उस तोंड कामगाराचा मुलगा drझाला पण

नक्की विचारात गुरफटून टाकणारा संघर्ष प्रत्येक श्वासागणिक करणारा तरुण वैद्यकीय विद्यार्थी dr. राहुल पवार यांची दिनांक २६-०५-२०२१ रोजी  मृत्तिवशी झुंझ संपली. 😢

 परिस्थिती तुमच्या यशातील अडथडा नसून ती देखील आपली परीक्षा घेत असते. काही या परीक्षेत अपयशी होऊन परिस्थितीला दोष देतात; तर काही परिस्थितीशी दोन हात करून यशोमाला आपल्या गळ्यात घालतात. Dr. राहुल यांनी देखील यशोमाला गळ्यात.  घातली आणि आपल्या रुग्ण रुपी विठ्ठलाची सेवा करायला सुरुवात केली. 

म्हणतात ना, [ जो आवडे सर्वना, तोचि आवडे देवाला ] नुकतीच अंतिम वर्षाची परीक्षा देऊन स्वप्न पूर्तीचा सोहळा मनात साजरा करत असताना त्यांना covid आजाराने गाठले. आणि नंतर तब्यत खालावत गेली त्यांना कृत्रिमरीत्या श्वास पुरवण्यात आला; त्याचबरोबर म्युकरमायकोसिस या आजाराची बाधा झाली. आणि दोन शत्रूशी लढताना त्यांची दमछाक झाली. 

त्यांच्या कुटुंबाने खडतड परिस्थितीत त्यांना पाठिंबा दिला. त्यांच्या शिक्षणासाठी कर्ज काढले. 

त्यांचे आई-बाबा दोघे ऊस कामगार मजूर आता त्यांना शिकवण्यासाठी जिद्दीला पेटल्यावर थांबणार कसे, त्यांनी मिळेल तिथून कर्ज उचलले; आधीच कराराचे पैसे घेऊन ते राहुल याना पाठवायचे. कारण राहुल हा शाळेतील सगळ्यात हुशार विद्यार्थी असल्याचे शिक्षकांनी सांगितल्यावर त्यांच्यासाठी या मुलाला शिकवणे हे म्हातारपणात शिदोरी जमा करण्यासारखे असावे. सर्व आई-बाबाना आपल्या मुलाने मोठे होऊन नाव कमवावे असे वाटते. https://rautpratikpr9622394.blogspot.com/2021/01/blog-post_17.html   

१२-वि नंतर CET परीक्षेत त्यांना कमी गुण मिळाले असले तरी NEET परीक्षेत किमान खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेल एवढे गुण मिळाले. आणि त्यांनी लातूरच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. 

त्यांना आपल्या परिस्थितीची पूर्ण जाणीव होती; त्यामुळे ते काही डॉक्तरांना सहायता करीत असायचे. त्याद्वारे अथार्जन करून आपला खर्च भागवण्याचा प्रयत्न करत असत. त्यांचे मित्र सांगतात, [  आम्ही राहुलला कधीही वेळ वाया घालवताना बघितले नाही. ] 

त्यांना एक लहान भाऊ आहे तो वैवाहिक असून त्याला डिड वर्षाची मुलगी आहे. राहुल यांचे लग्न झाले नव्हते. 

त्यांचे लहान भाऊ सचिन पवार सांगतात, [ राहुल आमच्या घरातील करता होता; त्याने त्याच्या शिक्षणासाठी अनेक ठिकाणाहून कर्ज घेतले होते. नेमके कोणाकडून घेतले याची माहिती आम्हाला नाही. ] 


आज त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे. त्यांच्याकडे आपला उदरनिर्वाह पूर्ण करण्या एवढे देखील पैसे नाहीत. 

राहुल यांच्या कुटुंबीयांनी उपचारासाठी देखील पैसे गोळा करायला सुरुवात केली असताना, त्यांच्या मित्रांनी देखील निधी उभारायला सुरुवात केली. याची माहिती ते उपचार घेत असलेल्या रुग्णालयाला मिळाल्यावर रुग्णालयाने त्यांच्यावर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला. यासाठी औरंगाबादच्या MGM रुग्णालयाचे आभार. 

👏👏

शासनाने आत्मशिप करणाऱ्या डॉक्तरांना विम्याचे स्वरक्षण दिले नाही. तसेच सुरुवातीला अश्वासन दिल्याप्रमाणे ५०००००० रुपयांची आर्थिक मदत देखील केली नाही. त्यामुळे शिक्षणासाठी घेतलेले कर्ज तसेच उपचारासाठी घेतलेले कर्ज या कुटुंबाने कसे परत करायचे? 

करता पुरुष गेल्यावर या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालणार? 

कोरोना योध्ये म्हणताना या योध्यांच्या सुरक्षिततेची जवाबदारी कोण घेणार? 

गरीबाच्या मुलाने गरिबीतच जगायचे आणि गरिबीतच मरायचे का? 

अशे असांख्य प्रश्न णोत्तरीत आहेत. एकीकडे ऊस तोड कामगारांमध्ये शिक्षणाबाबत असणारी उदासीनता dr.राहुल यांच्यामुळे काही प्रमाणात कमी करता अली असती. 

त्याचबरोबर त्यांच्या हातून दीर्घकाळ रुग्ण सेवा झाली असती . 

त्याचबरोबर आई-बाबानी केलेल्या कष्टाचे फळ त्यांना चाखता आले असते. 

पण आता यातले काही हि होणार नाही. पण आपण ज्या मुलाला हाडाचे मनी आणि रक्ताचे पाणी करून शिकवले तो रुग्णांची सेवा करताना गेला. एवढे समाधान मात्र  त्यांच्या कुटुंबियांना मिळाले असेल. काही दिवस समाजाकडून त्यांना मदतीचा हात दिला जाणार नंतर भडभडत्या रक्ताच्या जखमा घेऊन त्यांना जगावे लागणार. 


अशा अनेक राहुलच्या कुटूंबियांची हृदय दवक कथा आहेत. १३०० च्या  जवळपास डॉकटर शहीद झाले. इतर आरोग्यदूत देखील शहीद झाले. आपल्याकडे दुर्दैवाने केवळ दिखावा केला जातो; प्रत्येक्षात मात्र त्यांना मदत केली जात नाही. सुरुवातीला टाळी, थाळी वाजवली नंतर त्यांच्यावर हवाईदलाने पुष्पवृष्टी केली. कोरोना योद्धे म्हणून त्यांना गौरवले पण खऱ्या समस्या सोडवण्याचेप्रयत्न झाले नाहीत एका हि योध्याला आश्वासनाप्रमाणे ५०००००० रुपयाचा विमा दिला नाही. 

१ कामाचे तास कमी करावे-- आज डॉक्तरांना १३-१४ तास काम करावे लागते त्यांचा ताण कमी राव. त्यासाठी विदेशातून वैद्यकीय पदवी घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांना  कामावर रुजू करून घ्यावे. त्याचबरोबर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सहायक डॉकटर म्हणून नेमावे. रुग्णांची गर्दी कमी करण्यासाठी स्थानिक पातदिवर वैद्यकीय सुविधा निर्माण कराव्या. 

२ डॉक्तरांना सुरक्षा द्यावी. आज प्रचंड शारिरीक आणि  मानसिक तणाव खाली कोरोना योध्ये रणांगणात उतरले असताना त्यांना एखादा राजकीय वलय असणारा व्यक्ती अपमानित करतो, तसेच त्यांच्यावर रुग्णांचे नातेवाईक हल्ले करतात अशा वेळी यांचे मनोध्येर्य खचते. यासाठी दोषींवर कड्क कार्यवाही होणे आवश्यक आहे. 

३ मानधनात वाढ करावी-- आज अशा सेविका संपूर्ण गावाच्या आरोग्याची काळजी करतात पण त्यांना तुटपुंजे मानधन दिले जाते. इंटमशीप करणाऱ्या डॉक्तरांना देखील पुरेशे मानधन दिले जात नाही. याना देखील कुटुंब असते हे सरकारने विसरू नये. शासनाकडे तेवढे पैसे नसतील तर लोक प्रतिनिधींच्या  मानधनात कपात करावी. तसेच कोरोना योध्यांच्या कुटुंबियांना प्राधान्याने  लस देऊन त्यांना आरोग्य विमा कवच द्यावे. 

जनेकरून उद्या एखाद्या dr. राहुल यांच्या जाण्याने कुटुंब उघड्यावर येऊ नये. 

आपले सर्व पणाला लावून रुग्णांचे प्राण वाचवणार्या सर्व देवदूतांना प्रणाम 

फोटो - साभार गूगल

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा