पत्नीने कापला पतीचा गळा

सात जन्माची गाठ बांधणारे जोडपे सात दिवसाच्या आत गाठ  सोडताना  पाहिले आहेत शेवटी ते कशासाठी गाठ बांधतात हा वेगळा प्रश्न आहे पण एकमेकांच्या साथीने किमान हा जन्म घालवायचा एवढा तरी निर्धार प्रत्येक जोडप्याचा असावा हि माफक अपेक्षा सर्व समाजाला विवाह बंधनात पडणाऱ्या स्त्री पुरुषांकडून असते 

नागपुरातल्या एका जोडप्याची कहाणी भलतीच भारी आहे त्यात आत्यंतिक प्रेम आणि टोकाचा दोष परस्परांचा राग आणि शारिरीक संबंध ठेवण्याची तीव्र भावना शेवटी खून स्वतःच्या हाताने करणारी अर्धांगीनी आणि हे कोडे सोडवणारा पॉलिसी खाक्या नागपुरात एका अज्ञात व्यक्तीने एका ६४ वर्षाच्या वृद्धाचा खून केल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आणि त्यांच्यासमोर या हत्येचे गुड उकलण्याची वेळ अली मग त्यांच्या चक्राने आपल्या चौकशीचा मोर्चा पत्नीकडे वळवला आणि सत्याचा स्फोट झाला त्यातून बाहेर आले विदारक सत्य अनेकांना विचार करायला लावणारे ज्याचा खून झाला त्याची पाचवी बायको त्याच्यासमोर काळ म्हणून  उभी  राहिली ती साधहरणतः ३४ वर्षाची आहे तिचे हे दुसरे लग्न होते तर या व्यक्तीचे तब्ब्ल पाचवे होते दोघांच्या वयात ३० वर्षाचा फरक म्हणजे बापाने मुलीशी लग्न करावे असे पण या दिवशी नेमके झाले काय? ती घरात अली तिने त्याचे हात खुर्चीला बांधले आणि अश्लील चित्रफीत दाखवून शारिरीक संबंध ठेवले आणि चाकूने गळा चिरला म्हणजे आता महत्वाचे आहे कि ते दोघे वेगवेगळे का राहत होते हे समजणे त्याची किनार आहे अनैतिक संबंधही तिचे परपुरुषाशी नाते असून तिला त्याच्यापासून मूळ झाले याचा राग त्यांच्या मनात होता आता तिच्यावर ३०२ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला मग तिने हत्या केली म्हणून तिला न्यायालय सजा थोटावेल पण नेमकी व्यक्तीला सजा देत असताना या वृत्तीला अडा न्याय व्यवस्था घालू शकणार का हा खरा प्रश्न आहे माझ्यामते या प्रकरणात दोन बाबी महत्वाच्या आहेत पहिली बाब हत्येचा गुन्हा आणि दुसरी दोगांच्या वयातील फरक कुठल्या हि परिस्थितीत हत्येचे समर्थन करता येणार नाही तिला तिच्या कर्माचे फळ मिळालेच पाहिजे पण या लेखात प्रामुख्याने दुसऱ्या बाबीचा विचार करणे क्रम प्राप्त आहे लग्न कोणी कोणाशी करावे हा पूर्णपणे वयक्तिक प्रश्न आहे पण आपण जैविक भावनिक दृष्टिकोनातून विचार केल्यास काही बाबी प्रकर्षाने जाणवतात आपल्या पुरुष प्रधान व्यवस्थेत स्त्री हि उपभोगाची वस्तू मानली जाते आणि घर काम करणारी विश्वासू फुकट मोलकरीण एवढेच तिचे स्थान समजले जाते म्हणून सर्व प्रथम तिच्या लैंगिक भावनांचा आपण विचार केला पाःईजे जशी पुरुषांची शारिरीक सुख मिळवण्याची इच्छा असते त्याचप्रमाणे स्त्रियांची देखील अशी भावना असते आपल्या साथीदारांचा सहवास तिला देखील हवाहवासा असतो आपली कामवासना पूर्ण करण्यासाठी एका वयाच्या टप्प्यात प्रत्येक व्यक्ती समाजाने आखून दिलेल्या चौकटीच्या बाहेर पडतो त्याच्यासाठी ती सर्वांत मोठी गरज असते  आणि शक्य तिथून पूर्ण केली जाते फक्त फरक एवढाच हे जर पुरुषाने केले तर कोणी बोल्ट नाही चर्चा होण्याचा प्रश्न नाही पण स्त्रीने असे पाऊल उचलले तर बोंबत केला जातो त्याचबरोबर वैवाहिक आयुष्यात कौटुंबिक जीवनात आपल्या संसारात आनंद असणे गरजेचे आहे अशा सर्व गोष्टी समवयीन जोडप्यात शक्य असतात म्हणून ५ वर्षांपेक्षा जास्त अंतर दोघांमध्ये नसावे या जोडप्यात ३० वर्षांचे अंतर होते म्हणजे दोन पिढ्यांचा संसार होता यांच्यात वैचारिक मतभेद असणे स्वाभाविक असले तरी अशा जोडप्यात जुडवून घेण्याची क्षमता नसते ३० वर्षाच्या मुलीची विचारधारा आणि ६० वर्षाच्या निवृत्त व्यक्तीची विचारधारा अत्यंत टोकाच्या असतात एकीकडे जुनाट समजुती तर दुसरीकडे आधुनिक बदलते विचार त्याचबरोबर शारिरीक क्षमता फार भिन्न कारण उतर्त्यव्यात माणसांची काम भावना मंदावते तर तारुण्यात तिच्या सर्वच टप्प्यावर असते अशाप्रकारच्या घटनांना हे फरक कारणीभूत असतात म्हणून विवाह करताना आपण केवळ संपत्ती प्रतिष्ठा यांच्यासोबत इतर बाबींचा विचार करावा कारण २१ व्य शतकात आपण १९ व्य शतकातील अपेक्षा आजच्या स्त्रियांवर लाडू शकत नाही त्यांच्या स्वप्नांची हत्या करण्याची शिक्षा संपूर्ण समाज व्यवस्थेला भोगावी लागणार हे उघड आहे म्हणून प्रत्येक आई वडिलांनी तिच्यासाठी वरची निवड करताना मुलीच्या मताला विचारात घेतले पाहिजे कारण हे नाते जर स्नेहाच्या धाग्याने गुंफलेले नसेल तर त्यांचा संसार फाटक्या कपड्याप्रमाणे सडत जाणार त्यांच्या वागण्यात कृत्रिमता येणार मग कदाचित घटस्फोट घेऊन विभक्त होण्याची वेळ अली तर याचा त्रास दोनीही कुटुंबाना होणार मग हे सर्व टाळायचे असेल तर प्रेम विवाहाला मान्यता देणे गरजेचे आहे आपल्या समाजाने हा बदल मनापासून स्वीकारायला हवा 

फोटो - साभार गूगल

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा