फाशीच्या तक्तावर चडणार पहिली महिला

भाकरीसाठी असणारे प्रेम, जन्मदात्यांवर असणारे प्रेम, जन्म दात्यांचे असणारे प्रेम, भिन्न लिंगी व्यक्तींचे प्रेम, भिन्न स्वरूपाचे असते. त्यात असतो जीवाला माणसांना जोडण्याचा, नात्यांचे बंधन अधिक घट्ट करण्याचा, स्नेहाच्या धाग्याने विणलेल्या चादरीत सुखी संसार थाटायचा त्याच्यासाठी सर्वांशी झुंजायचे आव्हानांशी भिडायचे पण दुरावले गेले तरी नाते मात्र जपायचे. हे असणारे  प्रेम कुणाच्या जीवावर उठत नाही; जर त्यातून कुणाला आपला जीव गमवावा  लागला तर ते प्रेम नसून तो प्रेमाच्या नात्याला लागलेला धब्बा  आहे. जगात महिलांना अधिकार मिळवण्यासाठी सर्वत्र संघर्ष करावा लागला; त्याला अपवाद ठरला आपला भारत देश इथल्या महिलांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला. त्यांनी सर्व क्षेत्रात बाजी मारली अगदी जमिनीपासून तर अवकाश पर्यंत सरपंचापासून राष्ट्रपती पर्यंत कलाकारापासून अंतर राष्त्री क्रीडा पटून पर्यंत एक जागा मात्र तिला कधीच खुणावत नव्हती त्याचा सर्वांना अभिमान वाटत असे; ती म्हणजे फाशीचा फंडा आज पर्यंत स्वातंत्र्य भारतात एका देखील महिलेला फाशी झाली नाही. पण आता एक ३९ वर्षीय महिला त्या ताक्तावर अटकणार आहे. जिने जगाला सर्वत्र शांतता त्याग दातृत्व हे सर्व दिले; त्यातील एक होण्यापेक्षा ती
क्रूर झाली. ही घटना आहे 14-4-2008 रोजीची मध्यरात्र ठिकाण उत्तरप्रदेशचे एक गाव दररोज साहेबानं एक लिटर दूध घेत असे त्या दिवशी तिने २ लिटर दूध घेतले. त्या रात्री जेवण झाल्यावर तिने दुधात विष कालवून सर्वांना बेशुद्ध केले; नंतर तिच्याप्रियकरासह तिने त्या क्रूर कृत्याला सुरुवात केली एका १० महिन्याच्या भाच्यासह जन्म दात्या आई वडिलांना बहीण भाऊ वाहिनी एकंदरीत ७ लोकांना संपवले. आणि मग झालेला आक्रोश पाहून गाव गोळा झाले; काही क्षणांपूर्वी या काळ्याकृत्त्याला घडवून आणणारी शबनम डोळ्यात अश्रू आणून सांगू लागली घरावर हल्ला झाला. त्या वेळी सहज प्रश्न निर्माण झाला जर हल्ले खोरांनी सर्वांना मारले तर मग तुला काही इजा का झाली नाही? मग तिचे बाहेर गावी राहणारे काका काकू तिथे पोहचले; त्यांना हे दृश्य पाहून हादरा बसला नंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. कनिष्ठ  न्यायालयाने २ वर्षे ३ म्हणीने सुनवाई करून शबनम आणि तिचा प्रियकर सलीम यांना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. दरम्यानच्या काळात तिने सारवउछ न्यायालयात अपील केले तिथे शिक्षा कायम ठेवण्यात आली; त्यानंतर राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला आणि आता मथुरा तुरुंगात तिच्या फाशीची तयारी सुरु झाली आहे. सलीमला कुठे दिली जाणार निश्चित झाले नाही; तसेच अद्याप फाशीची तारिक जाहीर झाली नाही. पण नेमके यांच्या प्रेम संबंधात अशी कोणती अडचण आळि होती; ज्यामुळे त्यांनी या थराला जाण्याचा निर्णय घेतला. तर सरळ जे सर्वांच्या बाबतीत घडते घरून नकार मिळाला. सलीम एका गरीब कुटुंबातला तरुण तो लाकडाच्या पाटल्या बनवण्याचे काम करत असे; शबनम हि एका संपन्न घरातली सुशिक्षित तरुणी घटना घडली त्यावेळी सलीम २५ वर्षाचा होता तर शबनम २७ वर्षाची होती. आता तिचे वय ३९ वर्षे आहे. सुरुवातीला तिच्या वडिलांना काकांनी तिच्या या नात्याबद्दल वडिलांना सांगितले होते; पण त्यांनी साप दुर्लक्ष्य केले मग जे व्हायचे  ते झाले. हि आता पर्यंत घडलेली पहिली घटना आहे; भविष्यात अशी घटना घडू नये हि प्रत्येकाची इच्छा आहे. तरी देखील नेमका यात दोष कुणाचा तर निश्चित त्या दोघांचा जे फाशीच्या ताक्तावर चढणार आहेत. पण अशे कृत्य करणारी व्यक्ती खरोखर प्रेमासाठी असे करू शकते का? तर माझ्यामते ते शक्य नाही. जी प्रेमळ स्वभावाची व्यक्ती आहे तिला १० महिन्याच्या त्या चिमुरड्याचा अपराध सांगता येईल का? जर तिच्या मनात मानवतेची भावना असती; तर ज्यांनी जन्म दिला त्या आई वडिलांची हत्या करताना शनभर देखील आपण काय करतो याचा पूणर विचार करावा असे वाटले नसेल का? जर कुटुंबाकडून लग्नाला पाठिंबा मिळत नसेल तर त्यांच्या संमतीशिवाय लग्न करण्याचा निर्णय का घेतला नाही? आपल्या संविधानानुसार कोणत्या हि दोन सज्ञान व्यक्ती स्वतःच्या मर्जीनुसार आपले आयुष्य जगू शकतात; हे शिकलेल्या शबनमला माहित असणार मग तिने तो अधिकार का वापरला नाही? असे असंख्य प्रश्न आहेत पण या प्रश्नांची उत्तरे शबनम देऊ शकते; पण आपण तिला विचारू शकणार नाही जर विचारलेच तर समाधानकारक उत्तर तिच्याकडे नसेल. कोणत्या हि किंमतीवर हत्येचे समर्थन होऊ शकत नाही. कारण आज पर्यंत अनेक प्रेमी जोडप्यांनी प्रचंड त्रास सहन केला; कुटुंबाचा राग पत्करला अनेकांना कुटुंबाला मुखावे लागले पण माझ्या माहिती प्रमाणे एकाने देखील असे घृणास्पद कृत्य केले नाही. तिला फाशी लवकरात लवकर दिली जावी. पण जसा त्यांनी या प्रकरणाला प्रेमाचा रंग दिला तर आज प्रेमी युगलांचे प्रश्न तसेच राहतात. घरच्यांकडून होणारा विरोध दिला जाणारा नकार आणि त्यातून होणारे त्यांच्या हक्काची पायमल्ली हे सर्व कायम राहते. म्हणून आता जुन्या जाणत्या लोकांनी नवीन बदलांना सामोरे जाताना, आपल्या वैचारिक कक्षा रुंदाव्या; त्यांनी आपल्या मुलं-मुलींना समुजून घेऊन त्यांना पाठिंबा द्यावा. पण या फाशीच्या प्रकरणात केवळ प्रेमातील अडथडा हे एकमेव कारण असेल वाटत नाही; कदाचित त्याचा तिची संपत्ती बळकावण्याचा हेतू असू शकतो. आपण ज्याच्या प्रेमात असतो ती व्यक्ती आपल्यासाठी नेहमी दाखवतो ती दिशा पूर्व दिशा असते; पण तिला संमोहित करून तिच्या हातून हे कृत्य करून घेतले असावे. नाही तर तिने सोयम प्रेरणेने संपत्ती लाटण्यासाठी केले असावे; शेवटी ते दोघे याबद्दल सत्य जाणतात आणि ते कधी बाहेर येणार असे वाटत नाही. त्यांनी या कटाची आखणी अनेक दिवसांपासून केली होती; हे पोलिसांनी जमा केलेल्या पुराव्यातील sim card द्वारे झालेल्या संभाषणातून स्पष्ट होते. हा तडकाफडकी घेतलेला निर्णय नसून थंड डोक्याने केलेला गुन्हा आहे. तिच्या गळ्यात अडकणार फंडा केवळ एका गुन्हेगाराच्या गळ्यात अडकणार नाही; तर त्यांच्याद्वारे एका विकृतीला यमसदनी झाडले जाणार त्या सुंदर पहाटेची सर्व देश वाट पाहतोय.  

    • फोटो - साभार गूगल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा