बलतकार पीडहितेशी लग्न करणार का?

आरोपी कायद्या समोर सर्व सारखेच असतात; त्यात कोणता ही भेदभाव

  • केला जात नाही. मग गुन्हा कोणता ही असो सारवउच न्यायालयात एक आश्चर्यकारक घटना घडली; त्या घटनेला प्रत्येकजण आपापल्या चष्म्यातून पाहणार हे उघळ आहे. नेमके झाले असे जळगावच्या एका सरकारी कर्मचाऱ्याने लग्नाचे आश्वासण देऊन एका मुलीशी शारेरीक संबंध ठेवले. आणि आश्वासण केवळ आश्वासण राहिले मग तिने न्यायालयाचे दार थोटावले आणि शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहचली. आणि मग यावर सूनवाई करताना मुख्य न्यायमूर्ती श्री भोंबळे यांच्या नेतृत्वातइल खंड पिठाणे विचारले, " तू या मुलीशी लग्न करणार का? जर तू तयार असशील तर आम्ही मदत करू. "" तसेच तू जर हा प्रस्ताव नाकारला तर तुला शिक्षा होणार आणि तुरुंगात जावे लागणार त्याचबरोबर तुझी सरकारी नोकरी देखील जाणार. " या वेळी सूनवाई करताना या आरोपी आरोपीला 4 अठोडे अटके पासून सवरक्षण दिले."" वरील विधान शब्दशः नसून न्यायालयात घडलेल्या संवादाचा सारांश आहे जो मराठी वृत्तपत्रात प्रकाशित झाला आहे. "" ही केवळ एक घटना नाही तर एक प्रवाह आहे; या निर्णयाचा परिणाम एका व्यक्ति पुरता मर्यादित नसून तो समस्त देशभर होणार आहे. सारवॉचह न्यायालयाने दिलेले निर्णय देश भरातील सर्व न्यायालयात एक आदर्श म्हणून गणले जातात. त्यामुळे या घटनेकडे व्यापक अर्थाने पाहणे गरजेचे आहे. यासाठी पुढील मुद्दे महत्वचे ठरू शकतात 

1 जर त्या आरोपी व्यक्तीला पीडहितेशी लग्न करायचे असते तर त्याने या आधी केले नसते का?  

2 न्यायालयाने शिक्षा माप करावी म्हणून जर लग्न केले तर तिच्याशी तो सौजणण्याने वागेल याची खात्री न्यायालय कोणत्या आधारे देणार?  

3 न्यायालयाने हे विचारण्या आधी त्या पीडहितेची संमती घेतली होती का? 

4 या विधानातून पुरुष सत्ताक पद्धतीला खत पानी घातले जाणार का?

5 भविष्यात या खटल्याचा आधार घेऊन आरोपी अशीच एक पर्यायी मागणी करणार नाही का? जर असे झाले तर जवाबडा कोण?

6 एक नागरिक म्हणून न्यायालय कडून अशा प्रकरणात काय अपेक्षा आहे 

प्रत्येक व्यक्ति गुन्हा करताना आपले कोणी वाकडे करू शकत नाही. किंबहुना पिढीत व्यक्ति दंड मागू शकत नाही या आविर्भावात असतो. या प्रकरणात लग्नाचे आश्वासण देऊन फसवले अशा वेळी सामान्यतः 2 गोष्टी कारणीभूत ठरू शकतात 1 त्याने हे कृत्य जाणीव पूर्वक केले असू शकते; बऱ्याचदा अनेक लोक केवळ शारेरीक सुख उपभोगण्यासाठी अशी आश्वासणे देऊन फसवतात नंतर स्वतःला यापासून दूर करतात. पण पीडहितेचे आयुष्य बरबाद होते ती मानशिक दृष्ट्या खचली जाते त्याची भरपाई आर्थिक दृष्ट्या केल्या जात नाही. आरोपी व्यक्ति सरकारी कर्मचारी असल्यामुळे त्याने असहेच केले असावे याची डाट शक्यता वाटते. मग त्याला लग्न त्याच मुलीशी करायचे होते तर मग त्याने सुरुवातीला केले असते हे प्रकरण न्यायालयात गेलेच नसते. आता कदाचित आरोपी पीडहितेशी लग्नाचा प्रस्ताव स्वीकारेल देखील केवळ शिक्षा होऊ नये म्हणून पण त्यांचे संसारीक आयुष्य खर्च मंगलमय असेल का? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. ज्याच्या विरोधात न्यायालयात लढलो त्याच्यासोबत जोडीदार म्हणून राहताना त्या दोघांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना काय वाटणार ते मनापासून याचा स्वीकार करतील का? एखाद्या वेळी दोघांनी मनमारून हे स्वीकारले तर पुढील आयुषात तिचा छल होणार नाही याची शस्वती न्यायालय कशी देणार? सन्मानाने जगण्याचा मूलभूत अधिकार सर्व नागरिकांना आहे मग या अधिकाराची पायमल्ली होणार नाही का? त्याच बरोबर पिढीत मुलीची या आरोपी व्यक्तीशी संसार करण्याची संमती आहे का? माझ्यामते असणार नाही कारण कोणती ही व्यक्ति ज्या व्यक्तीवर आपले प्रेम आहे त्याला न्यायालयात खेचणार नाही. जर धरून बांधून हे लग्न झाले तर दोन जीर्ण झालेले कपडे एकमेकांना शिवल्यासारखे होणार 

कदाचित अशा गटनांमधून आपण पुरुष प्रधान संस्कृतीला खत पानी घालतो आहोत कारण त्याने जिला फसवले जर तिच्याशी लग्न लावून दिले तर तो नक्की वचपा काढणार. संधि मिळेल तेव्हा तो बदला घेणार आज अस्तीतवाट असणाऱ्या समाजात पुरूषांचे वर्चस्व असल्यामुळे स्त्रियांचा अतोनात छल होतो; पण त्या पैकी फार थोड्या स्त्रिया न्यायालयात जातात. जीने हा सर्व त्रास सहन केला त्याच्या घरी पत्नी म्हणून गेली तर तिच्या विषयी सासरच्या मंडळीत कायमचे पूर्वग्रह राहतील आणि एक उद्धट रागीट इत्यादि नानाविध शिक्के तिला मारले जाण्याची शक्यता निर्माण होते. त्याचबरोबर या खटल्याचा आधार घेऊन उद्या कोणत्या गुन्हेगाराला शिक्षा होणार असेल तर ते अशा प्रकारची मागणी न्यायवेवस्थेकडे करणार; मग तुम्हाला वाटत असेल त्या पीडहितेच्या संमती शिवाय हे विवाह गाठ बांधणे अशक्य आहे. पण पुरूषांचे वर्चस्व असणाऱ्या समाज व्यवस्थेत भावनिक दृष्ट्या तिच्यावर आघात करून कौटुंबिक प्रतिष्ठेचे वचन तिच्याकडून घेऊन संमती घेतली जाऊ शकते. आज बऱ्याच मुलींना त्यांचे आई-बाबा सांगतील त्या मुलाशी लग्न करावे लागते; म्हणून मला असे वाटते एखादी पिढीत व्यक्ति न्याय मिळवण्यासाठी अंतिम टप्प्यावर पोहचली तर मानवी स्वभावाच्या गुण धर्मानुसार त्याव्यक्तीला न्यायालयाने शिक्षा द्यावी हाच हेतु असतो. त्याचबरोबर अशा व्यक्तीला आपला जोडीदार म्हणून घेणे पीडहितेला कधीच मान्य होणार नाही. न्यायालयाने न्यायदन करत असताना या सगळ्या दृष्टिकोनातून विचार करावा; कारण एक प्रकरण संपूर्ण देश हलवून सोडते केसहेवानंद भारती खटल्याने आज देखील छाप पाडलेली आहे. शेवटी एक महत्वाचे आहे की, एखादी व्यक्ति सारवाउच्च न्यायालयात पोहचते कारण सामंजस्याने सुटण्याची शक्यता नसते; म्हणून न्यायमुरतींनी दंड संहितेनुसार गुन्हेगाराला शिक्षा थोटावळी पाहिजे.  

फोटो - साभार गूगल


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा