बुरखा काढून अफगाणिस्थानात फिरणारी हि महिला कोण आहे?

जिथे जिवापेक्षा धर्म मोठा होतो तिथे तालिबान्यांचा अफगाणिस्थान जन्माला येतो. आजची अफगाणिस्थानातील परिस्थिती डोळ्या समोर उभी करा आणि या देशाची १०० वर्षांपूर्वीची स्थिती कशी असेल याची कल्पना करा तुमच्या डोळ्या समोर नक्की कोणतं चित्र उभं राहणार? 

    धार्मिक रूढी विज्ञान युगाच्या प्रगती बरोबर अधिक सौम्य होत आहेत हे अर्ड सत्य स्वीकारत असताना अफगाणिस्थान मात्र पुढारलेला दिसतो कारण आज जिथे सर्व महिलांना बुरखा परिधान करणे, शाळेत न जाणे, एकटीने बाहेर न पडणे, नोकरी / व्यवसाय  करण्यास प्रतिबंध या सर्व गोष्टी सक्तीच्या आहेत.  त्याच भूमीत इथली राणी बुरखा झुगारून देते, मुलींसाठी शाळा सुरु करते, उच्च शिक्षणासाठी  अविवाहित मुलींना विदेशात पाठवते,  लैंगिक समतेचा अधिकार महिलांना बहाल करते, महिलांनी राजकारणात यावे यासाठी प्रयत्न करत असताना बहुपत्नी विवाहावर प्रतिबंध लावते तुम्हाला कदाचित गाद झोपेत पाहिलेले सुंदर स्वप्न वाटत असणार पण हे ऐतिहासिक सत्य आहे. 

    आजच्या युगात अनेक देशांनी लोकशाही स्वीकारली असली तरी त्यांनी गणराज्य पद्धती स्वीकारली नाही त्यामुळे तिथे राज्य प्रमुख हा राजा असतो. या युगात काही राजे अगदी मध्ययुगीन पद्धतीचे जीवन जगतात त्यांच्या श्रुंगारासाठी ते अमाप पैसे खर्च करतात आणि जनहित वैगेरे धुडकावून लावतात अशीच एका राजाची उपभोगी वृत्ती जाणून घेण्यासाठी https://www.premsparsh.com/2021/01/blog-post_27.html 

    २१ व्या  शतकात हि परिस्थिती असताना जवळ-जवळ १०० वर्षांपूर्वी एका दाम्पत्याने गुलामीत  आपले भविष्य शोधू पाहणाऱ्या अफगाणिस्थानाला  गुलामगिरीतून मुक्त केले; त्यावेळी त्यांनी केवळ राजकीय अड्थडे दूर केले नाहीत तर धर्माच्या जाचातून जनतेला मुक्त श्वास घेता यावा म्हणून प्रयत्न केले.  त्यासाठी समाज प्रबोधन करत असताना प्रसंगी अधिकाराचा वापर देखील केला. 

      हि कहाणी आहे राणी सोराया  आणि राजा अमानुल्ला खान  यांची. 

    राणीचा जन्म १८९९ साली झाला त्यांच्या कौटुंबिक वैचारिक श्रीमंतीमुळे त्यांना ज्ञानाचे ढोस देण्यात आले त्याद्वारे त्यांच्या जाणिवा समृद्ध झाल्या आणि त्यांचे आत्मचिंतनातून प्रगल्भ वैचारिक विश्व निर्माण झाले. 

    त्यांचे नवे विचार शतकानुशतकांपासून धार्मिक रूढींच्या बंधनात जीवन जगणाऱ्या जनतेला नवीन आशेचे किरण घेऊन येणारे होते. त्यासाठी जणू नियतीने त्यांना जन्माला घातले असावे. कारण तिचा प्रियकर नंतर पती झाला; त्याच्या हाती काबुलची गाडी आल्यावर ती अफगाणिस्थानची राणी झाली. 

    त्यांचा कार्यकाळ केवळ १० वर्षांचा आहे या काळात त्यांनी नेत्र दीपक कीर्ती केली. 

    सुरुवातीला १९२१ साली मुलींसाठी प्राथमिक शाळा सुरु करून स्वतःच्या मुलींना शाळेत टाकले आणि स्वतःपासून सुरुवात केली. अगदी फुले दाम्पत्यासारखे   https://www.premsparsh.com/2021/04/blog-post_10.html 

    त्यांच्या या कृतिशील परिवर्तनाला रुढिवाद्यांचा विरोध होता पण त्या आपल्या कार्यक्रमावर ठाम राहिल्या; त्यांना राजाचा पूर्ण पाठिंबा होता. 

    त्याचबरोबर त्यांनी बुरखा काढण्याचे आवाहन केले महिलांना राजकारणात येण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केले; महिलांनी वाचणे-लिहिणे शिकावे असा त्यांचा आग्रह होता. एका भाषणात राजा अमानुल्ला खान   म्हणाले- “मी जरी या देशाचा राजा असलो तरी शिक्षण मंत्री मात्र माझी पत्नी आहे.” यावरून त्यांची सामाजिक सक्रियता लक्षात येते. त्यांनी आपले कार्य क्षेत्र शहरी भागापुरते मर्यादित ठेवले नसून त्याचा विस्तार गाव खेड्यापर्यंत केला. विद्यार्थिनींना त्यांनी उच्च शिक्षणासाठी तुर्कस्थानला पाठवल्यामुळे त्यांच्यावर मोठ्याप्रमाणात टीका केल्या गेली पण त्यांची ज्ञान गंगा अविरत वाहत राहिली. 

    एका भाषणात त्या म्हणाल्या- “आपले स्वातंत्र्य सर्वांचे आहे म्हणून ते टिकवण्याची जवाबदारी सर्वांची आहे. या देशाच्या निर्मितीत पुरुषानं इतकेच स्त्रियांचे देखील योगदान असावे जसे इस्लामच्या सुरुवातीच्या काळात होते.” 

    इस्लामच्या सुरुवातीच्या काळात खर्च स्त्रियांना स्वातंत्र्य होते का? यासाठी प्रॉफिट  मोमहद पैगम्बर  यांची प्रेम कथा नक्की वाचा https://www.premsparsh.com/2021/02/blog-post_34.html 

    त्यांच्या या समाज परिवर्तनाच्या कार्यात अनेक अड्थडे आले असताना त्यांनी तितक्याच धाडसाने त्यांच्यावर मात केली कदाचित आजचा तालिबान्यांना हे जर समजले तर नक्कीच त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल . 

    त्यांचे विचार शतकानुशतकांचा अभ्यास करून पुढचे हजारो वर्षांचे भविष्य घडवणारे होते; पण वैचारिक दिवाळखोर लोकांना ते पचवता आले नाहीत म्हणून १९२९ साली तिथेसत्ता बदल झाला आणि या अफगाणी फुले दाम्पत्याला देश सोडावा लागला नंतर त्यांनी भारत देशातील मुंबई शहरात आश्रय घेतला;  त्यांना नंतर एक मुलगी झाली तिचे नाव इंडिया ठेवले. 

    १९६८ साली राणीने जगाचा निरोप घेतला त्यांच्या ८ वर्षे आधी राजा हे जग सोडून गेला पण त्यांनी अनेकांच्या मनावर आपले राज्य कायम ठेवले. 

    धर्माचा खरा अर्थ समजून माणुसकीचा धर्म जोपासणाऱ्या या मानवी ईशवरांचे दर्शन आमच्या भारत मातेस झाले तो क्षण अनेक वर्षांपासून  एकमेकांच्या भेटीस आतुर  असणाऱ्या आई आणि तिच्या मुलांच्या भेटीचा होता. 

    अशा वेळी इंडियाची आई आणि भारत माता मला सारख्याच वाटतात कारण दोघी हि सहिष्णू आहेत. 

    फोटो - साभार गूगल

     

    टिप्पण्या

    या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

    पुरुषांचा महिला दिन

    जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

    एक होते गाडगे बाबा