लिंग नसलेला माणूस

तुम्ही  झिजला चंदनासारखे गंज चदलेल्या आमच्या डोक्यात नवीन प्रकाश टाकण्यासाठी, 

 तुम्ही दिला लढा व्यवस्थेने नाकारलेल्या समाजाने फेटाळलेल्या मानवी आयुष्यासाठी , 

निसर्गाने प्रत्येकाला वेगळे घडवले त्याच्यात अद्वितीय सामर्थ्य दिले . असले तरी सर्व यशस्वी माणसांना टोकाचा संघर्ष करावा लागतो . अगदी कोंबडीच्या पिल्लं अंड्यातून बाहेर पडण्यासाठी , फुल पाखराला उडण्यासाठी, लहान बाळाला चालण्यासाठी हे सर्व नैसर्गिक असले तरी माणसातील काही माणसांना जगण्यासाठी प्रकृतीच्या  विरुद्ध झटपट करावी लागते . यातदेखील फारसे आश्चर्यचकित करणारे काही नाही पण विचार करा काहींना संघर्ष करावा लागतो आपले निसर्गतः मिळालेले लिंग जगासमोर जाहीर करण्यासाठी . हि एका आयुष्यात अनेक जन्म घेणाऱ्या समाज परिवर्तकाची अर्थात स्त्री-पुरुष या शिवाय असणाऱ्या लिंगधारकाची--धनंजय चव्हाण मंगलमूर्ती यांची . 

अगदी एका सामान्य मुलासारखा या बाळाचा जन्म झाला त्याच्यात जणू जन्मतः निर्मिकाने जगाला दिशा दाखवण्याची शक्ती दिली असावी . तो शाळेत हुशार मुलगा म्हणून गणल्या जात असे त्याला अनेक बक्षिसे मिळाली . शिक्षकांच्या शाबाशक्य त्याच्या पाठीवर पडायच्या ; आई बाबांकडून कौतुक , समाजाकडून वाव हे सर्व असताना त्याचे बालपण अगदी मजेत गेले.  खरा आयुष्याचा अर्थ जाणवायला लागला किश्वरव्यात तेव्हा त्याला आपल्या आंतरिक शारिरीक बदल भावभावना जाणवत असत त्याला आपण  मुलगी आहोत      असे वाटायचे कपडे मात्र मुलाचे घालावे लागायचे . जगासमोर आपली ओळख दाखवता येत नसे आतल्या आत घुसमट होत असे . पण आता पर्यंत त्याच्या या इतरांपेक्षा वेगळ्या वागण्याच्या वृत्तीमुळे त्याला इतर मुले चिडवायचे शालेय वयापासून त्याचे लैंगिक शोषण  सुरु झाले ; ते आता पर्यंत किती वेळा झाले असेल हे त्यांना देखील माहित नाही . मग मात्र त्यांनी कशीबशी १०- वि उत्तीर्ण केली ; सुरुवातीपासून हुशार असणारा हा मुलगा अगदी काठावर उत्तीर्ण झाला . आपल्यातील विकृत मानसिकतेमुळे असहिष्णू वागण्यामुळे त्यांचे लहानपणी अभियंता होऊन सन्मानपूर्वक जीवन जगायचे स्वप्न होते . जसे आपले सर्वांचे असते पण शालेय वयात ते भंगले मग त्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला . आणि फ्रेंच ग्रीक , भाषेत पदवी घेतली ; तसेच त्यांनी समाजसेवा विषयात पदवीउत्तर पदवी मिळवली . आता ते मानवी हक्क विषयात पदवीउत्तर पदवी घेत आहेत . त्यांच्या प्रदीर्घ अब्यास प्रत्येक सोघोषीत विचारवंताला त्याची लायकी दाखवून देणारा आहे . हे सर्व शिक्षण घेत असताना त्यांच्यावर लैंगिक अत्याचार प्रचंड झाले ; जणू इतरांच्या कामवासना भागवणे एवढाच त्यांच्या जगण्याचा हेतू असावा . हेही त्यांनी सहन केले एकदा त्यांच्यावर २० लोकांनी बलात्कार केला रात्रभर त्यांनी त्यांच्या शरीराचे चालणे केले ; आणि सकाळी मरणासन्न अवस्थेत रस्त्यावर टाकून दिले . त्यांनी या सर्व छळाला कंटाळून एकदा ९-वित्त असताना आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना वाचवले ; आता असे वाटते त्या व्यक्तीने एका मुलाचा जीव वाचवला नाही तर चंदीगडच्या तृतीयपंत्यांचे भविष्य वाचवले . 

‘आज ते एका समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून चंदीगडच्या तृतीयपंथी लोकांसाठी काम करत आहेत . ‘त्यांच्या प्रयत्नातून पंजाब विद्यापीठात तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी वेगळे सौचालय तयार केले गेले . त्यांच्या कार्याची दखल चक्क कॅनडाच्या पंतप्रधानांनी घेतली ; २०१८ साली  [जस्टिन त्रुदो ] हे कॅनडाचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते त्यावेळी धनंजय यांना भोजनासाठी आमंत्रित केले गेले . होते त्यामुळे त्यांना सर्वत्र प्रसिद्धी मिळाली ; त्यांच्या कार्याला   ओळख मिळाली ; एक दिवस शेजारचे लोक त्यांच्या वडिलांना छ्क्याला जन्म दिला म्हणून हिणवत होते तेच लोक आता तुझा मुलगा आर मोठा झाला त्याला  कॅनडाचे   पंतप्रधान भेटले असे सांगतात आणि माझ्या वडिलांची छाती गर्वाने फुगते . आपल्या बहीण-भावांच्या लग्नास अडथडा येऊ नये  घराचा त्याग करणारा हा मुसाफिर  केवळ बाहेर पडत नाही ; तो वलांडतो स्वघोषित मर्यादांचे कुंपण , तो घेतो झेप त्या अवकाशात जिथे त्याच्या नजरेस पडते सुरक्षित आणि स्वाभिमानी जीवन , त्यांना आपले पोट भरण्यासाठी देह विक्रीचा व्यवसाय करावा लागला . त्यांनी लग्नात गाणे गाऊन प्रसंगी भिक्षा मागून पोटाची खडगी भ्ररली . त्यांचा लढा एकाच वेळी अनेक पातड्यांवर सुरु आहे . 

पहिला लढा स्वतः जगण्यासाठी , दुसरा समाजात स्विकारीतेसाठी , तिसरा स्वजातीतल्या अर्थात तृतीयपंथी लोकांमधल्या सुधारणेसाठी . ते सांगतात , “तृतीयपंथी लोक शिक्षणापासून कोसो दूर आहेत ; त्यांना प्रचलित पद्धतीने जगायला आवडते . सुंदर सुखी आयुष्य जगण्याची त्यांची इच्छा नाही त्यांच्या डेर्यावर शिक्षण हा विषय चर्चेसाठी देखील निघत नाही ; जर कोणी धाडस केले तर त्याच्यात अडथडा निर्माण करतात शिकू देत नाहीत मारून टाकण्याची धमकी देतात . त्याचबरोबर समाज त्यांना व्यक्ती म्हणून स्वीकारत नाही . “ याची ते खंत व्यक्त करतात पोलीस तृतीयपंत्यावर झालेल्या अत्याचाराची दाखल घेत नाहीत . श्रीमंत तृतीयपंथी लोक आपल्यातल्या सहकार्यासाठी रोजगार उपलब्ध करून देत नाहीत . त्यांच्या मते आपल्या समाजात लिंग थोपवले जाते त्यांना स्वतःचे लिंग ठरवण्याचा अधिकार दिला पाहिजे . तुम्हाला कदाचित वाटत असेल लिंग निसर्गतः मिळते मग ठरवणार कसे ? 

तर मुलीने असे वागायचे मुलाने तसे वागायचे असे त्यांच्यावर लाडू नये ; त्यांच्यातील बदलानुसार त्यांच्या मर्जीनुसार त्यांना जगू द्यावे . ते पुढे सांगत जेव्हा मी pant-shart फेकून साली परिधान केली ; त्यावेळी मी मोकळा श्वास घेतला . आज त्यांना एवढी प्रसिद्धी मिळाली  त्यांचे मित्र मंडळ कदाचित त्यांना सन्मानाने वागवत असतील ; पण अशा असंख्य लोकांचे  त्यांचा  कोण खरंच स्त्री किव्हा पुरुष असणारी व्यक्ती माणूस नाही का ? 

हा स्वतः विचार करावा जसा सर्व सजीवांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे तसा आपल्या अवतीभवती असणाऱ्या तृतीयपंत्यांना का नको हा त्यांचा हक्क त्यांना मिळावा म्हणून आपले अवघे आयुष्य झोकून देणाऱ्या या देवदूताला सलाम  

फोटो - साभार गूगल



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा