राजे तुम्ही पुन्हा या --साठी

लोकशाहीच्या काळात पुतडे शाहीचा उदयझाला;
राजे तुम्ही पुन्हा या हा महाराष्ट्र पोरका झा. ला इथे घडवल्या जातात दंगली तुमच्या नावाने गडकोट दिले जातात लग्नाला भाड्याने नेमके आजच्या युगात आपण   कोणते शिवाजी महाराज मांडतो, आणि त्यांच्या आदरशावर किती चालतो हा चिकीतसेचा विषय आ. हे म्हणून आज जयंती दिनी छोटासा प्रयत्न" मध्य युगाच्या सुरवातीपासून सर्वत्र मुघलांनी आपले साम्राज्य प्रस्थापित करण्याचा चंग बांधला होता. सत्ता हस्तगत करता करता इथल्या लोकांचे धर्मांतर केले जात असे; धर्म बदलला तर विशेष सुविधा सवलती मिळत असत हि वेळ आली आपल्यातील कालबाह्य संजुतीनमु, ळे शेतरू घोड्यावर आला त्यावेळी आपण चालत होतो त्यांनी तलवारी काढल्या तर आपल लाठ्या-काठ्या हाती घेतल्या त्यांनी बंदुकी वापरायला सुरुवात केली मग आपण समसेर फिरवायला सुरु केले. एवधच नव्हे तर युद्ध करण्याचा आधिकार समाजातील एका वर्गाला होता त्यामुळे संपूर्ण समाज हाती शस्त्र घेऊ शकत नव्हता त्याच्यावर जरब होती धर्माची सागरी मार्गाने क्षेत्रू येऊन इथल्या आया बायनची अब्रू लुटत आणि पळून जात पण धर्माने सागरी पर्यटन बंदी घातल्यामुळे आपले सैनिक क्षमता आसून हतबल होते. या दुष्ट चक्रात इथला समाज भरडला जात असे अंधश्रद्धेचा त्याच्या आयुषावर प्रचंड पगडा बसलेला होता तो केवळ मृततीव येत नाही म्हणून जगत असे इथली गावे भकास झाली होती; रयत दर्या खोऱ्यात आपला जीव मुठीत धरून राहत असे, यादवांच्या वैभव संपन्न राजवटीचा लोकांना पुरता विसर पडला होता. जमीनदार गरीब लोकांचे सोशन करीत असत, स्त्रियांना केवळ स्वतःची मक्तेदारी समजले जात असायचे तिचे सोशण करण्यात पुरुष धन्यता मानत गावातील पाटील कुलकर्णी वाटेल तसे वागायचे, त्यांच्यावर कुणाचे नियंत्र नव्हते; अशा भीकट परिस्थितीत एका मातेने समाजाला वाचवायचे ठरवले; यातून बाहेर काढून पुनः सन्मानाने जगता यावे म्हणून पोटच्या पोराला या कार्यासाठी सज्ज केले. त्या लेकरावर संस्कार करून त्याला ऊन वारा पाऊस या कशाची ही पर्वा न करता लढायला शिकवले. सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यात निसर्गाशी स्पर्धा करायला भाग पडले. आणि या माय लेकानणी रयतेचा विश्वास संपादित केला. राजमाता शिवरायणा घेऊन पुण्यात आल्या तिथली अंधशरदहेची पार उखडुन फेकली, दांभिक संजुतीला खुले आव्हान दिले, त्यांच्या या वर्तनामुळे लोकांनी पुण्यात वस्ती केली आऊसहेबानी रयतेला बियाणे शेती उपयोगी अवजारे दिली. लोक शेती करू लागले, त्याच बरोबर तरुण मुले महाराजांना आपळ्यातीलच समजत असत हा जहागिरदारचा मुलगा गरिबाच्या झोपलीतील कांदा भाकरी खाऊ लागला त्यामुळे त्यांच्यात आणि बाकी रयतेत असणारा फरक नष्ट झाला. त्यांनी सर्व प्रथम गुलामीची जाणीव करून दिली; स्वराज्याचे स्वप्न त्यांच्यासमोर मांडले स्वार्थासाठी नाही, तर आपल्या हक्कांसाठी इथल्या रयतेची होणारी वाताहत थांबवण्यासाठी, माता भगिनीची अब्रू वाचवण्यासाठी. " मग त्यांनी रायरेश्वरच्या मंदिरात करंगलीचे रक्त सांडवून बलिदानास तयार राहण्याची प्रेरणा दिली हे सर्व इतिहासाच्या पुस्तकात चौथीच्या मुलांना पाचवित जाण्यासाठी शिकवले जाते. मग हे सर्व वाचून विद्यार्थी दशेतील मुले आपल्या दादांना शिवाजीमहाराजांच्या जयंतीला धिंगाणा घालताना पाहतात आणि आई बाबा शिवाजीमहाराजांचा आपण वारसा चालवतो म्हणतात, आणि विशिष्ठ धर्माचा द्वेष करतात. मुलांना मग पुस्तकातील शिवाजीमहाराज काल्पनिक वाटतात आणि जे शिवाजीमहाराज आम्हाला जयंती पुण्यतिथीच्या दिवशी दिसतात, दंगल घडवण्यासाठी त्यांच्या नावाच्या घोषणा दिल्या जातात तेच खरे वाटतात. अशा वेळी गरज आहे राजे डोक्यात उतरवण्याची त्यांचा वैचारिक वारसा पुढे नेण्याची. त्यासाठी https://www.premsparsh.com/2021/06/blog-post_6.html जसे संस्कार जिजाऊनणी आपल्या मुलावर केले तसे आजच्या मुलांवर होट नाहीत मग महाराजांचा वारसा केवळ घोषणा देऊन चालत नसतो तर आचरणात आणावा लागतो. शिवाजीमहाराज असणे म्हणजे विशिष्ठ जातीत जन्माला येणे नव्हे; तर मानवतेच्या धर्माचे रक्षण करणे होय धार्मिक असण्याचा अर्थ आपल्या धर्माचे आचरण करताना दुसऱ्या धर्माचा आदर ठेवणे अवशक असते. बालपणापासून त्यांच्यावर हे संस्कार करत असताना स्वार्थी हेतु पेक्षा व्यापक समाजहित साधण्याचे ध्येय त्यांच्यासमोर ठेवणे महाराजांचा वारसा चालवणे आहे. छत्रपतींच्या आयुष्यातील प्रत्येक मोहीम त्यांनी घेतलेला निर्णय त्यांनी केलेल्या न्याय रयतेला दिलेली वागणूक प्रेरणादाई आहे त्यात धडलेला व्यापक विचार सूक्ष्म नियोजन अजच्या काळात आपवादाणे आढळते; आज तरुणांना आयुष्याचे प्रयोजन निश्चित ठरवताना फार अडचणी येतात पैसा कमावणे एवढाच हेतु त्यांच्या समोर असतो शिवाजी राजे लहान असताना अनेक वेळा घोड्याहून पडले असतील, खरचटले असतील, त्यांचे रक्त सांडले असणार जिजाऊनणी त्यांना कधी स्वतः उचलले नाही स्वतःच्या शक्तीने त्यांना उठायला शिकवले; आज मैदानापासून मुले दूर जात आहेत त्यांना अपयश पचवण्याची हिम्मत राहत नाही. वयाच्या 29 वर्षाचे असताना राज्यांचा पुनर जन्म झाला अफजल खानाने दगा दिला त्याला तसेच उत्तर राजाने दिले; मिर्झा राजे जयसिंग सोबत केलेल्या तहात जवळ जवळ संपूर्ण स्वराज्य गेले; पण महाराज खचले नाहीत भयभीत झाले नाहीत याच महाराष्ट्रातील युवक परीक्षेत कमी गुण मिळाले तर आत्महत्या करतात आपला राजा फक्त शक्तीच्या जोरावर मोठा झाला नाही; तर त्याच्याकडे असणारी बुद्धीची धार त्यांच्यात असणारा चिकटपणा लढाऊ रुतटि आणि कमालीचे चातुर्य हे सर्व गुण त्यांच्या ठायी असल्यामुळे हे शक्य झाले. " स्वराज्य म्हणजे स्वतहाचे राज्य इथे राहणारया प्रत्येकाचे राज्य असे असले तरी शीवरायांचे स्वराज्य त्यांच्यासाठी स्वतःवर असणारे राज्य त्यांनी नैतिकता कायम जपली आपल्यातला मोह त्यांनी कधीच मोठा होऊ दिला नाही. पण आज त्यांच्या नावाचे फलक झळकवले जातात आपल्या हाताने स्वतःची पाठ थोपटण्यासाठी, प्रशिदहि मिळवण्यासाठी, आपण सच्च्या शीव भक्त आहोत हे दाखवण्यासाठी; पण आपण जागृत होण्याची अवशक्ता आहे आज स्त्रिया पुरुषांपेक्षा कंबहर देखील कमी नाहीत हे त्यांनी दाखवून दिले आहे सर्व क्षेत्रात त्यांनी छाप टाकली आहे पण आपल्यातली विकृत मानशिकता अध्याप बदलली नाही त्यांच्यावर अत्याचर होतात; अगदी 2 वर्षाच्या मुळीपासून पासून तर 90 वर्षाच्या आजी पर्यन्त तिला सवरक्षणाची गरज आहे महाराजांच्या युगात तत्काल न्याय देणे शक्य होते; पण आज न्यायालाईन प्रक्रिया पूर्ण करावी लागते; पण दुर्दैवाने त्यात होणारी दिरंगाई पीडहितेला न्याय देण्यास असमर्थ ठरते. महात्मा जोतिबा फुलेणणी कुलवाडि भूषण असा महाराजांचा उल्लेख केला त्याननि त्यांचं सन्मान करताना पोहादा लिहिला. शिवाजीमहाराजांनी शेतकऱ्याच्या पटहिचा कणा ताट केला; त्यांना सर्वत्रपरि मदत केली पण आज शेतकऱ्याच्या नावाने मतदान मागणारे सरकार काही धडा घेणार का? स्त्री शेतकरी सामान्य माणूस जिथे आनंदात राहतो ते त्याचे स्वराज्य असते; नेमके हे उभे करत असताना त्यांच्यासोबत जिवाभावाचे सहकारी होते. शिवा काशीद , बाजी प्रभू,   मुरारबाजी , तानाजी , यशाजि, बहिर्जी, असे असंख्य मावळे आपला प्राण देण्यास तत्पर होते; नेमके त्यांना असे का वाटत असे याचे गुड आहे त्यांच्या स्वप्नात कारण शिवाजीमहाराजांना राजा व्हायचे होते म्हणून हा खटाटोक नव्हता तर वर नमूद केल्या प्रमाणे त्यात होता सर्वांचा स्वाभिमान, पुढच्या पिढ्यांचे सुरकशीत जीवन आणि सर्व स्त्रियांच्या अब्रूचे रक्षण; आज आपण एवढे उदात्त ध्येय कदाचित बाळगू शकणार नाही किमान आपल्या कुटुंबा बाहेरील एका व्यक्तीची मदत जर करू शकलो; तर सार्थक होईल. नेमके शी व जी या शब्दांचा आजच्या काळात अभिप्रेत असणार अर्थ[ शिस्त विवेक आणि जिद्द] अर्थात आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी शिस्तप्रिय व्यक्ति असणे गरजेचे आहे. त्याच बरोबर एका बाजूने जुकून विचार न करता विवेक बुद्धीने निर्णय घ्यावा, आणि यश अपयश येत असताना यशाने हुरळून न जाता अपयश आल्यावर खचून न जाता जिद्दीने आपल्या जीवन यात्रेचा प्रवास करावा. अशा आदर्श चौकटीत जगणारा चारित्र्य संपन्न व्यक्ति आधुनिक शिवाजी होणार चंद्रकोर लोकांना दाखवण्यासाठी ठेवण्यात साहस नसून चंद्रकोरी प्रमाणे आपळा प्रवास सुरू ठेवावा; त्यांच्यातील नियोजनाचे कौशल्य आत्मसात केले तर प्रत्येक क्षणाचे नियोजन आपल्याला करता येईल शेवटी महाराजांचं मावळा या नात्याने त्यांची जयंती प्रत्येक दिवशी साजरी करू त्यांचे विचार आपल्या आचरणात उतरवून आणि मुजरा करू आपल्या क्षेत्रातील शिवाजी होण्याचा प्रयत्न करू.

"" आजच्या परिस्थितीत स्त्री, शेतकरी, सामान्य रयत विषमतेला बळी पडली आहे. सर्वत्र अंधकार पसरला असून मुटभर लोकांच्या हातात सामाजिक/आर्थिक/राजकीय सर्व प्रकारचीसत्ता एकवटली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी मावल्याणी एकत्र येऊन शिवरायणी आंगीकरलेला मार्ग स्वीकारावा आणि लोक हित साधावे म्हणून प्रत्येकाला वाटते "राजे तुम्ही पुनः या "

  •  फोटो - साभार गूगल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा