आई मी तुझ्या पोटी पुनर जन्म घेईल

या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाची  इतरांना  पराभूत करून स्वतः विजयी होण्याची वृत्ती वाढली आहे;  कोणते हि क्षेत्र  असो इतरांचे  मेहनतीने मिळवलेले लुटणे हा त्यासाठी वापरात येणारा सोपा आणि लोक प्रिय मार्ग आहे. 

    या अस्थिर विश्वात स्त्रियांचे सर्व प्रकारे अतोनात शोषण होते त्या पैकी अनेकी स्वतःला संपवतात. पण तुम्हाला कोणी  सासरच्या  जाचाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याचे सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण मी तुम्हाला हे  सांगतो आहे कारण लोकसत्ता या वर्तमान पत्रात हि बातमी  प्रकाशित झाली. त्यानुसार पुण्याच्या निकीलने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या  केली. 

    सून मुख पाहण्याची सर्वच मुलांच्या आईला घाई झालेली असते तशी निकिलच्या आईला देखील झाली होती म्हणून त्याने गेल्या वर्षी लग्न केले. लग्नानंतर  काही दिवस जरा ठीक वातावरण होते;  आणि त्यानंतर ते बिघडत गेले.  त्याला सासरच्या लोकांकडून त्रास दिला जात असे पण त्याने सहनशीलता दाखून आपली सुटका करण्याचा प्रयत्न केला;  मात्र जसे मगरीच्या जबड्यात अडकल्यावर आपण सुटण्याच्या झटापटी केल्या तरी अप्रत्येक्षपणे आपण स्वतःलाच अडकवतो तसे त्याने हे दिवस देखील जातील या आशेवर राहून अन्याय सहन केला.  शेवटी त्याच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि त्याने पत्नीच्या सालीने फाशी घेतली.  मृत्तिवपूर्वी त्याने एक चिट्टि लिहून आपल्या आत्महत्येचे कारण स्पष्ट केले त्यात त्याने आपण सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सांगितले;  त्याचबरोबर कर्जाचा डोंगर असल्याचे देखील नमूद केले.  तसेच आई मी तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेईल म्हणून तू माझ्यानंतर माझ्या बाळाला सांभाळ हि विनंती केली.  मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री याना दोषींवर कडक कार्यवाही करा अशी याचना केली. 

    पुरुषांना बऱ्याच वेळी समाज त्रास देतो हि काही पहिली वेळ नाही पण त्याचे स्वरूप मात्र वेगवेगळे असते. समाजाने एका पुरुषी नाव असणाऱ्या व्यक्तीचे अस्तित्व स्वीकारले नाही त्याविषयी सविस्तर वाचण्यासाठी https://www.premsparsh.com/2021/02/blog-post_20.html 

    विवाह संस्था केवळ २ व्यक्तीचे लग्न लावून देत नाही तर २ कुटुंबियांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण करते. दुर्दैवाने या विवाहांना बाजारि स्वरूप आले आहे हुंडा पद्धती त्यातीलच एक उदाहरण आहे. त्याचबरोबर मुलींच्या नातेवाईकांच्या मुलांकडून अवास्तव अपेक्षा वाढल्या आहेत त्यामुळे अनेकांचे संसारी आयुष्य म्हणजे काटेरी वाटेवरचा कधी हि न संपणारा प्रवास आहे. त्या सोबत घरात सासू-सुनांचे भांडणे नवऱ्या मुलाला कात्रीत पकडून दररोज फाडतात पण त्याला होणाऱ्या वेदना कुणाला जाणवत नाहीत; तसेच तो सार्वजनिक रित्या व्यक्त देखील करू शकत नाही. म्हणून एकीकडे आई आणि एकीकडे बायको त्यांच्या मध्ये हा;  यात त्याला कुणाचीच बाजू ठामपणे घेता येत नाही त्याचबरोबर सासूकडून सुनेला हुंड्यासाठी टोमणे मारले जातात त्याचा वचपा ती नवऱ्यावर काढते. हि वृत्ती गरीब-श्रीमंत सर्वांमध्ये सारखीच आहे एका सुशिक्षित कुटूंबाने फक्त हुंड्यासाठी सुनेला जाळून तिचे तुकडे करून शेतात फेकून दिले. नेमके काय झाले हे जाणून घेण्यासाठी https://www.premsparsh.com/2021/07/blog-post_28.html 

      निकीलने त्याला कोणत्या प्रकारे त्रास दिला जात होता या विषयी लिहिले नसले तरी त्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली हे सत्य आहे. म्हणून एखाद्याला आत्महत्येस भागपाडणे हा अपराध आहे त्यासाठी दोषींना शिक्षा झाली पाहिजे. 

    या घटनेच्या निमित्याने जावई सासरच्या नात्यावर चर्चा देखील करणे गरजेचे वाटते कारण आज पर्यंत आपण जावयाचा आदर करणारे त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे सासर अनुभवले / पहिले आहे; आता त्याचे दुसरे रूप देखील समोर आले आहे. 

    सासरच्या मंडळीने जावयाला अगदी डोक्यावर घेऊन नाचावे या मताचा मी नाही पण त्याचबरोबर त्याला धाकात ठेऊन आपल्या हातचे बाहुले बनवावे असे मला वाटत नाही. 

    सर्व सासू-सासर्यांनी जावयाला आपल्या मुलाच्या ठिकाणी पाहावे कारण जसा हा तुमचा जावई आहे तसा तुमचा मुलगा दुसऱ्याचा जावई आहे. तुम्ही जसे तुमच्या जावयाशी वागता तुमच्या मुलाबरोबर त्याच्या सासरचे लोक तसे वागले तर तुम्हाला आवडेल का? 

    काहींच्या मते आमचा मुलगा सज्जन आहे जावई वेसनी आहे म्हणून आम्ही त्याला ठीक करण्यासाठी तसे वागतो अथवा त्याने लग्नापूर्वी आम्हाला चुकीची माहिती दिली त्याचा राग आमच्या मनात आहे; माझ्या मुलीला तो फार त्रास देतो अशे अनेक कारणे असू शकतात. 

    या सारख्या समस्येवर मात करण्यासाठी विधायक मार्ग आहेत त्यांचा विचार करू.  

    १ तुम्हाला लग्नापूर्वी चुकीची माहिती देऊन फसवले असेल तर- सर्वानी विवाह ठरवताना अनेकदा माहिती तपासून पाहावी सत्यतेची खात्री करून घ्यावी. तरी तुम्ही फसले असाल तर तुम्ही फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकता जर तुम्हाला न्यायालयात जायचे नसेल तर आहे त्या परिस्थितीतून त्यांचे आयुष्य सुखकर होण्यासाठी प्रयत्न करावे. 

    २ जावई वेसनी असेल तर- वेसनी माणसे सर्वाना त्रास देतात त्यांच्या पत्नी कायम विजेच्या तारेवर चालतात आणि आपल्या मुलीच्या वाट्याला अशे जीवन येणे आई-वडिलांना जीवनभर दुःख देणारे असते. त्याला वेसनापासून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे त्याचे अर्थार्जनाचे मार्ग हेरून बंद करावे. तो जर स्वतः कमावत असेल आणि त्या पैस्यातुन वेसण करीत असेल तर इतर मार्ग वापरावे- वेसण करून उदाहरणार्थ दारू पिऊन  घरी आला असेल तर  त्याला घरातून बाहेर काढावे, त्याला जेवायला देऊ नये, तो मुलांकडे दुर्लक्ष करीत असेल तर नातेवाईकांना सांगून त्याच्यावर नैतिक दबाव आणावा, तो जर हिंसाचार करीत असेल तर कायदेशीर  मार्ग वापरावे. दारू अनेकांचे जीवन  कसे उद्वस्त करते हे वाचण्यासाठी https://www.premsparsh.com/2021/05/blog-post_28.html 

      शेवटी दोनी हि बाजूनी चांगले नाते जोपासण्याचा प्रयत्न करावा कारण जिथे राजा-राणीचा संसार असतो तिथे आनंद असतो. 

    फोटो - साभार गूगल

     

    टिप्पण्या

    या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

    पुरुषांचा महिला दिन

    जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

    एक होते गाडगे बाबा