शाहू महाराजांचे बहू आयामि व्यक्तिमत्व

मानसिक गुलामीत जगणाऱ्या समाजात जाती-धर्माचे वर्चस्व असते. अशा समाजात माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला जातो. 

अशा बिकट परिस्थितीत केवळ २० वर्ष वय असणाऱ्या तरुणाने राज्याची सत्ता हाती घेऊन आपल्या २८ वर्षाच्या कार्यकाळात अनपेक्षित क्रांती घडून आणली. आणि इतिहास रचला. 

त्या राजेश्री लोक राजा शाहू महाराज याना जयंती दिनी मानाचा मुजरा.  

महाराष्ट्राला पुरोगामी म्हणून ओळखले जाते; त्याच महाराष्ट्रात गोविंद पानसरे,  नरेंद्र ढबोळकर सारख्या समाज प्रबोधनकारांच्या हत्या केल्या जातात. पण १०० वर्षांपूर्वी  एका हातात  समाजाचे ज्वलन्त प्रश्न आणि दुसऱ्या हातात सुधारणावादी कृतीतून द्यायचे उत्तर शाहू महाराजच्या जगण्याचे प्रयोजन होते. त्यांचे शिक्षण  कुठे झाले? 

त्यांचा राज्य भिषेक केव्हा संपन्न झाला?

त्यांच्या अशा कार्यकाळाचा सर्वाना परिचय आहे म्हणून आज जयंती दिनी एका वेगळ्या आयामातून विचार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. 


तत्कालीन समाजात रूढी परंपरेचे वर्चस्व होते. अनेक अनिष्ठ चाली रीती लोकांच्या जगण्याचा एक अविभाज्य घटक होत्या. त्यानुसार स्त्री घरातील एक तर देवी होती नाही तर पायातील  चप्पल होती. तिला व्यक्ती म्हणून स्थान नव्हते. चूल आणि मूळ एवढेच तिचे जग होते. त्याचबरोबर समाजातील प्रचंड मोठा वर्ग अस्पृश्य समजला जात असे. अशा  विषमतेवर  आधारलेल्या समाजातील तळागळातील लोकांपर्यंत शिक्षण   पोहचण्याचे   कारणच नाही.म्हणून या सर्वांच्या उन्नतीसाठी राजा  त्यांनी शिक्षण, शेतकरी, स्त्रिया,  अस्पृश्य कला, क्रीडा, इत्यादी क्षेत्रात भरीव कार्य केले. 


त्यांच्या राजवटीच्या पहिल्या २ वर्षात २ मोठे संकटे परीक्षा घेण्यासाठी उभी ठाकली. दुष्काळ आणि प्लेग महामारी 

त्यांनी या काळात रयतेला विश्वास दिला त्यांनी त्यांच्या चुली कशा पेटत्या राहतील आणि त्यांचे पोट कसे भरणार याची  काळजी केली. महामारीच्या दरम्यान लोकांना गाव-शहर खाली करायला सांगितले; आणि संसर्गापासून त्यांचे रक्षण केले. जनतेने देखील त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला . त्यानंतर हॉम्युपाठी हि उपचार पद्धती या  आजारावर  परिणामकारक आहे  हे  लक्षात आल्यावर त्यांनी पहिला सार्वजनिक दवाखाना सुरु केला. याच काळात त्यांनी दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त लोक, वृद्ध, अशा सर्वांसाठी ११ आश्रम सुरु करून ४८७५० लोकांचे पालनपोषण केले. दुष्काळातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी दीर्घकालीन उपाय योजना केल्या राधानगरी धरण त्याचे जिवंत उदाहरण आहे.जनतेला स्वस्त धान्य मिळावे म्हणून त्यांनी व्यापाऱ्यांना  अनुदान दिले. 



स्त्री-पुरुष यांच्यात निसर्गाने लैंगिक भेद ठेवला कारण नैसर्गिक चक्र व्यवस्थित फिरावे म्हणून पण स्वघोषित श्रेष्ठ समाजाने पुरुषाला श्रेष्ठ जाहीर करून  स्त्रियांना  दुय्यम  दर्जा बहाल केला.  त्यांनी देखील  तो मान्य केला. पण शाहू महाराजांनी सर्व  स्त्रिया पुरुषांपेक्षा कोणत्या हि क्षेत्रात कमी नाहीत याची जाणीव करून  दिली. त्यासाठी सर्व प्रथम स्त्रियांना अनेक अधिकार बहाल केले. “पूणर  विवाह  कायदा    ,दासी प्रतेस प्रतीबंध  कायदा, १४ वर्ष  लग्नाचे किमन वय निश्चित करणारा कायदा, त्यानंतर १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलींना आपला जोडीदार निवडण्याचे अवांतर दिले. शिकण्यासाठी शाळांचे दारे उघडी केली.  कायदा करून स्त्री स्वरक्षणाकडे लक्ष दिले. ते महिला सक्षमीकरणात एवढ्यावरच थांबले नाहीत; तर त्याची सुरुवात देखील आपल्या घरापासून केली. अंतर जातीय  मान्यता  देत  असताना    आपल्या बहिणीचे अंतर  जाती लग्न  लावून दिले. त्याचबरोबर मुलींसाठी  शिक्षणाची दारे उघडी  करत असताना  आपल्या विधवा सुनेला देखील शिकवले. “यथा राजा तथा प्रजा” या उक्तीप्रमाणे त्यांनी  रयतेशी नाळ  जोडली. एका मुलीला शिष्यवृत्ती देऊन वैद्यकीय शिक्षणासाठी विलायतेला पाठवले; आणि त्यानंतर तिला dr. होऊन आल्यावर रुग्णलयात रुजू केले. 

एका महिलेला शिक्षण अधिकारी केले. 

शेतकऱ्यानसाठी आयुष्य वेचणाऱ्या या राज्याने आधुनिक पद्धतीची शेती करायचे मार्गदर्शन केले. त्यांनी सहकारी शेती करायला लोकांना प्रवसाहन दिले. शेत मजुरांना संघटित होऊन  लढायला प्रॉत्साहित केले. शेतकऱ्यांना सिंचन सुविधा त्या काळात मिल्ने अशक्य होते. महाराजांनी जलस्रोतांचे संवर्धन केले. त्यावेळी शुद्ध पोलाद मिळत नव्हते म्हणून त्यांच्याकडे असणारे पोलादी शस्त्रे मोडून त्यांनी पोलादी नांगर बनवला. 


शाहूमहाराज हे वसतिगृहाचे जनक मानले जातात. त्यांनी ७ ते १४ वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी सक्तीचे  आणि मोफत  शिक्षण सुरु केले. जे पालक या वयोगटातील मुलांना शआलेत पाठवणार नाहीत त्यांच्यावर दर महा १ रुपया दंड आकारला जात असे. त्यांनी सुरुवातीला जाती निवाय वसतिगृह निर्माण केले. त्यानंतर एका वसतिगृहात अनेक जातीच्या विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था केली. उदाहरणार्थ मराठ्यांच्या वसतिगृहात मागास जातीच्या विद्यार्थ्यांची व्यवस्था केली. त्यांनी नंतर अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या शाळा बंद करून सर्वांसाठी एकच शाळा हे तत्व राबवले. त्याच बरोबर त्यांनी उद्योग शाळा,  कलाकारांसाठी वेगळ्या शाळा,  कुस्तीपटूंनसाठी आखाडे,  पाटील शाळा,  तलाठी शाळा,  मराठा पुरोहितांची शिवाजी वैदिक स्कुल इत्यादी विविध शाळा सुरु करून व्यापक शिक्षण प्रसार केला. 


सामाजिक क्षेत्रात त्यांनी अफाट कार्य केले. “व्यवस्था  बदलण्या पूर्वी अवस्था स्वीकारावी लागते.” 

त्यांनी गरीबाच्या मांडीला मंडी लावून त्याच्या घरातील अंधकार  पाहिला ; मनातील दुःख अनुभवले. आणि मग कृती कार्यक्रम आखला मागास वर्गातील उमेदवारांना ५० टक्के आरक्षण देऊन नवा आदर्श घालून दिला. गुन्हेगारी शिक्का लागलेल्या जातींना त्यानी जवळ घेऊन त्यांना असे का करावे लागते? हे समजून त्यांनी त्यांच्या हाताला काम दिले, त्यांना स्थिर निवारा दिला आणि बुरसटलेल्या मानसिकतेचे पुनर्वसन केले.  मागास वर्गीय जातींना सवलती देत असताना त्यांचे समांतर अस्तित्व  नाकारून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडले. गंगाराम कांबळे या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या  तरुणाला हॉटेल सुरु करून दिले आणि दस्तूर खुद्द महाराज त्याच्या हॉटेलात चहा घ्यायला जायचे. हा त्यांचा निर्णय वाटतो तेवढा सोपा नव्हता तर त्यातून एका क्रांतीचेबीज पेरले गेले. आज आपण पृष्य-असंपृष्य असा भेद करत नाही कारण त्याची सुरुवात महाराजांनी करून दिली. त्यांनी लोकांचे आडनाव बदलून जातीय ओळख पुसण्याचा प्रयत्न केला. 

त्यांनी  अखिल भारतीय  बहिष्कृत परिषेदेत भाषण केले. विद्ववत्तेचे राजे म्हणून बाबासाहेबांचा सन्मान केला. आणि महात्मा फुलेंकडून घेतलेला सामाजिक कार्याचा वारसा बाबा साहेबांच्या खांद्यावर दिला. त्यांच्या कारकिर्दीत सत्य शोधक समाज आणि आर्य समाजाची पूणर स्थापना केली.  एका भाषणात राजे शाहू महाराज म्हणाले होते [ माझ्या राज्यातील  सर्व जनता किमान मराठी तिसरी जरी शिकली तरी मी हा सर्व राज्यकारभार जनतेच्या हाती सोपवणार ] शेवटी लोकशाही प्रस्तापित करणे हे त्यांचे ध्येय होते. 


आपल्या करवीर नगरीत कुस्तीपटू, कलाकार, साहित्यिक या सर्वांचा सन्मान केला. 

त्यांच्या या कार्यामुळे ते लोक राजा ठरले. एक प्रशासक, न्यायाधीश,  समाज सुधारक, बळ उपासक, कलेचा आश्रय डाटा असे कितीतरी उपमा या कनवाळू राजाला देता येतील.  

त्यांच्या जयंती दिनी शाहू विचार डोक्यात उतरवून आचरणात आणण्याचा संकल्प करू. 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा