25 वर्षांचे शीव स्मारक

नुकतीच आपण सर्वत्र शिव जयन्ती साजरी केली अगदी गल्ली गल्लीत सर्वांना शिवाजीमहाराजांना मनाचामुजरा करायचा होता आणि तो केला देखील आता पुढचे ३६४ दिवस आपण मोकळे महामारी असल्यामुळे काहींचा हिरमोड झाला त्याला काही उपाय नाही पण सर्वांनी एका भावनिक मुद्द्यावर चर्चा करणे थांबवले तो निवडणुकीच्या काळातील ज्वलंत प्रश्न अरबी समुद्रातील शिव स्मारक गेल्या २५ वर्षांपासून सुरु असणारे स्मारक अद्याप त्याची वित्त रचावी एवढे देखील पूर्ण झाले नाही त्याला आता सर्वांचचन्यायालयाने तात्पुरती स्थकिती आणिली आहे म्हणजे पुढचे काही महिने किव्हा वर्षे सुरुवात होणार नाही हे स्पष्ट आहे मग महारष्ट्रात शिवाजीमहाराजांच्या दैदिप्य्मन इतिहासाची साक्ष असणारे गड असताना इथल्या प्रत्येक जिवंत माणसाच्या रक्तात स्वाभिमान वाहतो त्या धमन्याधमन्यात स्मारक जिवंत असताना सागरी स्मारकाचा अठ्ठास कशासाठी हा वेगळा प्रश्न आहे यावरदेखील आपण विचार करायला हवा १९९६ साली जून महिन्यात तत्कालीन मुख्यमंत्री मणहोर जोशी यांनी मराठा महासंगच्या कारेक्रमात शिव स्मारकाची घोषणा केली मग एप्रिल १९९९ साली गोरेगावच्या जागा निच्शित करण्यात अली त्यानंतर सत्तांतर झाले मग २००४ साली तत्कालीन मुखमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जागा बदलून आरबीसमुद्रात स्मारक उभे करण्याचे ठरवले त्यानंतर हा विषय बाजूला राहिला अधूनमधून तेवढ्यापुरता चर्चिला जात असे २०११ नंतर थोडे फार प्रयत्न झाले राज्य सरकारने केंद्राला विनंती करून पर्यावरणाच्या काही तरतुदींमध्ये बदल करून घेतले त्यात हा सर्व काळ निघून गेला २०१४ सालच्या निवडणुकीत भा ज प तसेच शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात शिवस्मारकाच्या उल्लेख केला वेगवेगळे लढून देखील हे दोन पक्ष सत्तेत बसले आणि सुरु झाला नवा प्रयत्न तत्कालीन फडणवीस सरकारने तब्ब्ल २२ परवानग्या मिळवल्या आणि तो दिवस उगवला २४ १२ २०१६ या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले आणि बोटीने समुद्रात जाऊन त्यांनी जल पूजन केले त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आणि ठेका  एका कंपनीला देण्यात आला  दरम्यान १८२ इतरच एक्टशिल्प सरदार सरहोराच्या  जवळ निर्माण करण्यात आला म्हणून परत एकदा स्मारकाची उंची वाढवण्यात आली या स्मारकाच्या कामकाजासाठी शिवस्मारक समिती विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात अली एकदा जल पूजन झाले असताना भूमी पूजनासाठी परत काही लोक जात होते त्यात एक बोटीला अपघात झाला आणि यात एकाच मृत्तिव झाला थोडे काम सुरु झाल्यावर सर्वोचाच न्यायालयात याचिका दाखल करण्यात अली आणि स्थकिती मिळाली हि सर्व माहिती सहज सर्वांना उपलब्ध होईल अथवा बहुतेकांना असेल पण काही प्रश्न अद्याप णोत्तरीत आहेत त्याची उत्तरे कधी मिळतील कि नाही मिळणार माहिती नाही तरी देखील हा तोकडा प्रयत्न विनायक मेटे अध्यक्ष असताना त्यांनी स्मारकात भ्रष्टाचार झाल्याचे पत्र सरकारला पाठवले त्याची चौकशी झाली असेल तर दोषी कोण? त्यांच्यावर कार्यवाही झाली तरी कोणती? शासन स्थकिती उठवण्यासाठी न्यायालयात पूर्ण प्रयत्न करत आहे का? एवढे गडकोट असताना स्मारकाचा आग्रह कशासाठी? ७००००००००० जवळपास असणारा खर्च आता २९००००००००० पर्यंत पोहचला आहे दिवसागणिक तो वाढत जाणार मग याला जवाबदार कोंदिरंगाईचे खापर कोणावर फोडणार?न्यायालयात याचिका केल्यावर स्थकिती मिळाली याचा अर्थ सरकारने कायदे धाब्यावर बसून परवानगी दिली का?काहीही असो स्मारक झालेच पाहिजे एकदाचे आणि निवडणुकीत भावनिक मुद्द्यांपेक्षा विकासाचे मुद्दे आले पाहिजे तसेच शिव स्मारक बघायला जाणारे पर्यटक महाराजांचा इतिहास समजून घेतील तिथल्या दालनात त्यांना वेगळा अनुभव येईल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील पण हे सर्व झाल्यावर एक प्रश्न सातत्याने विचारवं लागेल साहेब स्मारक तर होईल पण गडकोटांच्या अवस्थेत काय? आपण मात्र महाराजांचे जिवंत स्मारके आहोत हा इतिहास आपल्याला जगाचे नेतृत्व करायला सज्ज होण्यासाठी खुणावतो आहे दिल्लीचे टाकत राखतो महाराष्ट्र माझा नव्हे दिल्लीच्या ताक्तावर बसतो महाराष्ट्र माझा आजपासून पुढचे ३६४ दिवस शिवाजी होण्यासाठी आणि स्वराज्य घडवण्यासाठी प्रयत्नरत राहू आणि छत्रपती शिवाजीमहाराजांना मनाचामुजरा करू

फोटो - साभार गूगल

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा