रक्षा एका नात्याची
मानवी नात्याचा विचार केल्यास सर्व नात्यांमध्ये विविधता आढळते; त्यापैकी व्यापक आणि समृद्ध नाते बहीण-भावाचे असते. या नात्याच्या विविध छटा बघत असताना त्यातील प्रेम भाव आणि निस्वार्थी वृत्ती तसेच खोडकर स्वभाव सर्वाना एकाच पातदिवर आणून सोडतो.
बहीण-भाऊ या नात्याचा उत्सव म्हणजे रक्षाबंधन या दिवशी बहीण भावाला राखी बांधून या नात्यात स्नेहाचा धागा गुंफते म्हणून सर्व बहिणींना रक्षाबंधनाच्या खुप्प-खूप शुभेच्छा.
या उत्सवाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधून तिच्या रक्षणाचे वचन घेते आणि भाऊ वर्षभर तिचे रक्षणकरण्याचे वचन देतो; हि वर्षानुवर्षांपासून चालत आलेली परम्परा आहे. या परंपरेच्या निर्मितीचा विचार केल्यास
तिला तिच्या भावापासून जीवितास धोका आहे का?
या प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने होय असे द्यावे लागते. कारण पुरुष प्रधान संस्कृतीत तिचा कायम छळ झाला तिला स्वातंत्र्य उपभोगू दिले नाही म्हणून ती परावलंबी झाली. माणूस हा सामाजिक प्राणी आहे त्यामुळे त्याने सर्वांशी सामंजस्याने वागावे हे अपेक्षित असताना ती घरा बाहेर पडली कि बहुतांशी वासनांध पुरुषांसाठी ती केवळ एक सजीव वस्तू असते त्यांच्यामते आपल्या वासनापूर्तीसाठी तिचा उपयोग करून घेणे हे मर्दानगीचे लक्षण आहे. इथेच समाजातील बंधुभाव लोप पावतो
म्हणून तिला सुरक्षितेसाठी घरातील पुरुषांवर अवलंबून राहावे लागत असते. त्याचबरोबर तिचे लग्न झाल्यावर हक्काचे माहेर मिळावे या भावनेतून ती भावाकडून सुरक्षिततेची अपेक्षा ठेवत असणार काही जरी असले तरी आता या नात्यातील प्रेम दृढ होण्यासाठी हा उत्सव उपयुक्त आहे.
टोळी करून राहणारा माणूस हिंसेच्या मार्गाने वर्चस्व प्रस्थापित करू लागला त्यामुळे बलवान पुरुषांच्या खांद्यावर सुरक्षेची जवाबदारी आली आणि कालांतराने त्यांनी सर्वत्र आपली सत्ता स्थापन केली त्यातून स्त्रियांनी आपले स्वतंत्र घालवले आणि लिंगाच्या आधारे भेद करणारी समाज व्यवस्था उदयास आली. त्यातूनच पुढे पुरुषांनी अनेक पत्नी करणे अनेक स्त्रियांशी सम्बन्ध ठेवणे हे सर्व समाज मान्य झाले त्याच बरोबर स्त्रियांनी चूल आणि मूळ एवढेच क्षेत्र मर्यादित करून ठेवले. यामुळे स्त्रियांवर अत्याचार वाढले; त्या अबला झाल्या त्याचा फायदा घेऊन समाजाने तिला दोष द्यायला सुरु केले. तिच्या सर्व हालचालीवर बंधने आल्यामुळे तिच्यातील निर्णय घेण्याची क्षमता संपली त्यामुळे ती पुरुषांचा शब्द आज्ञा मानून जगणारी एक निष्ठ स्वामींनी झाली. अशा बिकट परिस्थितीतून तिने स्वतःला बाहेर काढले आणि आज प्रगतीचे शिखर गाठत आहे. तरी देखील पुरुष प्रधान संस्कृतीच्या स्पष्ट खुणा तिच्या सर्व हालचालीवर दिसतात म्हणून कदाचित आजची स्त्री तिच्या सर्व भावंडाना माझे जाचक पुरुष प्रधान संस्कृतीच्या धोक्यापासून रक्षण करहे वचन मागत असणार.
भाऊ-बहीण एक विलक्षण नाते- प्रत्येकाला या नात्यातील गोडवा चाखायला मिळतो फक्त त्याची तयारी असायला पाहिजे ज्यांना रक्ताची बहीण नाही त्यांना देखील शक्य आहे त्यासाठी इतर मुलींकडे त्या नजरेने पाहावे लागते. लहानपणी दोघे बहीण-भाऊ कुरघोडी करतात एक मेकांची तक्रार करतात त्यांच्या स्वभावातच खोडकर वृत्ती असते जसे वय वाढत जाते त्याचबरोबर त्यांचे नाते फुलत जाते. बहीण कायम दातृत्व स्वीकारते तिला आईने खाऊ दिला असेल आणि तिच्या लाडक्या भावाला दिला नसेल तर ती त्याच्यासाठी काढून ठेवते त्याला जास्त देऊन स्वतः कमी खाते. तिची हीच वृत्ती सदैव अनुभवास येते ती केवळ बालपणी असे वागत नाही तर शेवट पर्यंत तिचा स्वभाव बदलत नाही. आई-बाबा त्याच्यावर रागावले तर ती त्याची बाजू घेते नेहमी भावाला पाठिंबा देणारी बहीण फार समजदार वाटते. कधी काही चुकलेच तर ती खरपूस समाचार घ्यायला देखील विसरत नाही आपल्या लाडक्या भावाला दुःखाचा स्पर्श देखील होऊ न देणारी ताई न कळत संकटांशी २ हात करण्याची शक्ती देते; कदाचित त्या नात्याची ती अद्भुत ताकद असावी. लग्न झाल्यावर माहेरचा मान राखण्यासाठी ती कायम त्याग करते दुःखात हसण्याचे तिचे सामर्थ्य फक्त तिच्याकडेच आहे कधी हि न मागणारी ती खूप काही देऊन जाते. सासरी आपल्या भावाचा रुबाब कायम असावा म्हणून ती झिजत असते भाऊ कसा हि असो तिच्यासाठी मात्र तो कायम काळजाचा तुकडा असतो.
मी फार भाग्यवान आहे मला रक्ताचे नाते असणाऱ्या २ बहिणी आहेत त्याचबरोबर माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या असंख्य बहिणी आहेत; आज मी जो काही आहे त्यात ताईचा वाटा सिंहाचा आहे.
ताई म्हणजे काय? जन्म न देता आईचे प्रेम देणारी प्रत्येक स्त्री हि ताई असते.
हे टाळले पाहिजे- आज स्पर्धेच्या युगात व्यक्तिवादी वृत्ती वाढल्यामुळे सर्वाना आपल्याकडे जास्त संपत्ती असावी असे वाटते यासाठी बहिणी त्यांच्या वाट्याचे भावाला मागतात अशा वेळी हे एकमेकांना घास भरवणारे बहीण-भाऊ एकमेकांना न्यायालयात खेचतात त्यातून नात्यातील गोडवा नष्ट पावतो; म्हणून सर्व भावांनी संपत्तीसाठी बहिणीच्या मायेला पारखे होऊ नये तिच्या वाट्याचे तिला देत असताना तिचे माहेरी मनापासून स्वागत करावे. म्हणून आजच्या दिवशी या अतूट नात्याचे रक्षण करण्याचा आपण संकल्प करू.
फोटो - साभार गूगल
सुंदर लेख
उत्तर द्याहटवाधन्यवाद नेहमी असाच प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा आहे.
हटवा