आत्महत्या ग्रस्त पत्नी ते 29 एकर शेतीची मालकीण

    • पुरुष प्रधान समाजाने तिला देबी म्हणून पुजले; तर चप्पल म्हणून वागवले. त्याच पुरुषावर जेव्हा संकट कोसळते त्यावेळी तो खचून जातो; संकटासमोर शस्त्र टाकतो. पण ती खचत नाही, मागे पाऊल टाकत नाही अशीच एक जोति देशमुख नावाची माझ्या अकोला जिल्ह्यातील कट्यार गावातील 29 एक्कर शेताची मालकीण सर्व महिलांसाठी आदर्श आहे. तर आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या तोंडावर चपराक मारते; कर्जाच्या खाईत बुडून नाही तर निसर्गाच्या उलट चक्रात अडकून नैराशाच्या गर्तेत सापडून अनेकांनी जीवन संपवले; आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून निघून गेले. अशा एका कुटुंबातील जोति ताई 2001 ते 2007 या काळात घरातील सर्व कर्त्या पुरुषांनी गळ्यात फास अडकवून घेतला. कुटुंब रस्त्यावर आले. आणि सुरू झाली ताईंची परीक्षा जेमतेम 10-वी पर्यन्त शिक्षण झालेल्या ताईंना शेतीचे कण भर देखील ज्ञान नसताना त्यांनी मन भर पीक काढले.   त्यांचे गाव अकोला जिल्ह्यातील खारपण न पट्ट्यात येते; म्हणजे जमिनीतील पानी खारट असते पण समु

द्राच्या पाण्यासारखे अत्यंत खारट नसते म्हणजे आपण ते सहज पिऊ शकतो. फक्त त्याची चव थोडी वेगळी लागते अशा परिस्थितीत त्यांनी शेतीत कामाला सुरुवात केली; त्यावेळी त्यांच्या समोर अनेक आव्हाने होती केवळ निसर्गाच्या भरोशयावर असणाऱ्या शेतीत सोने पिकवणे हे एकच मोठे आव्हान नव्हते तर समाजातील फुकटचा सल्ला देणाऱ्यांना तोंड देणे तितकेच मोठे आव्हान होते; त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारावे तसे काळ्या मातीतून पांढरे सोने पिकवून सर्वांचे तोंडे बंद केली आणि शेतीत पीक घेऊन यशस्वी रित्या शेती केली. त्यांच्या जोडीदाराच्या निधनानंतर नंतर त्यांना अनेकांनी शेती विकण्याचा सल्ला दिला; पण त्यांना पोटच्या गोळ्याला मोठे करायचे होते; त्याला वाघीनिच दूध पाजायचे होते. त्यासाठी त्यांनी निसर्गाशी टक्कर घेण्याचे ठरवले आज तयांचा मुलगा पुण्यात शिक्षण घेत आहे. एक आई आपल्या मुलासाठी काय करू शकते याची प्रचिती उत्तम कांबळे यांच्या आई समजून घेताना या पुस्तकात समजते या बद्दल जाणून घेण्यासाठी हे नक्की वाचा https://www.premsparsh.com/2021/01/blog-post_6.html आज त्यांनी कोरडवावू शेतीचे वलीत केले; सुदैवाने त्यांच्या शेतातील कुपनलिकेला चांगले पानी लागले. आज त्या खरीप तसेच रब्बी पिके देखील घेतात. आपल्याकडे लक्षावधी शेतकऱ्यांनी आत्महतेचा निर्णय घेऊन आपले जीवन संपवले त्यांच्या पत्नीला मात्र दुखात होरपडून जगावे लागते. कारण आज पुरुषी मानसिकतेने ग्रासलेला समाज तिला तिच्या क्षमता दाखवू  देत नाही. जोतीताईंना वेळोवेळी शेती करण्यापासून  अनेकांनी   दूर करण्याचा प्रयत्न केला; त्या त्याच जिद्दीने शेतात सक्रिय राहून मातीशी घट्ट जुडल्या गेल्या. त्यांच्या या धाडसाला सलाम करताना अकोल्याचे पालक मंत्री यांनी ताईंचे कट्यार गाव शेतीसाठी दत्तक घेतले. म्हणजे एखादी स्त्री तिच्या कर्तृत्वावर मोठी होते; त्यावेळी ती संपूर्ण गावासाठी मदत करते संपूर्ण महिलांसाठी प्रोत्साहन देते. त्यांच्या या लढाऊ वृत्तीला समाज सुरुवातीला त्रास देतो मग   त्यांना डोक्यावर घेतो इथेच  कारण त्यांनाडोक्यावर घेण्यापेक्षा पेक्षा आपल्या परिसरातील अशा स्त्रियांना पाठिंबा देऊन त्यांच्या मनगटातील बळावर त्यांना भरारी घेण्यास मदत करावी. दुर्दैवाने आपण ते करत नसल्यामुळे अशा असंख्य आत्महत्या ग्रस्त पत्नी सहानुभूतीच्या आधारे जगतात मग त्यांना खरी मदत करत असताना व्यक्ती म्हणून जगण्यासाठी त्यांना सन्मानाने वागवले पाहिजे. हीच जिद्द अशा अनेकांमध्ये असती तर त्यांनी देखील आपली ओळख निर्माण केली असती. पण दुर्दैवाने या समाजात प्रवाह विरुद्ध काही करण्याचे साहस केले तर हा समाज ते होऊ देत नाही. आणि समाजाच्या दडपण खाली क्षमता असताना त्यांना तथाकथित स्त्रीसारखे जगावे लागते. म्हणून आता आपण हा नवीन बदल स्वीकारून इथल्या जोडीदाराला मुखलेल्या पत्नींना सहकार्य केले पाहिजे. आणि इथल्या प्रत्येक जोती ताईला   आधार देऊ 
फोटो - साभार गूगल

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा