जमीनिवरचा सूर्य-हेलन केलर

बोलता येत नाही, ऐकायला येत नाही, दृष्टी देखील नाही, तरी देखील तिने १२ पुस्तके लिहिले. अमेरिकेतील दृष्टिबाधित लोकांना  मदत  केली . राजकीय कार्यकर्ती म्हणून आपला ठसा उमटवला.  व्याख्याती म्हणून अनेकांना ज्ञानाचा ढोस पाजला. तिच्या या दैदिप्य्मन कीर्तीचा सन्मान म्हणून अमेरिकेतील सर्वउच्च नागरी पुरस्कार   बहाल केला. आज  या  जगाला दृष्टी  देणाऱ्या  हेलन केलर यांची जयंती.  त्यांना त्रिवार अभिवादन. 

  • आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक लोक  करून स्वतःच्या  खापर परिस्थतीवर फोडतात. आपल्या आयुष्यातील  सुई  एवढ्या   दुःखाचा बाजार मांडत बसतात. पण हेलन   केलर यांच्या जीवनाकडे बघून  स्वतःच्या  जीवनात   त्यांनी अनुभवलेले जग त्या   स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी केलेला संघर्ष आणि सम दुखी लोकांसाठी मदतीचा हात पुढे करण्याची तीव्र इच्छा शक्ती  चिरकाल प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहे. म्हणून  त्यांच्याविषयी एकच वाक्य सयुक्तिक ठरेल अशक्य ते शक्य करून दाखवले. 


    हेलन केलर यांच्या  जन्म  आजच्याच दिवशी म्हणजे २७-०६-१८८९ रोजी अमेरिकेत झाला त्यांचे वडील सैनिक होते. एका सामान्य मुलींसारखे त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीचे १९ महिने गेले; त्यानंतर त्यांना एक दुर्धर आजार झाला आणि त्या दरम्यान त्यांनी ऐकण्याची, बोलण्याची, पाहण्याची शक्ती गमावली. आणि त्यांच्या खऱ्या आयुष्याला सुरुवात झाली. त्यांचा प्रवास सोपा नव्हता आज देखील दिव्यांग व्यक्तीचे जीवन संघर्षमय आहे; त्या काळाची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. 


    त्यांनी विशेष विद्यार्थ्यांच्या शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर महिलांच्या केम्ब्रिज विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला. कला शाखेत त्यांनी पदवी मिळवली; पदवी मिळवणाऱ्या त्या पहिल्या अंध-मुखबधीर व्यक्ती होत्या.  हे वाचत असताना सर्वांच्या मनात त्या लिहीत कशा असतील? त्या बोल्ट कशा असतील? इत्यादी प्रश्नि घर केले असेल. त्यांचे स्पर्शज्ञान फार चांगले होते. एकदा त्यांच्या शिक्षिकेने त्यांचा हात नळाखाली नेऊन नळ सुरु केला आणि मग त्यांना याला पाणी म्हणतात असे शिकवले त्याच प्रमाणे जमिनीला हात लावून याला जमीन म्हणतात असे सांगितले. वस्तू प्रीच्याशिवाय त्यांचे आकलन शक्य नव्हते. त्यांच्या विचारणा त्यांनी आपल्या दुःखांवर कधीच प्रभावी ठरू दिले नाही. आपल्या शारिरीक मर्यादांचे भावनिक कार्ड वापरून त्यांनी आपली सामाजिक  जवाबदारी कधीच नाकारली नाही. या संपूर्ण जीवनात त्यांना त्यांच्या शिक्षिका  ‘एनी सुलिव्हान’   यांची अनमोल साथ लाभली. त्यांच्या शिक्षिकेने त्यांना शिकवण्यासाठी विविध क्लुप्त्या वापरल्या.   


    त्यांनी वयाच्या २२ वर्षाच्या असताना [the story on my life] he हे पुस्तक लिहिले या पुस्तकात त्यांनी त्यांच्या शैक्षणिक जीवनावर भाष्य केले आहे. 

    त्याचबरोबर [Light in My Darkness, ] या पुस्तकात त्यांच्या अंधकारमय वाटणाऱ्या जीवनाचा प्रकाश अर्थात त्यांची जगाकडे बघण्याची दृष्टी मांडली आहे. 

    त्यांच्या या महान कार्याची दखल घेऊन अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती  यांनी  “राष्ट्रपती स्वतंत्रता पदक “  अमेरिकेतील सर्वउच्च  नागरी पुरस्कार दिला. या जमिनीवरच्या सूर्याने आपल्या हयातीत आणि त्यानंतर देखील अनेकांना जगण्याची प्रेरणा दिली आहे .  भवंशातील अनेक पिढ्या त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आयुष्याचे प्रयोजन ठरवतील 

    ०१-०६-१९६८ रोजी त्यांनि जगाचा  निरोप घेतला. 


    जगातील अनेक विद्यापीठांनी त्यांना विद्या वाचक पती  हि पदवी दिली. भारतातील दिल्ली विद्यापीठ, जर्मनीतील बर्लिंग विद्यापीठ, स्कॉटलंडमधील कलॅस्को विद्यापीठ इत्यादी विद्यापीठांचा समावेश होतो. 


    प्राप्त परिस्थितीचा बहू करून जगण्यापेक्षा आपल्यातील सर्वोत्तम आहे त्यावर सर्व लक्ष केंद्रित करून आपली ओळख निर्माण करावी. आज आपण जगाला पाहू शकत नसू पण आपल्या कार्याला जग नक्की पाहणार असा स्वतःवर विश्वास ठेवा. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा