ती नसती तर


आज सर्वत्र वावरताना मला एक प्रश्न नेहमी डोके खाजवायला लावतो; त्याचे उत्तर  देण्याचा   प्रयत्न मी नेहमी करतो जर ती नसती तर? मी या जगात नसतो, ती नसती तर मी शिकू शकलो नसतो, ती नसती तर मी संस्कारी तरुण म्हणून माझी प्रतिमा निर्माण  करू  शकलो नसतो, ती नसती  तर मी  स्वतःचे अस्तित्व शोधू शकलो नसतो,   रुग्णालयात ती असते म्हणून योग्य उपचार होतात; तिच्यामुळे    जगाच्या  अर्थ व्यवस्थेचे चक्र फिरते, तिच्या जीवावर  पुरुष  प्रधान समाज उभा आहे. तिचे स्थान आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अविभाज्य आहे, तिला वजा करून सर्व पुरुषांची किंमत ० आहे म्हणून महिला दिनानिमित्याने माझ्या आयुष्यातले तिचे अस्तित्व शोधण्याचा हा छोटासा प्रयत्न, याला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या माझ्या  जगाच्या आयुष्यात अविभाज्य  घटक  असणाऱ्या     सर्व महिलांना  मनापासून खूप   खूप शुभेच्छा: तसेच त्यांच्या सुरक्षितेकडे जातीने लक्ष देणार हे वचन.

माझ्या जन्मापासून आजवर सर्वांत सुंदर जेवण माझ्या आईच्या हातचे बनवलेले असते असा माझा समज आहे. प्रत्येकाला जन्म आई देते हा सजीव सृष्टीचा नियम आहे तो मानवासह सर्व प्राण्यांना लागू पडतो. त्यासाठी पुरुषाचा सहभाग आवश्यक असला तरी   सर्वाधिक जवाबदारी तिची असते आई आपल्या लहानग्यांची काळजी घेते; अगदी चिमणीपासून ते थेट वाघिणी पर्यंत माझी काळजी आईच आजदेखील त्याच तत्परतेने घेत आहे. माझी आई केवळ  आई नाही तर ती विशेष आई आहे "specel mather" तिला इंग्रिजी बोलणारे म्हणतात. त्याचे कारण मी जन्मापासून दृष्टिहीन असल्यामुळे तिच्यावर दुहेरी संकट कोसळले; आज देखील तिला अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते अनेकदा ती रडते या समाजातील कंटकांना उत्तरे देताना, पण ती कधीच खचली नाही; तिने हार मानली नाही. माझा जन्म zala त्यावेळी घरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता असे सांगतात; माझा जन्म सकाळी सहाच्या दरम्यान आमच्या घरी झाला माझे डोंळे नसणे सर्वांना आश्चर्यचकित करणारे होते. त्याचबरोबर चिंतेत टाकणारे होते मग आजी मला रुग्णालयात घेऊन गेली ती माझ्या आयुष्यातली दुसरी स्त्री लहानपणी माझा फार लाड झाला. असे सांगतात हे असे वेगळे बाळ अनेकांच्या चेष्टेचा विषय झाले असेल, आई विषयी चर्चा झाल्या असतील, या पैकी मला माहिती   नाही. पण एवढे नक्की आईला माझे काय होणार? याची चिंता असायची मला लहान होतो त्यावेळी एकदा आम्ही रेल्वेने प्रवास करत असताना एक दृष्टिबाधित व्यक्ती गाणे म्हणून भिक्षा मागत आमच्या पर्यंत येऊन पोहचला; त्यावेळी आईचे डोळे पाणावले होते. कदाचित तिला माझ्या भविष्यातले ते रूप दिसत असावे; पण आज मात्र ती असे कोणी दिसले तर रडत नाही. कारण आता तिला तिच्या मुलाच्या सन्मान पूर्वक जगण्याचा विश्वास मिळाला असेल; आणि हा माझ्या आयुष्यातला सर्वांत मोठा विजय आहे. मी विशेष मुलगा असल्यामुळे मला अकोला शहरातील अंध विद्यालयात दाखल केले गेले आणि त्यावेळी आईची तब्यत फार खराब झाली होती. तिला रुग्णालयात न्यावे लागले होते तिच्या मुलाने खूप शिकावे मोठे होऊन   नाव लवकीक मिळवावा अशी तिची भावना असताना, माझी काळजी कोण करणार? हि चिंता तिला सतत असे. तिथे असणाऱ्या महिला कर्मचारी म्हणजे आमच्या सर्व मावशी माझ्या अयुशातल्या सुरुवातीच्या टप्प्यातील महिला आहेत. आमच्या शिक्षिका पाटील मॅडम यांनी ब्रेल लिपीशी माझा परिचय करून दिला स्वतः प्रज्ञा चक्षु नसताना अशा विद्यार्थ्यांना शिकवण्याची कौशल्य त्यांनी उत्तम रित्या अवगत केले आहे. शालेय आयुष्यात एक भयानक प्रसंगाला मला सामोरे जावे लागले वसतिगृहात राहत असल्यामुळे घरची खूप आठवण यायची त्यावेळी दररोज फोन द्वारे बोलणे शक्य नव्हते; असे नाही पण ते माझ्यासाठी शक्य नव्हते. त्यामुळे शाळेत जाऊन ६ दिवस झाले असताना एका माझ्यापेक्षा वयाने मोठ्या मित्राने आपण फोन लावायला जाऊ असे सांगितले त्यासाठी फार लांब जावे लागते असे तो म्हणाला, मग आम्ही कुणाला हि कल्पना न देता शाळेतून बाहेर पडलो सर्वांना हा मोठा झटका होता. सर्वांनी सर्वत्र माझी शोधाशोध सुरु केली मग हे सर्व होट असताना मी थेट अकोटला गेलो; त्या वयात हे शहर सोडा मी या शहराचे नाव देखील ऐकले नव्हते. तिथे [ विवेक बिछायत केंद्राच्या मालकीण भेटल्या ] दुर्दैवाने मला त्यांचे नाव आठवत नाही त्यांनी मला जवळ घेतले कारण अकोटला गेल्यावर त्या तत्कालीन मित्राने मला सोडून दिले. का ते माहित नाही? त्यावेळी त्या देवदूत मातेने मला घरी नेऊन पाणी जेवण दिले माझी विचारपूस केली. त्यावेळी माझे काका नुकतेच पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवडले गेले होते; त्यांचा प्रशिक्षण कालावधी सुरु होता हे सर्व आता कळते. पण त्यांनी मला तुझ्याकडे फोन नंबर आहे का? विचारल्यावर मी त्यांना सांगितले माझे काका मोठे पोलीस आहेत मग त्यांना थोडा धीर आला असावा; त्यांनी तुमच्यावर कोणतीही कार्यवाही होऊ देणार नाही असा शब्द दिल्यावर त्यांनी दिवसभर माझी कालजी घेतली आणि सायंकाळी आजी मला घरी घेऊन गेली. लहानपणापासून माझ्या बहिणी माझा खूप लाड करतात आज देखील माझी ताई मला प्रतीक्षा म्हणते ते तिने ठेवलेले नाव; माझा भाऊ वर्गात हुशार विद्यार्थ्यांच्या यादीत असावा म्हणून ताई मला सुट्ट्यात घरी आल्यावर बरेच शिकवत असे. सर्व बहीण भावांमध्ये मी सर्वात लहान असल्यामुळे माझा फार फायदा झाला. पोळा हा सर्व शेतकऱ्यांच्या घरात साजरा होणारा सण त्यावेळी आत्याने शंभर पर्यंत इंग्रिजी आणि मराठी अंक शिकवले; त्यावेळी वर्गात फक्त मला पूर्ण अंक मुखोगत होते मग वर्गात शिक्षकांची मिळणारी शाबासकी आज देखील आठवते. आज मी वक्तृत्वाच्या बऱ्याच स्पर्धेत सहभागी होट असतो जास्त पराजय आणि थोडे विजय हे त्या स्पर्धेतले यश अपयश आहे पण त्याशिवाय मला फार मोठे बक्षीस म्हणजे माझे सर्व जिवलग मित्र त्यावर नंतर कधीतरी चर्चा करू. पण माझ्या भाषणाला भक्कम सुरुवात झाली ७ इयत्तेत शिकत असताना अकोला आकाशवाणीवर[ दृष्टीकडून अंतर्दृष्टीकडे] हा कार्यक्रम सुरु झाला हो. ता त्याच्या लेखिका मंजुश्री कुलकर्णी स्वतः मुलाखतीसाठी शाळेत आल्या होत्या त्यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून माझी निवड झाली असे म्हटल्या पेक्षा शिक्षकांनी माझे नाव सुचवले होते; असे योग्य ठरेल काहीही असो या वेळी माझा आवाज असंख्य श्रोत्यांपर्यंत जाणार होता कुठली हि तयारी न करता मी  जे बोललो ते मंजू मॅडमना फार आवडले अशा त्या म्हणाल्या. कदाचित मुलांचे जसे  इतर मुलांचे कौतुक करण्याचा स्वभाव माणसांचा असतो त्याचा तो एक भाग असेल, पण माझ्या मनावर त्यांच्या शब्दांचा फार खोल परिणाम झाला मी बोलू शकतो जगाला माझे म्हणणे पटवून देऊ शकतो हा विश्वास वाढला. त्यानंतर आज पर्यंत  त्यांचे मार्गदर्शन वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या प्रकारे मला लाभत आले आहे आणि भविष्यात देखील त्या माझ्या सोबत राहतील याची खात्री आहे. महाविद्यालयात गेल्यावर अनेक अनुभव आले अकोल्यात मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेला प्रतीक मुंबईच्या थेट एल्फिन्स्टन महाविद्यालयात जाऊन पोहचला. त्यावेळी जास्तीत जास्त विद्यार्थी हिंदी आणि इंग्रजी बोलणारे होते मी गोंधळूण गेलो होतो त्यावेळी एक मुलगी माझ्याकडे येऊन म्हणाली हाय कसा आहेस? हि एखाद्या मुलीने हाय म्हणण्याची पहिली वेळ मला आज पर्यंत हुशार विद्यार्थी असण्याचा शिक्का पुसून टाकणारी होती ती कोण मुलगी आहे मला माहिती नाही. त्यानंतर मी इंग्रिजी शिकण्याचा निर्णय घेतला आज मला इंग्रजीतून सम्वाद साधता येतो एकदा महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून पालक सभा घेण्याचे ठरवले असताना मी अर्थशास्त्र विभाग प्रमुख dr. सुचिता कृष्णप्रसाद यांच्याकडे गेलो आणि माझ्या वडिलांना येणे शक्य नाही हे सांगितले. त्या म्हणाल्या, " माझ्या मुलाची काळजी घेण्यास मी समर्थ आहे" हि माझी शिक्षिका माता आज देखील माझ्यावर मातृत्वाचे छत्र धरून आहे मी अर्थशास्त्र विषयाचा विद्यार्थी नसताना त्यांनी एवढे प्रेम देणे खऱ्या    मातृत्वाचे लक्षण आहे. आज मी महामारीमुळे महाविद्यालयात जाऊ शकत नाही पण वर्गात मस्करी करणाऱ्या परीक्षेच्या वेळी मदत करणाऱ्या सर्व मैत्रिणींचे स्थान विसरू शकत नाही  म्हणून साह्य करणाऱ्या सर्व मैत्रिणींचे  ऋण व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. आज हि लेख मालिका सुरु करण्याची प्रेरणा एका मैत्रिणीकडून मिळाली तिला तिचे कौतुक आवडत नाही; म्हणून तिचा नाम उल्लेख टाळतो. आयुष्यात तुम्ही कोण आहात? तुमचे नाव काय आहे? याने समाजाचे भले होट नसून तुमचे कार्य ते परिवर्तन घडवून आणते. स्वतः आपल्या नावाचा उल्लेख करण्यापेक्षा इतरांनी तो करावा असे कार्य करावे हा जगण्यातला सिद्धांत कृतीतून तिने             मला शिकवला. अशा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माझ्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या सर्वांप्रती मी कृतद्न्य आहे.  

फोटो - साभार गूगल

 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा