शिक्षक सोशक होत आहेत का?


गुरुकुल पद्धती जाऊन आधुनिक शिक्षण पद्धति  अस्तित्वात आली . पण शिक्षणाची भूक भागवण्यासाठी शिक्षक तेवढेच महत्वाचे  आहेत.   आई-बाबा नंतर शिक्षक  कायम आठवणीत राहतात. त्यांचा प्रत्येक शब्द विद्यार्थ्यांसाठी प्रमाण असतो. मुले आई-बाबांचे ऐकत नाहीत; पण गुरुजींचा शब्द  पडू  देत  नाहीत. म्हणून शिक्षक  विद्यार्थ्यांचे नाते कसे असावे? हे सांगताना देशाचे शिक्षक कलाम सर म्हणाले होते, [ शाळेच्या मागे घर असते; घराच्या मागे शाळा असते  ]  अर्थात शिक्षक आई-बाबा असतात; तर आई-बाबा शिक्षक असतात. हे अतूट बंधन शेकडो वर्षांपासून दिवस गणिक अधिक घट्ट पावत असल्यामुळे मुलं शाळेत गेल्यावर आई-बाबाना त्यांच्या सुरक्षिततेची काळजी वाटत नाही. महामारीच्या काळात सर्व शाळा आभासी भरतात तरी देखील या शाळेत विद्यार्थी सुरक्षित नाहीत. त्यांच्यावर तासोन्तास  एकाच जागी बसून राहिल्याने संगणक / मोबाईलच्या स्क्रीनचा दुष्परिणाम तर होतच आहे. त्यापेक्षा काही शिक्षक त्यांच्यासाठी शोषक झाले आहेत.  😢

तामिळनाडू राज्याच्या  एका प्रतिष्ठित शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्यांना अश्लील संदेश पाठवल्याची तक्रार चेन्नईच्या पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली आणि शिक्षकाला अटक झाली  😊.   तक्रारीची सर्वस्तरातून दखल घेण्यात आली आहे. तामिळनाडू राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी शिक्षक जर दोषी असतील तर त्यांच्यावर  कडक  कार्यवाही करण्याचे वचन दिले आहे.तसेच चेन्नई पोलिसांनी विद्यार्थ्यांना समोर येऊन तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर तक्रारदार विद्यार्थ्यांची माहिती   सार्वजनिक   केली जाणार नाही आणि तक्रारींवर योग्य ती कार्यवाही केली जाणार असा शब्द दिला आहे. 

हि बातमी bbc marathi च्या संकेतस्थळावर प्रकाशित झाली. समाज माध्यमावर सर्वत्र याचीच चर्चा आहे.  तामिळनाडुतील  एका    अभिनेत्रीने  शाळेतील  आठवणींना  उजाळा   देताना  सांगितले,शिक्षक जाती भेद करत होते. असे अनेकांनी आपापले अनुभव व्यक्त केले आहेत. 

हि काही या राज्यातील पहिली घटना नाही; १० वर्षांपूर्वी एका मुख्याध्यापक विरुद्ध ९६ विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती. यात काही माझी विद्यार्थ्यांचा देखील समावेश होता. शेवटी निकाल लागे पर्यंत केवळ २२ विद्यार्थी तक्रारींवर ठाम राहिले; इतर विद्यार्थ्यांनी आपली तक्रार मागे घेतली. त्यामुळे २२ विद्यार्थ्यांना नुकसान  भरपाई  मिळाली; तसेच मुख्याध्यापकाला ५५ वर्षाची शिक्षा सुनावली. ✌👏

अशा घटना सर्वत्र कमी जास्त प्रमाणात घडत असतात;  थोड्या घटना उघडकीस येतात. कैलास सत्यार्थी  यांच्या संस्थेने केलेल्या  संशोधनानुसार  दरदिवशी ४ मुले न्यायापासून दूर राहतात, त्याचबरोबर पॉस्को कायद्याचा योग्य प्रमाणे वापर केला जात नाही. 

या परिस्थितीचे वर्णन करताना, राष्ट्र संत तउकलोजी महाराजांचे शब्द समर्पक वाटतात,  

[ मुले शिकवण्या ठेवला मास्तर, 

 त्यानेच केला दुर्व्यवहार, 

 शिक्षकास शिक्षण जरूर ऐसे झाले. ] 

 

अनेक शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संवादाचा अभाव असतो; त्यांचे नाते औपचारिक असते. त्यामुळे गृहपाठ केला नाही किव्हा घटकचाचणीत कमी गुण मिळाले यान त्या कारणामुळे शिक्षक  , प्रगती पुस्तकात नकारात्मक लिहितील, विनाकारण मुख्याध्यापकांकडे तक्रार करतील, परीक्षेत जाणीव-  पूर्वक कमी गुण देतील अशा  भीती  पोटी   विद्यार्थी तक्रार करायला धजावत नाहीत. एखाद्याने मुख्यध्यापकांकडे तक्रार करण्याचे धाडस केलेच तर त्यालाच उलट सुनावले जाते; आणि शिक्षकाचा बचाव केला जातो. अशा कटू अनुभवामुळे इतर विद्यार्थी धाडस करत नाहीत जेव्हा त्रास सहन होण्या पलीकडे  हे शिक्षक जातात त्यावेळी पालकांच्या मदतीने पोलीस स्टेशन गाठले जाते. 

हे थांबवण्यासाठी काही महत्वाच्या उपाय योजना कराव्या----- 

१ विद्यार्थी-शिक्षक तक्रार निवारण समिती नेमावी--  विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या असतात, ज्या अनेक विद्यार्थी शिक्षकांना सांगू शकत नाहीत किंबहुना त्यांच्यात बोलण्याचे धाडस नसते. उदा. शिकवलेले समजत नाही, वेळेत गृहपाठ करणे कौटुंबिक वातावरणात शक्य होत नाही, वर्गातील इतर मुले त्रास देतात इत्यादी त्याचबरोबर शिक्षकांकडून काही त्रास होत असेल तर हि मुले आपल्या दादा-ताईला सांगू शकतात समवयस्क मित्रांकडे व्यक्त करू शकतात. आणि या समितीतील विद्यार्थी इतर शिक्षकांच्या मदतीने यावर तोडगा काढू शकतात. 

२ शाळेत तक्रार बॉक्स ठेवावा-- अनेक विद्यार्थी आपले नाव उघडकीस येईल या भीती पोटी समोर येत नाहीत. त्यामुळे सर्व विद्यार्थाना तुमची ओळख गुप्त ठेवण्यात येणार हा विश्वास देऊन आपली तक्रार करायला , शाळेतील गैरसोईवर बोट ठेवायला प्रोत्साहित केले पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या समस्या / तक्रारींना गांभीर्याने घेऊन योग्य मार्ग काढावा. 

 

३ मानसोपचार तज्ज्ञाची नेमणूक करावी-- प्रत्येक वर्गात काही विद्यार्थी ढ म्हणून गणले जातात हे चुकीचे आहे. कारण प्रत्येकात वेगलेपणा असते; पण आपण तो ओळखत नाही. त्या विद्यार्थ्यांना समजून घेण्यास  कमी पडतो परिणामस्वरूप असे विद्यार्थी मागे पडतात. हे टाळण्यासाठी त्या विद्यार्थ्याला योग्य दिशा दाखवण्यासाठी मानसोपचार तज्द्न्य मदत करू शकतात या काही विद्यार्थी शारिरीक अवयवांच्या अभावामुळे इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळे असतात; त्यांचे वेगळेपण त्वरित लक्षात येते. अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष शाळा असतात. पण मानसिक दृष्ट्या अक्षम असणाऱ्या विद्यार्थ्यांना ओळखण्यासाठी वेळ लागतो वाया जाणारा प्रत्येक दिवस त्या विद्यार्थ्याची   प्रगती खुंटवतो म्हणून हे हेरण्याची  गरज  पूर्ण करण्यासाठी देखील अशा तज्ज्ञांचा उपयोग होऊ शकतो. 

४ क्रीडा-सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवावा-- शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात अथवा क्रीडा स्पर्धेत निवडक विद्यार्थी सहभागी होत असतात; त्यामुळे त्यांचा विकास होतो. पण या मध्ये इतर विद्यार्थी का सहभागी होत नाहीत? याचा विचार संबंधित शिक्षकांनी करावा. आणि सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करण्याचा प्रयत्न करावा कारण यातूनच उद्याचा कलाकार / क्रीडापटू घडू शकतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा  आत्मविश्वास वृद्धिंगत होतो. शेवटी शिक्षकाने विद्यार्थ्यांची आई झाले पाहिजे. राष्ट्र निर्मात्याची भूमिका पारपाडावी. 


फोटो - pixabay aap


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा