जगण्याची आशा आशा भोसले

 या विश्वाचा इतिहास हा अजिंक्य लोकांनी लिहिला . त्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर त्यांच्या विजयी मुद्रा रेखाटलेल्या असतात ; त्यातून  येणाऱ्या पिढ्यांना धडा मिळतो . आणि प्रेरणा मिळते आयुषाची घडी बसवण्यासाठी त्यांनी केलेल्या चुका त्यांच्या कर्तुत्व बरोबर छोट्या पडतात ; आणि त्यातून त्यांनी केलेल्या संघर्षाच्या काहण्या उद्याच्या पिढ्यांना जगण्यासाठी प्रेरित करतात. 

 एक मुलगी लहानपणापासून यशस्वी संगीत कारकीर्द असणाऱ्या कला प्रेमी कुटुंबात वास्तव्य करते . जन्मतः  गायनाचा संगीताचा वारसा मिळतो पण मग अशी  त्या क्षेत्रात भरारी  घेत असेल .   दुसरीकडे एखादी व्यक्ती मेहनत करून स्वतःची ओळख निर्माण     करत असेल. तर तिच्या संघर्षाला नक्कीच स्लॅम करावा लागणार.  त्याचबरोबर एका मुलीने आपले कौटुंबिक वैभव विसरून आपल्या तत्वांशी एक निष्ठ राहण्याचा निर्णय घेऊन  आदर्श घालून दिला.  तिच्या जीवन यात्रेकडे पाहताना     खचून गेल्यावर पुन्हा उठण्याची आशा निर्माण होते . अशीच आशा भोसले वैश्विक स्तरावर आपल्या आवाजाने मनमोहून टाकणारी गायिका आहे. 

 एक गायिका , गृहिणी , सोयमपाकीण , प्रियसी आणि त्याचबरोबर अभिनेत्री असे कितीतरी विलक्षण गुण या व्यक्तिमध्ये सामावले आहेत . त्यांच्या जगण्याचे प्रयोजन म्हणजे अबगीभूत असणाऱ्या सर्व गुणांना खुले व्यासपीठ निर्माण करून आपला व्यासंग वाढवणे आहे . 1933 साली सांगली जिल्ह्यात जन्माला आलेली ही मुलगी वयाच्या 9 वर्षाची असताना आपल्या डोक्यावरचे पितृ छत्र हरवून बसली .  तिने बालपणातच वडिलांकडून शिक्षण घेतले ; आणि गायन क्षेत्रात भविष्य शोधले अल्पवयातच तिने गायला सुरुवात केली . त्यांची मोठी बहीण लता दीदी नेहमी त्यांना सोबत करत असे . 16 वरिस धोक्याचे म्हणतात ते काही उगीच नाही उमलत्या वयात आशा ताईंचे मन लता दिदीच्या स्वीयसाहेकावर जडले ; आणि  प्रीतीचा प्रवास सुरु झाला. हेमंत भोसले आशा  ताईंपेक्षा 15 वर्षांनी मोठे होते तरी देखील त्यांनी या नात्यात रुचि दाखवली.  आणि दोघांनी लग्न करायचे ठरवले ;  पण त्यांच्या या निर्णयाला लता ताईंचा तीव्र विरोध होता . त्यांनी तरी देखील हा विरोध झुगारून विवाह बंधनात अडकण्याचे ठरवले ; नंतर मंगेशकर आणि भोसले कुटुंबातील संबंध ताणले गेले . त्यात होरपडल्या जात होत्या आशा पण त्यांचं काही इलाज नव्हता ; एकीकडे रक्ताची नाती तर दुसरीकडे जीवन साथी मग या कात्रीत त्या अडकून संसार करीत होत्या . दुसरीकडे आपली कारकीर्द त्या सांभाळत होत्या त्यांचे आयुष्य फार वेदनांनी भरलेले होते ; तरी देखील त्यांच्या चेहऱ्यावर ते झळकत नसे . त्या आतून तुटलेल्या असल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे स्मित कमी झाले नाही . त्यांच्यासाठी मंगेशकर कुटुंबियांचे दार बंद झाल्यामुले त्यांना एका सुखासाठी दुसऱ्या आनंदाचा त्याग करावा लागला . या वैवाहिक जीवनात त्यांना तीन अपत्य झाली नंतर त्यांच्यात असणारा स्नेहनुबंध संपुष्टात आला . आणि ते विभक्त झाले नंतर त्यांच्यात आणि मंगेशकर कुतुबईयनत असणार दुरावा कमी झाला .  त्यानंतर एकांतवास भोगण्याची वेळ त्यांच्यावर आली ; तरी देखील त्यांनी आपल्या गायन कारकीर्दीवर याचा विपरीत परिणाम होऊ दिला नाही . शांता शलके आशा ताई बद्दल सांगतात , “ती फार खोडकर आहे . ती नेहमी शब्दांशी खेळत असते नक्कल करण्यात ती फार पटाईत आहे . स्वतः हसता हसता दुसऱ्याला हसवण्यात तिला फार मजा वाटते . लता दीदी तिची केवळ बहीण नाही तर तिचा आदर्श आहे  “ 

लता ताईंना गायन सुरू करून 25 वर्षे झाल्यावर आशा भोसलेंनी [आमचे छोटे बाबा ] या मथड्या खाली लेख लिहिला त्यांना एकेकाळी कोणी गायला संधि देत नसे ; अशा परिस्थितीत त्यांनी मिळेल त्या संधीचे सोने केले . आणि आज त्यांची ख्याती सर्वांना ज्ञात आहे . या प्रवासातले चड उतार सांभाळत असताना त्यांनी मुलांना मोठे केले . जगासमोर आपल्या दुखाचा पढा न वाचता त्यांना आपल्या स्वरांनी मंत्र मूगड केले . त्यांच्या या आयुषाला नवीन वळण मिळाले राहुल देव वर्मण यांच्या जवळीकतेमुळे . आशा भोसले आणि वर्मण यांनी एकतर काम करत असताना त्यांच्यात जवळीकता वाढली ; आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला . तो विवाह शेवट पर्यन्त टिकला ; पण त्यांना जवळ जवळ 15 वर्षे संसार सुखात राहता आले . त्यानंतर त्यांना परत एकटीने जगणे आले . पण आता त्यांच्यासमोर असणाऱ्या समस्या संपल्या  आहेत. त्यांनी मराठी , हिन्दी , बंगला , मल्याळम इत्यादि भाषेतून  गायन केले आहे . 

त्यांना दादासाहेब फालके , लता मंगेशकर , पद्मविभूषण असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत . वयाच्या 80 वर्षाच्या असताना त्यांनी चित्रपटात काम केले आहे ; म्हणजे त्या वयाने थकल्या असल्या तरी मनाने मात्र अगदी तरुण आहेत . त्या म्हणतात , “जर मी गायिका नसते तर सोयमपाकीण झाले असते “  त्यांच्या जीवनात त्यांनी घेतलेले निर्णय कदाचित काहींना चुकीचे वाटू शकतात ; पण नेहमी त्यांनी तो निर्णय योग्य साबीत करण्याचा आरोकात प्रयत्न केला . परिणामाची चिंता न करता त्या आल्या प्रसंगाला सामोरे गेल्या . त्यांनी मिळवलेले यश त्यांना मिळालेले पुरस्कार अनेकांना या क्षेत्रात भविष्य घडवण्यासाठी प्रेरित करत असेल ; पण  त्यांच्यातील प्रियसी पत्नी तेवढीच महत्वाची आहे . कारण त्यांनी सर्वांचा विरोध असताना केलेले प्रेम विवाहाचे धाडस वैवाहिक आयुषयातून विभक्त झाल्यावर आलेले नैराश्य सर्व त्यांनी पचवले . पाण्याच्या घोटाबरोबर दुःख गिळून त्यांनी आपले जीवन प्रयोजन  सुरू ठेवले .  त्यांनी नेहमी स्वतःला वास्तवाला सामोरे जाण्यासाठी तयार ठेवले एकीकडे सर्वत्र प्रशिदहि मिळत असताना त्यांना कौटुंबिक संकटांचा सामना करावा लागत असे . त्या सर्वांना तोंड देऊन आशा भोसले पुरून उरल्या . आमच्या वायकटीक जीवनात आलेल्या छोट्या-छोट्या आव्हाणांसमोर आम्ही शस्त्र टाकतो , प्रेम भंग झाला तर आत्महत्या करतो ,  घरगुती वेदना आम्ही मनाला  चिटकवून बसतो . पण अशा वेळी जगायचे कशासाठी ? याचे भान आम्हाला राहत नाही मग आपल्या दुखांना आशा भोसलेंच्या संकटांशी तोलून पहा ; आणि आपल्या यशाची त्यांच्या यशाशी तुलना करून पहा . एवढ्या खडतड वाटेवर चालून एक मुलगी तिचे ध्येय गाठू शकते . तर आम्हाला साधे सन्मानपूर्वक जीवन का जगता येऊ नये ? हा प्रश्न स्वतःला विचारून आपण नेमके कोणत्या पद्धतीचे जीवन जगतो हे शोधा . कारण आज मुलींना प्रेम विवाह करण्याचे स्वातंत्र्य नाही . आज इथल्या तरुणांमध्ये अपयश पचवण्याची क्षमता नाही अगदी परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून गळ्याला फास लावून घेणारे विद्यार्थी आपण पाहतो . आपल्यापैकी बहुतांश लोक जीवनाचे एक निश्चित क्षेत्र ठरवतात ; आणि जगतात . पण आशा भोसलेंनी ते एक क्षेत्र पादक्रांत करत असताना अनेक क्षेत्रात मुसंडी मारली . नृत्य करणारी 80 वर्षाची अभिनेत्री केवळ आशा भोसले आहे . सोयमपाक करण्यात आवड आहे म्हणून देश विदेशात उपहारगृह सुरू करणारी एकमेव सोयमपाकिन आहे . त्यांच्या गायनाला अनेक पुरस्कार मिळाले असताना त्यांनी तितक्याच पोट तीलकीने इतर छंद जोपासले आम्ही कदाचित तेवढी ऊंची गाठू शकणार नाही ; पण किमान दोन छंद जोपासताना जगाचे लक्ष वेधून घेऊ शकतो . प्रत्येक व्यक्ति अद्वितीय असते संपूर्ण मानवी सृष्टीला दिशा दाखवण्याचे सामर्थ्य त्याच्यात असते फक्त गरज आहे स्वतःला ओळखण्याची , आणि जीवनातील कठीण प्रसंगी उभे राहण्याची , वास्तव स्वीकारून पुढे पाऊल टाकण्याची शेवटी कितीही अंधकार असला तरी आतुह आशेचा किरण चमकला पाहिजे पुढची दिशा दाखवण्यासाठी.  

फोटो - साभार गूगल

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा