तुमच्या जीवनातील काटेरी क्षण विसरून जा आणि तुमच्यावर जरी सावत्र आई-वडिलांनी अन्याय केला असला तरी त्यांना मोठ्या मनाने माप करा; कारण गुन्हेगारांना त्याच्या कृतीचा पश्चाताप करून देणे हि सर्वांत मोठी शिक्षा आहे. 

    अशा काटेरी वाटेवरून प्रवास करून आपण यशाच्या शिखरावर पोहचला असाल तर तुमच्या मार्गाने त्याच वाटेने प्रवास करणाऱ्या वाटसरूंना दिशा दाखवा त्यांना रक्त वाहत असताना चालण्याचे बळ द्या जनेकरून सावत्र आई-वडिलांच्या त्रासाला कंटाळून कोणी थांबणार नाही. 

  • फोटो - साभार गूगल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा